NMNF Scheme 2025 राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान 2025: तब्बल ₹2481 कोटींची तरतूद! मिळवा ₹15,000 अनुदान आणि रासायनिक खर्चातून मुक्ती!

Table of Contents

NMNF Scheme 2025 In Marathi

NMNF Scheme 2025 राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान 2025: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या लेखात आपण राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान 2025 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या जीवनात अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरत आहेत. परंतु, या रासायनिक घटकांनी आपल्या जमिनीचे आरोग्य धोक्यात आणले आहे, तसेच उत्पादन खर्चही मोठ्याप्रमाणात वाढला आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी, भारत सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे, ते म्हणजेच “राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान”(NMNF).

हे अभियान केवळ शेतीची पद्धत बदलत नाही, तर शेतकऱ्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचे एक महत्त्वपूर्ण मिशन आहे.

मित्रांनो, NMNF Scheme अंतर्गत 2025-2026 पर्यंत ₹2481 कोटींच्या प्रचंड निधीची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे हे अभियान ₹15,000 प्रति हेक्टर अनुदानासह शेतकऱ्यांसाठी एक मोठी सरकारी हमी बनले आहे. या योजनेचा मुख्य आधार म्हणजे झिरो बजेट नॅच्युरल फार्मिंग आहे.

शेतकरी बांधवांनो या लेखात, आपण नैसर्गिक शेती अभियान नक्की काय आहे, या अभियानाचे उद्देश, फायदे, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे, त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी अर्ज कसा करायचा याची सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. चला तर मग, जाणून घेऊया कसे मिळेल अनुदान आणि रासायनिक खर्चातून कायमची मुक्ती!

NMNF Scheme 2025

NMNF Scheme 2025 राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (NMNF) संक्षिप्त माहिती

घटक सविस्तर माहिती
योजनेचे नावNational Mission On Natural Farming (NMNF)
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान
योजनेची सुरुवातनोव्हेंबर 2024
योजना कोणी सुरू केलीभारत सरकार (केंद्र पुरस्कृत योजना)
विभागकेंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
राज्यमहाराष्ट्र राज्यासह भारतातील सर्व राज्यांमध्ये लागू
एकूण तरतूद (२०२५-२०२६)₹2481 कोटी
यामध्ये भारत सरकारचा ₹1584 आणि राज्यांचा वाटा ₹897 कोटी आहे.
योजनेचे उद्देशरासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर शून्य करणे आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे.
लाभ/अनुदान₹15,000 पर्यंत प्रति हेक्टर आर्थिक प्रोत्साहन
ऑनलाइन अर्ज➡️mahadbt.maharashtra.gov.in⬅️
अधिकृत वेबसाइट➡️https://naturalfarming.dac.gov.in/⬅️

NMNF Scheme 2025: NMNF चा आधारस्तंभ झिरो बजेट नॅच्युरल फार्मिंग (ZBNF)

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानामध्ये पारंपारिक आणि नैसर्गिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, जे शेतकऱ्यांचा खर्च शून्यावर आणते:

  1. बीजामृत: बियाण्यांना पेरणीपूर्वी देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि माती या नैसर्गिक घटकांनी प्रक्रिया करणे, ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ति वाढते
  2. जीवामृत: देशी गायीचे शेण, गोमूत्र, गूळ आणि बेसन यांचे मिश्रण वापरुन बनवलेले जिवाणू संवर्धन, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.
  3. आच्छादन: पिकांचे अवशेष किंवा झाडांचा पालापाचोळा वापरुन जमीन झाकणे, ज्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो.
  4. वाफसा: जमिनीत हवा आणि पाण्याचे योग्य संतुलन राखणे.

NMNF Scheme 2025: राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान प्रमुख लाभ आणि अनुदान

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान 2025 च्या माध्यमातून लाभ आणि अनुदान किती मिळणार आहे?

● शेतकऱ्यांसाठी आर्थिक लाभ आणि अनुदान

  • अनुदान रक्कम: शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी, प्रशिक्षण आणि प्रमाणीकरणासाठी ₹15,000 प्रति हेक्टर पर्यंत आर्थिक मदत.
  • खर्च कपात: रासायनिक खतांचा वापर थांबल्यामुळे उत्पादन खर्च 80% पर्यंत कमी होतो, ज्यामुळे शेतकऱ्यांचा निव्वळ नफा वाढतो.

NMNF Scheme 2025: आवश्यक कागदपत्रे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान 2025 च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • जमिनीचे कागदपत्रे (7/12 उतारा व 8 अ उतारा)
  • बँक खात्याचा तपशील
  • शपथपत्र
  • जातीचा दाखला
  • फोटो
  • मोबाईल नंबर

NMNF Scheme 2025: अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान 2025 च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे?

  • राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान 2025 च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना सर्वप्रथम आपले खाते तयार करावे लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबईलवर ➡️mahadbt.maharashtra.gov.in⬅️ ही वेबसाइट उघडा.
NMNF Scheme 2025
  • त्यानंतर तुम्हाला ‘नवीन अर्जदार नोंदणी” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून OTP च्या सहाय्याने लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल.
  • आता तुमची लॉगिन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ‘माझे प्रोफाइल’ मध्ये जाऊन तुमची वैयक्तिक माहिती, बँक खाते (आधारशी लिंक असलेले) त्याचबरोबर जमिनीचा 7/12 आणि 8 अ उतारा ई माहिती काळजीपूर्वक अचूकपद्धतीने भरायची आहे.
  • आता तुम्हाला मेनूमध्ये ‘योजना अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर
    • विभाग: कृषी विभाग निवडायचा आहे.
    • योजना: सेंद्रिय/ नैसर्गिक शेती संबंधित योजना हा पर्याय निवडायचा आहे.
    • घटक: राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (NMNF) हा घटक निवडावा लागेल.
  • आता तुम्हाला अर्जाचा तपशील भरावा लागेल, त्यासाठी तुम्ही किती जमिनीवर नैसर्गिक शेती करणार आहात, ही संख्या नमूद करावी लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्ही नैसर्गिक शेती क्लस्टर मध्ये सहभागी असल्याची माहिती भरा.
  • वरील संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहेत.
  • आणि शेवटी तुम्हाला अर्ज शुल्क ऑनलाइन स्वरूपात भरल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.

NMNF Scheme 2025: पडताळणी आणि अनुदान मिळणे

  1. निवड: महाडीबीटीच्या प्रणालीतून तुमची निवड झाल्यावर, तुम्हाला SMS द्वारे माहिती मिळेल.
  2. कृषी अधिकारी भेट: निवड झाल्यावर, तालुका कृषी अधिकारी तुमच्या शेतावर येऊन कागदपत्रांची आणि तुम्ही नैसर्गिक शेती सुरू करण्याच्या तयारीची प्रत्यक्षरीत्या पाहणी करतील.
  3. अनुदान जमा: कृषी अधिकाऱ्यांकडून अंतिम मंजुरी मिळाल्यावर ₹15,000 अनुदानाची रक्कम थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाईल.

सारांश

नैसर्गिक शेती स्वीकारल्यास शेतकरी केवळ आपले उत्पन्न वाढवत नाहीत, तर पुढच्या पिढीसाठी आरोग्यदायी जमीन आणि विषमुक्त अन्न निर्माण करतात.

त्यामुळे आजच महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा आणि या नैसर्गिक क्रांतीचा भाग व्हा.

शेतकरी मित्रांनो, आम्ही तुम्हाला “National Mission On Natural Farming (NMNF) राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana 2025:भजनी मंडळांना शासनाद्वारे मिळणार 25,000 रुपये अनुदान!!Aai Karj Yojana Apply Online 2025:महिलांसाठी खुशखबर! आता महिलांना मिळणार 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज!
Ladki Bahin Yojana E-KYC Update 2025: आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजना ई-केवायसी मुदत वाढली|Rooftop Solar Yojana Maharashtra 2025: स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार योजना|
Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project 2.0 (Pocra 2.0):पोकरा योजना 2.0 ऑनलाइन अर्ज सुरू, संपूर्ण माहिती|Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2025:प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची संपूर्ण माहिती|
Pm Dhan Dhanya Krishi Yojana 2025: देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ!!Kalakar Mandhan Yojana 2025: आता सरकारकडून कलाकारांना मिळणार दरमहा 3150 रुपये आर्थिक मदत!

NMNF Scheme 2025: FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

“National Mission On Natural Farming (NMNF) राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान” 2025 च्या माध्यमातून किती अनुदान मिळते?

₹15,000 प्रति हेक्टर

National Mission On Natural Farming (NMNF) चा ऑनलाइन अर्ज कुठ करायचा?

तुम्ही महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकताय.

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान यासाठी कोणती मुख्य कागदपत्रे आहेत?

आधार कार्ड आणि जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा

ZBNF चा अर्थ काय?

झिरो बजेट नैसर्गिक शेती (Zero Budget Natural Farming)

NMNF Scheme 2025 साठी कितीची तरतूद करण्यात आली आहे?

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानासाठी एकूण ₹2481 कोटी यामध्ये भारत सरकारचा ₹1584 आणि राज्यांचा वाटा ₹897 कोटी आहे.