Kumbhar Mati Utkhanan GR 2026: कुंभार समाजासाठी मोठा निर्णय! 700 ब्रास मातीवर रॉयल्टी सवलत; नवीन GR जारी

कुंभार बांधवांसाठी आनंदाची बातमी !

Traditional potter making clay pots under Maharashtra Government Kumbhar Mati Utkhanan GR 2026 for 700 brass clay excavation benefit
कुंभार समाजासाठी जारी करण्यात आलेल्या नव्या GR नुसार पात्र कुटुंबांना 700 ब्रासपर्यंत माती उत्खननासाठी स्वामित्वधनातून सूट देण्यात आली आहे.

Kumbhar Mati Utkhanan GR 2026: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने पारंपारिक कुंभार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना मोठा दिलासा देणारा निर्णय (GR) 10 जून 2026 रोजी जारी केला आहे. या निर्णयामुळे कुंभार समाजाला व्यवसायासाठी लागणारी माती मिळवणे अधिक सोपे होणार असून अनेक सवलतींचा लाभ देखील मिळणार आहे.

मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की मातीची भांडी, मडकी, दिवे, कौले, विटा आणि इतर पारंपारिक वस्तू तयार करण्यासाठी कुंभार बांधवांना कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही समस्या लक्षात घेऊन महसूल विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

संपूर्ण शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

700 ब्रास माती उत्खननासाठी सवलत

नवीन शासन निर्णयानुसार पारंपारिक कुंभार व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाला वर्षाला 700 ब्रासपर्यंत माती उत्खनन करण्याची परवानगी दिली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या मातीवर कोणत्याही प्रकारची रॉयल्टी आकारली जाणार नाही.

मात्र जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी (DMF) आणि इतर लागू शुल्क भरावे लागणार आहेत. त्याचबरोबर 700 ब्रासपेक्षा जास्त माती घेतल्यास नियमानुसार संपूर्ण रॉयल्टी आणि इतर शुल्क देखील भरावे लागणार आहे.

ओळखपत्र असणे आवश्यक आहे

शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या या सवलतींचा लाभ घेण्यासाठी कुंभार समाजातील; व्यक्तींना तहसीलदारांकडून विशेष ओळखपत्र मिळवणे बंधनकारक राहणार आहे.

Kumbhar Mati Utkhanan GR 2026 ओळखपत्रासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतील:

  • जात प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • फोटो
  • इतर आवश्यक कागदपत्रे

मित्रांनो, तुम्हाला “महाखनिज” प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्यानंतर तहसीलदारांकडून अर्जाची छाननी करून पात्र व्यक्तींना ओळखपत्र दिले जाईल. हे ओळखपत्र पाच वर्षांसाठी वैध राहणार आहे.

Kumbhar Mati Utkhanan GR 2026 राज्यात कुठेही मिळणार लाभ

महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात राहणारा पारंपारिक कुंभार समाजातील व्यक्ती हा लाभ घेण्यास पात्र असेल. एकदा ओळखपत्र मिळाल्यानंतर राज्यातील कोणत्याही भागात या योजनेच्या लाभ घेता येणार आहे. मात्र त्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करणे आवश्यक राहील.

माती उत्खननासाठी परवानगी घ्यावी लागणार

माती काढण्यासाठी आणि तिची वाहतूक करण्यासाठी संबंधित व्यक्तींना ऑनलाइन अर्ज करून परवानगी घ्यावी लागणार आहे.

अर्ज करताना माती उत्खननाचे ठिकाण, जमीन मालकाचे संमतीपत्र (लागू असल्यास), पंचनामा आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.

महत्त्वाचं म्हणजे परवानगी मिळाल्यानंतर माती वाहतूक करताना eTP (इलेक्ट्रॉनिक ट्रान्सपोर्ट पास) जवळ ठेवणे आवश्यक आहे. परवानगी किंवा वाहतूक पास नसल्यास कारवाई होऊ शकते.

तलाव आणि बंधाऱ्यातील गाळचाही वापर करता येणार

Kumbhar Mati Utkhanan GR 2026 गावतळी, पाझर तलाव, बंधारे, पाणलोट क्षेत्र आणि जलसंपदा विभागाच्या काही प्रकल्पांमधील गाळ किंवा माती कुंभार बांधवांना उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

यामुळे व्यवसायासाठी आवश्यक असलेली माती सहज उपलब्ध होणसीहोण्यास मदत होणार आहे. मात्र कुंभार बांधवांना संबंधित विभागाची ना-हरकत आणि आवश्यक परवानगी घेणे आवश्यक राहील.

“एक खिडकी योजना” सुरू होणार

मित्रांनो, कुंभार समाजातील व्यक्तींना विविध परवानग्यांसाठी अनेक कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर “एक खिडकी योजना” राबवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. एक खिडकी योजनेमुळे सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळू शकतील.

यामुळे आवश्यक परवानग्या आणि प्रक्रिया अधिक सुलभ होईल.

कुंभार बांधवांसाठी क्लस्टर उभारण्यावर भर

पारंपारिक व्यवसायाला चालना मिळावी आणि रोजगाराच्या नवनवीन संधी वाढाव्यात यासाठी कुंभार समाजाचे क्लस्टर तयार करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी शासकीय जमीन उपलब्ध असल्यास ती निश्चित करून कुंभार समाजासाठी राखीव ठेवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

Kumbhar Mati Utkhanan GR 2026 विटभट्टीबाबतही महत्त्वाची तरतूद

पारंपारिक पद्धतीने विटा तयार करणाऱ्या कुंभार बांधवांसाठी शासनाने काही महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत.

पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या त्याचबरोबर लहान पारंपारिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या विटभट्ट्यांच्या बाबतीत शासनाने काही नियमांबाबत सवलती दिल्या आहेत. मात्र नवीन विटभट्ट्या सुरू करताना स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असणार आहे.

Kumbhar Mati Utkhanan GR 2026 शासन निर्णयाचा फायदा कोणाला?

नवीन शासन निर्णय (GR) चा लाभ खालील व्यक्तींना मिळणार आहे:

  • पारंपारिक कुंभार समाजातील व्यक्ती
  • मातीची भांडी तयार करणारे कारागीर
  • मडकी, दिवे, कौले तयार करणारे व्यवसायिक
  • पारंपारिक विटभट्टी चालक
  • पिढ्यानपिढ्या कुंभार व्यवसाय करणारी कुटुंबे

⇒ हे देखील वाचा: ₹191 कोटींचा निधी, 19 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा फायदा

निष्कर्ष

Kumbhar Mati Utkhanan GR 2026 मित्रांनो, कुंभार समाजाच्या पारंपारिक व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 700 ब्रासपर्यंत मातीवरील रॉयल्टी माफी, ऑनलाइन परवानगी, ओळखपत्र तयार करणे, एक खिडकी योजना आणि क्लस्टर निर्मिती यामुळे हजारो कुंभार कुटुंबांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पारंपारिक माती उद्योगाला नवसंजीवनी मिळण्यास मदत होणार आहे.

धन्यवाद!