Kapus Kranti Yojana 2026: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस हे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख पीक आहे. मात्र गेल्या काही वर्षात उत्पादन खर्च वाढणे, हवामानातील बदल त्याचबरोबर पिकाला कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि उत्पादनातील चढ-उतार यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कापूस उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी “कापूस क्रांती योजना 2026” सुरू करण्याचा अतीशय महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे.
कापूस क्रांती योजनेअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे आणि वैज्ञानिक शेती पद्धतींचा वापर वाढवून कापूस उत्पादकांना अधिक उत्पादन मिळवून देण्यावर भर दिल जाणार आहे. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 19 प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांना या योजनेचा विशेष लाभ मिळणार आहे.
कापूस क्रांती योजना म्हणजे नक्की काय?
कापूस क्रांती योजना ही फक्त पैसे किंवा अनुदान देणारी योजना नाही. कापसाची शेती जास्त फायदेशीर कशी होईल, उत्पादन कसे वाढेल आणि शेतकऱ्यांच्या हातात जास्त पैसे कसे येतील यासाठी सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. चांगल्या दर्जाचे बियाणे, नवीन शेती पद्धती, कीड नियंत्रणाचे योग्य मार्गदर्शन आणि कापसाचा दर्जा सुधारण्यावर या योजनेत भर दिला जाणार आहे. म्हणजेच कमी खर्चात जास्त आणि चांगल्या दर्जाचा कापूस मिळावा, हा योजनेचा मुख्य हेतू आहे.
Kapus Kranti Yojana 2026 योजनेची प्रमुख उद्दिष्टे
कापूस क्रांती योजना 2026 ची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे:
- उत्पादनात वाढ:
- प्रति हेक्टर कापूस उत्पादन वाढविण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर वाढवला जाणार आहे.
- सुधारित बियाण्यांचा प्रसार:
- जास्त उत्पादन देणारी, हवामानातील बदलांना तोंड देणारी आणि कीड प्रतिरोधक बियाणे वापरण्यास प्रोत्साहन दिले जाईल.
- आधुनिक शेती तंत्रज्ञान:
- शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, डिजिटल सल्ला आणि आधुनिक लागवड पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- कापसाची गुणवत्ता सुधारणा:
- देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धात्मक दर्जाचा कापूस तयार करण्यावर भर असेल.
कापूस क्रांती योजनेसाठी किती निधी मंजूर?
शेतकरी बांधवांनो कापूस उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात राबविण्यात येणाऱ्या कापूस उत्पादकता अभियानासाठी सुमारे ₹5,659 कोटींची तरतूद केली आहे. या निधीच्या माध्यमातून सुधारित बियाणे, आधुनिक शेती तंत्रज्ञान, प्रशिक्षण कार्यक्रम, कीड व्यवस्थापन आणि संशोधनाला चालना दिली जाणार आहे.
त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यात या योजेनच्या अंमलबजावणीसाठी सुमारे ₹191 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचा वापर मुख्यतः कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये प्रात्यक्षिके, तांत्रिक मार्गदर्शन आणि उत्पादनवाढीसाठी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या भागांना होणार फायदा?
कापूस क्रांती योजनेचा लाभ मुख्यतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील 19 कापूस उत्पादक जिल्ह्यांना मिळणार आहे. खालील तपशील पहा:
- उत्तर महाराष्ट्र: जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, नाशिक
- मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली
- विदर्भ: बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ,वर्धा, नागपूर, चंद्रपूर
कोणत्या तंत्रज्ञानावर दिला जाणार भर?

कापूस क्रांती योजनेअंतर्गत खालील पद्धतींना प्रोत्साहन दिले जाणार आहे:
- उच्च घनता लागवड पद्धती (High Density Planting System-HDPS)
- कमी अंतरावरील लागवड
- एकात्मिक कीड व्यवस्थापन
- सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान
- आधुनिक खत व्यवस्थापन
- डिजिटल कृषी मार्गदर्शन
या उपाययोजनांमुळे कमी क्षेत्रात अधिक उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Kapus Kranti Yojana 2026 शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?

- कमी जागेत जास्त उत्पादन:
- योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास प्रति एकर उत्पादनात वाढ होऊ शकते.
- खर्चावर नियंत्रण:
- पाणी, खत आणि कीटकनाशकांचा योग्य वापर केल्याने उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल.
- चांगल्या दर्जाच्या कापसाला मागणी:
- गुणवत्तापूर्ण कापसाला बाजारपेठेत अधिक चांगला दर मिळेल.
- प्रशिक्षण आणि मार्गदर्शन:
- शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल.
⇒ दे देखील वाचा: फक्त 10% रक्कम भरून मिळणार मिनी ट्रॅक्टर? जाणून घ्या योजना
योजनेचा कालावधी काय आहे?
कापूस क्रांती योजना 2026-27 ते 2030-31 या कालावधीत राबवण्याचा प्रस्ताव आहे. या कालावधीत देशभरातील कापूस शेती अधिक सक्षम करण्यासोबतच उत्पादन आणि गुणवत्तेत वाढ घडवून आणण्यावर जास्त भर दिला जाणार आहे.
Kapus Kranti Yojana 2026 FAQ
कापूस क्रांती योजना 2026 काय आहे?
कापूस उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे.
महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना लाभ मिळणार आहे?
Kapus Kranti Yojana 2026 च्या माध्यमातून राज्यातील 19 प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांना लाभ मिळणार आहे.
Kapus Kranti Yojana 2026 चा मुख्य उद्देश काय आहे?
कापूस उत्पादन वाढवणे, गुणवत्ता सुधारणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जाणार आहे?
HDPS, सूक्ष्म सिंचन, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि सुधारित बियाणे यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
कापूस क्रांती योजनेचा कालावधी किती आहे?
ही योजना 2026-27 ते 2030-31 या कालावधीत राबवली जाणार आहे.
कापूस क्षेत्राशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही https://ecotton.dac.gov.in/ या सरकारी पोर्टलवर भेट देऊ शकता.
निष्कर्ष
शेतकरी मित्रांनो, Kapus Kranti Yojana 2026 कापूस क्रांती योजना 2026 ही कापूस उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींशी जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक अतीशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत सुधारित बियाणे, आधुनिक तंत्रज्ञान, कीड व्यवस्थापन आणि प्रशिक्षण यावर भर दिला जाणार आहे. आपल्या राज्यातील 19 प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांसाठी निधीची तरतूद करण्यात आल्याने राज्यातील कापूस क्षेत्राला चालना मिळणार आहे.
धन्यवाद!
