Mahila Shetkari Sakshamikaran Vidheyak 2026: राज्यातील लाखो महिलांना मिळणार ‘शेतकरी’ म्हणून स्वतंत्र ओळख?

Mahila Shetkari Sakshamikaran Vidheyak 2026 women farmers in Maharashtra

Mahila Shetkari Sakshamikaran Vidheyak 2026: राम राम मंडळी, राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकार यंदाच्या पावसाळी अधिवेशनात “महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026” सादर करण्याच्या तयारीत आहे. Women Farmer Empowerment Bill 2026 चा मुख्य उद्देश म्हणजे शेतीत काम करणाऱ्या महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळवून देणे हा आहे.

शेतकरी बांधवांनो, आजही आपल्या गावाकडं पहिलं तर शेतीची भरपूर कामं महिलाच करताना दिसतात. पेरणीपासून कापणीपर्यंत, जनावरांची देखभाल, चारा आणणे, दूध व्यवसाय, शेतातील रोजची कामं यामध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो. मात्र अनेक वेळा जमीन त्यांच्या नावावर नसल्यामुळे त्यांना अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता मिळत नाही.

शेतीत महिलांचा मोठा वाटा

सरकारकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग हा 81 टक्क्यांहून अधिक आहे. राज्यातील लाखो Women Farmers शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. एवढा मोठा वाटा असतानाही अनेक महिला सरकारी नोंदींमध्ये शेतकरी म्हणून दिसत नाही. त्यामुळे विविध योजनांचा लाभ मिळवताना त्यांना अडचणी येतात. हीच परिस्थिती बदलण्यासाठी राज्य सरकारकडून हे विधेयक आणण्याची तयारी सुरू आहे.

Mahila Shetkari Sakshamikaran Vidheyak 2026 अनेक वेळा शेतीतील संपूर्ण जबाबदारी महिलांवर असते. घरातील पुरुष नोकरीसाठी किंवा कामानिमित्त बाहेर गेलेले असतात. अशा वेळी शेतातील दैनंदिन कामांपासून ते जनावरांच्या देखभालीपर्यंत सर्व जबाबदाऱ्या महिलाच सांभाळतात. मात्र प्रत्यक्षात एवढं योगदान देऊनही अनेक महिलांना अधिकृत शेतकरी म्हणून ओळख मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढतात.

कोणत्या महिलांचा होऊ शकतो समावेश?

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 यामध्ये फक्त पारंपारिक शेती करणाऱ्या महिलांचाच विचार नाही, तर पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, मधमाशीपालन, बागायती, फुलशेती, मशरूम उत्पादन तसेच जंगलातून मिळणाऱ्या फळे, फुले, औषधी वनस्पती, मध किंवा इतर वनस्पती गोळा करण्याचे काम करणाऱ्या महिलांचाही अशा कृषीपूरक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचाही समावेश करण्याचा विचार सुरू आहे.

विशेष म्हणजे भूमिहीन महिला, भाडेकरू महिला शेतकरी, शेतमजूर महिला आणि स्थलांतरित कृषी कामगार महिलांनाही या नव्या कायद्याच्या चौकटीत आणण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शेतीशी थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या जोडलेल्या अनेक महिलांना याचा फायदा होऊ शकतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांचे सक्षमीकरण यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर महिला शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय सुविधा अधिक सुलभपणे पोहोचवण्यासाठी डिजिटल यंत्रणेचाही विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Mahila Shetkari Sakshamikaran Vidheyak 2026 या विधेयकाच्या माध्यमातून राज्यातील महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र नोंद ठेवण्याचाही विचार सुरू आहे. त्यामुळे शेतीत काम करण्याऱ्या महिलांची माहिती अधिक व्यवस्थितपणे उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते.

हे विधेयक का आणले जात आहे?

गेल्या काही वर्षांपासून महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देण्याची मागणी विविध स्तरावरून करण्यात येत होती. शेतीमधील महिलांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना शासकीय नोंदींमध्ये योग्य स्थान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता राज्यसरकार या विषयावर विधेयक आणण्याच्या तयारीत असल्यामुळे महिला शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

महिला शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या

एकूणच पाहता राज्यातील शेतीत मोलाचं योगदान देणाऱ्या महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी, हा या विधेयकाचा मुख्य हेतू आहे. पावसाळी अधिवेशनात हे विधेयक सादर झाल्यानंतर याबाबतची अधिक स्पष्ट माहिती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील महिला शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष आता या Mahila Shetkari Sakshamikaran Vidheyak 2026 महत्त्वाच्या निर्णयाकडे लागले आहे.

अधिक माहितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिकृत पोस्ट पहा

⇒ हे देखील वाचा: राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या इतर कृषी योजनांची संपूर्ण माहिती