Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana 2024:शेती औजारांच्या खरेदीसाठी मिळणार 80 टक्के अनुदान!!

Table of Contents

Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana In Marathi 2024

Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपल्या या सरकारी आणि कृषि योजनेच्या त्याचबरोबर महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी जॉब्स च्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana (महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नक्की काय आहे ही योजना? कोण कोण या योजनेसाठी पात्र असणार आहे? कोण कोण या योजनेचा लाभ घेणार आहे? या योजनेच्या माध्यमातून किती अनुदान मिळणार आहे? योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना काय काय फायदा होणार आहे? योजनेचे मुख्य उद्देश काय आहे? ई सर्व माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. कृपया खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

केंद्र आणि राज्य सरकार आपल्या देशातील आणि राज्यातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी त्याचप्रमाणे नागरिकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्याच्या उद्देशाने सतत प्रयत्नशील असते. विविध प्रकारच्या सरकारी योजना असतील, तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवनवीन कृषी योजना शासनाद्वारे राबविल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे “महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४” होय. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला मोठ्याप्रमाणात फायदा होणार आहे. त्याचबरोबर शेती व्यवसाय करण्यासाठी शेतकरी स्वतः शेतीची अवजारे खरेदी करू शकणार आहे. यासाठी त्याला इतर कोणाकडून कर्ज घेण्याची वेळ आता येणार नाही.

मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यातील बहुतांश लोकांचा शेती हाच व्यवसाय आहे. महाराष्ट्रातील मोठ्याप्रमाणात शेतकरी आज देखील पारंपरिक पद्धतीने शेती करतात. त्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे ते शेतकरी शेतीसाठी लागणारी अवजारे खरेदी करू शकत नाहीत. आर्थिकस्थिती कमकुवत असल्यामुळे आज देखील शेतकरी ऊन, वारा, पाऊस, याची पर्वा न करता वर्षानुवर्ष चालत आलेल्या पांपरिक पद्धतीने शेती करतात. त्यामुळे शेतकऱ्याला शेतातील कामे करण्यासाठी अधिक वेळ, अधिक मेहनत तसेच अधिक त्रास देखील सहन करावा लागतो.

या सर्व गोष्टींचा विचार करून म्हणजेच शेतकऱ्याला शेती करण्यासाठी कोणत्याही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही, शेतातील कामे करण्यासाठी अधिक वेळ खर्च होऊन नये, त्याचबरोबर शेती करण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर व्हावा आणि शेतीला लागणारा अधिक वेळ कमी व्हावा, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने “महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४” सुरू केली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकरी घेऊ शकतात. जेणेकरून आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना शेती करताना कोणतीही अडचण येणार नाही, त्यांना कमी वेळेत जास्त उत्पन्न मिळेल. तसेच त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास देखील या योजेनच्या माध्यमातून होणार आहे.

मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की महराष्ट्र राज्यातील नागरिकांचा शेती हा पारंपारिक त्याचबरोबर प्रमुख व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणारी अवजारे खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसतात, त्यांना बऱ्याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आवश्यक असणारी अवजारे खरेदी करणे सोपे व्हावे, त्यांना शेती करताना कोणत्याही मोठ्या अडचणी येऊ नये, या मुख्य उद्देशाने महराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महराष्ट्र कृषि विभागांतर्गत शेतकऱ्याला शेतीची आवश्यक असणारी अवजारे खरेदी करण्यासाठी 80 टक्के अनुदान “महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४” च्या माध्यमातून मिळणार आहे.

Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana 2024

महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४: थोडक्यात माहिती

योजनेचे नावMaharashtra Krushi Yantrikikaran Yojana (महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४)
राज्यमहाराष्ट्र
विभागमहाराष्ट्र कृषी विभाग
उद्देशशेती क्षेत्रात आधुनिक यंत्रांचा वापर करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
लाभशेतीसाठी लागणाऱ्या अवजार खरेदीसाठी 80 टक्के अनुदान
अर्ज कसा करायचाऑनलाइन /ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana 2024:योजनेचे वैशिष्ट्ये

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ च्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना भरपूर फायदा होणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणारी अवजारे खरेदी करण्यासाठी शासनाद्वारे 80 टक्के अनुदान मिळणार आहे.
  • या मिळालेल्या अनुदानाच्या मदतीने शेतकरी शेतातील कामे करण्यासाठी नवीन अवजारे खरेदी करू शकतील.
  • त्यामुळे त्यांच्या कामात वाढ होणार आहे, त्यांना कामासाठी जास्त वेळ लागणार नाही.
  • शेतातील कामे कमी वेळात पूर्ण होऊन त्यांच्या आर्थिक अडचणी कमी होणार आहे, त्याचबरोबर त्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे.
  • महाराष्ट्र शासनाद्वारे मिळणाऱ्या या अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा होणार आहे.
  • “महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४” या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मातील शेतकरी अर्ज करू शकतात.
  • या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुदानासाठी GST रक्कम गृहीत धरली जाणार नाही.
  • मित्रांनो, ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, यामध्ये केंद्र सरकारचा 60 टक्के तर राज्य सरकारचा 40 टक्के सहभाग आहे.
  • महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतीशय सोपी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे योजनेचा अर्ज करताना शेतकरी बांधवांना कुठल्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
  • या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे शेतकरी आता घरबसल्या आपल्या मोबईलद्वारे या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana 2024: योजनेचे उद्देश

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४” ची उद्देश काय काय आहेत?

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे यंत्र खरेदीसाठी आर्थिक मदत करणे.
  • आधुनिक यांत्रिकीकरणाला प्राधान्य देणे.
  • शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेती करण्यासाठी लागणारा वेळ कमी करणे.
  • राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी लागणारी अवजारे खरेदी करण्यास आर्थिक सहाय्य करणे.
  • शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत करणे.
  • त्यांना शेती करण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये, शेतीसाठी लागणारी अवजारे खरेदी करण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर बनविणे.

Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana 2024: समाविष्ट अवजारे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४” अंतर्गत कोणती कोणती अवजारे समाविष्ट आहेत?

● ट्रॅक्टर, पॉवर टीलर

स्वयंचलित औजारेरिपर, रिपर काम बाइंडर, पॉवर वीडर (इंजिन ऑपरेटेड)
ट्रॅक्टर चलीत औजारेरोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, कॉटन श्रेडर, ट्रॅक्टर माउन्टेड स्प्रेयर
काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणेमिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर, पॉलीशर, क्लिनर कम ग्रेडर

Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana 2024: दिले जाणारे अनुदान

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४” अंतर्गत किती अनुदान मिळणार आहे?

अल्प व अत्यल्प भूधारक, अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती आणि महिला शेतकरी50 टक्के अनुदान
इतर शेतकरी40 टक्के अनुदान
मात्र राईस मिल, दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर, पॉलीशरच्या बाबतीत अल्प व अत्यल्प/महिला /अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती60 टक्के अनुदान
इतर लाभार्थी50 टक्के अनुदान
शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट यांना कृषी औजारे बँक स्थापन करण्यासाठी60 टक्के अनुदान (24 लाख रुपयांपर्यंत अनुदान)

Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana 2024: आरक्षण

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४”अंतर्गत किती आरक्षण मिळणार?

महिलांसाठी30 टक्के निधी
दिव्यांग व्यक्ती3 टक्के निधी

Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana 2024:काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे या साठी अनुदान

● अल्प व अत्यल्प/महिला /अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती

मिनी दाल मिल60 टक्के 1.50 लाख रुपये
मिनी राईस मिल60 टक्के 2.4 लाख रुपये
पैकिंग मशीन60 टक्के 3 लाख रुपये
ग्राईंडर, पॉलीशर60 टक्के 60,000/- रुपये
क्लिनर कम ग्रेडर50 टक्के 1 लाख रुपये

● इतर लाभार्थी

मिनी दाल मिल50 टक्के 1.25 लाख रुपये
मिनी राईस मिल50 टक्के 2 लाख रुपये
पैकिंग मशीन50 टक्के 2.40 लाख रुपये
ग्राईंडर, पॉलीशर50 टक्के 50,000/- रुपये
क्लिनर कम ग्रेडर40 टक्के 80,000/- रुपये

Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana 2024: लाभार्थी पात्रता

  • अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana 2024: अटी व शर्ती

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४” साठी कोणत्या अटी व शर्ती आहेत?

  • महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ साठी फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच अर्ज करू शकतो.
  • महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर दुसऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
  • जर अर्जदार शेतकरी हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास त्यांच्याकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे जमिनीचा 7/12 व 8 अ असणे आवश्यक आहे.
  • अर्जदारास ट्रॅक्टर किंवा अवजारे यांपैकी फक्त एकाच गोष्टीसाठी अनुदान दिले जाईल.
  • या योजनेच्या माध्यमातून मिळालेली अवजारे/ यंत्रे किमान 6 वर्षे विक्री किंवा गहाण ठेवता येणार नाही.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने ट्रॅक्टरचा लाभ मिळवला असल्यास, अवजारासाठी लाभ मिळू शकतो, त्यासाठी अर्जदारास ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.

Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana 2024: आवश्यक कागदपत्रे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • जमिनीचा 7/12 व 8 अ
  • बँक खाते (पासबुक)
  • यंत्र /अवजारांचे कोटेशन
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • परीक्षण अहवाल
  • प्रतिज्ञा पत्र

Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana 2024: निवड प्रक्रिया

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४” ची निवड प्रक्रिया कशी असणार आहे?

  • जमा झालेल्या अर्जाची व कागदपत्रांची ऑनलाइन छाननी करण्यात येईल.
  • त्यानंतर पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना संमती आदेश ऑनलाइन दिला जाईल.
  • शेतकऱ्यांच्या मोबईलवर एसएमएस पाठविला जाईल.
  • अर्ज करूनही ज्या शेतकऱ्यांची निवड झाली नाही, त्यांचे नाव प्रतीक्षा यादीत ठेवण्यात येईल. अशा शेतकऱ्यांनी पुढील वर्षी हाच अर्ज पुनः सादर करायचा आहे. त्यांना नवीन अर्ज करण्याची गरज भासणार नाही.

Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana 2024: अर्ज करण्याची पद्धत

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :-

  • महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ चा अर्ज करण्यासाठी अर्जदारास सर्वात प्रथम त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • तुमच्यासमोर होमपेज उघडेल त्यावर कृषी विभागात ‘कृषी यांत्रिकीकरण योजना’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज उघडेल.
  • त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित आणि अचूकपणे काळजीपूर्वक वाचून भरायची आहे.
  • माहिती भरल्यानंतर अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • आता संपूर्ण अर्ज पुन्हा एकदा तपासून घ्यायचा आहे.
  • संपूर्ण माहिती तपासून झाल्यानंतर आता तुम्हाला सेव या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची “महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४” ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

● ऑफलाइन अर्ज प्रक्रिया :-

  • या योजेनचा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वात आधी आपल्या जिल्ह्याच्या कृषी विभागात जाऊन “महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४” चा अर्ज घ्यावा लागणार आहे.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती योग्यप्रकारे परिपूर्ण भरायची आहे.
  • त्यासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावीत.
  • अर्ज पुन्हा एकदा तपासून घ्यावा (सर्व माहिती अचूक आहे की नाही)
  • आता तुम्ही भरलेला अर्ज त्याच कार्यालयात जमा करावा.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची “महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४” ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana 2024: महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ GR➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
मोफत शौचालय योजना 2024ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024
विहीर अनुदान योजना २०२४ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
शेळी पालन योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024
मृदा आरोग्य कार्ड योजना 2024स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024
महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024गोदाम अनुदान योजना 2024
मोफत फवारणी पंप योजना 2024प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024
महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024

कृपया ही सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी योजनांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana 2024:FAQ’s
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ कोणत्या विभागाद्वारे सुरू करण्यात आली आहे?

महाराष्ट्र कृषी विभाग

Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana 2024 अंतर्गत कोणाला लाभ मिळणार आहे?

महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी

महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान मिळणार आहे.

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे?

सदर योजनेसाठी अर्ज प्रकिया ऑनलाइन/ऑफलाइन आहे.