Online 7/12 Download 2025: घरबसल्या मिळवा जमिनीचा अधिकृत पुरावा!! असा करा डाउनलोड 7/12 व 8 अ उतारा|

Table of Contents

Online 7/12 Download In Marathi 2025

Online 7/12 Download 2025: नमस्कार मित्रांनो, आजच्या या महत्वपूर्ण लेखात आपण घरबसल्या आपल्या जमिनीचा 7/12 आणि 8 अ उतारा कसा डाउनलोड करू शकतो या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आजच्या या डिजिटल युगात विविध सरकारी सेवा आपल्याला घरबसल्या आपल्या मोबाईल मध्ये घेता येत आहेत. त्या सर्व सेवांपैकी सर्वात महत्वाची सेवा म्हणजे आपल्या जमिनीचा सातबारा (7/12) आणि आठ अ (8 अ) उतारा घरबसल्या काढणे होय.

शेतकरी बांधवांनो जमिनीच्या मालकीचा सर्वात महत्वाचा दस्तऐवज म्हणजेच सातबारा उतारा. पूर्वी आपल्या जमिनीचा सातबारा उतारा काढण्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयात जावे लागायचे, सेवा केंद्रांवर रांगेत तासंतास उभे राहावे लागायचे, पण आता हे काम आपण घरबसल्या फक्त 5 मिनिटांमध्ये करू शकतो.

आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारने “डिजिटल स्वाक्षरी सातबारा” सुविधा सुरू केल्यामुळे हा उतारा आता कायदेशीररीत्या वैध झाला आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने Maha e-Bhumi (महाभूमी) पोर्टल सुरू केले आहे. जेणेकरून तुम्ही तुमच्या जमिनीचा डिजिटल साईन असलेला सातबारा उतारा आणि 8 अ उतारा अवघ्या काही मिनिटांत डाउनलोड करू शकणार आहात.

चला तर मग मित्रांनो, आपण या लेखात ऑनलाइन 7/12 कसा डाउनलोड करू शकतो, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. कृपया हा लेख संपूर्ण वाचा त्याचबरोबर आपल्या जवळील मित्रांना आणि नातेवाईकांना देखील शेअर करण्यास विसरू नका.

Online 7/12 Download 2025

Online 7/12 Download 2025: 7/12 आणि 8 अ उतारा फरक आणि महत्व

● सातबारा (7/12) उतारा म्हणजे काय? (गाव नमूना 7 व 12)

  • जमिनीचा एक महत्वाचा कायदेशीर पुरावा.
  • यामध्ये जमिनीचा गट क्रमांक, जमिनीचे क्षेत्रफळ, मालकाचे नाव आणि पिकांची नोंद असते.
  • जमीन खरेदी-विक्री आणि बँक कर्ज घेण्यासाठी आवश्यक.

● आठ अ (8 अ) उतारा म्हणजे काय? (खातेपुस्तकाचा उतारा)

  • याला खाते उतारा किंवा खातेपुस्तकही म्हंटले जाते.
  • यामध्ये प्रामुख्याने एका खातेदाराच्या म्हणजेच मालकाच्या नावावर त्या गावात असलेल्या सर्व जमिनीची नोंद एकत्र दिलेली असते.
  • यामुळे, खातेदाराच्या नावावर एकूण किती जमीन आहे, याची माहिती मिळते.

Online 7/12 Download 2025: डिजिटल सातबारा उताऱ्याचे फायदे

  1. वेळेची बचत: सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.
  2. कायदेशीर वैधता: शासनाची डिजिटल स्वाक्षरी असल्यामुळे सर्वत्र वैध.
  3. तत्काळ उपलब्धता: इंटरनेट असल्यास कधीही आणि कुठेही डाउनलोड करता येतो.
  4. पारदर्शकता: कोणत्याही मध्यस्थ म्हणजेच एजेंट न लागता थेट शासनाकडून उतारा मिळतो.
  5. अचूकता: संगणक प्रणालीवर असल्याने चुका होण्याची शक्यता कमी.

डिजिटल 7/12 व 8 अ उतारा डाउनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया (step-by-step guide)

चला तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया तुम्ही घरबसल्या तुमच्या जमिनीचा सातबारा आणि 8A उतारा कसा पाहू शकताय?

पायरी 1: अधिकृत संकेतस्थळ आणि लॉगिन

  • महाराष्ट्र महसूल विभागाच्या डिजिटल स्वाक्षरी सातबारा पोर्टल (digitalsatbara.mahabhumi.gov.in) वर जा.
Online 7/12 Download 2025
  • ‘Regular Login’ किंवा ‘OTP Based Login’ वापरुन तुमच्या खात्यात प्रवेश करा.
  • तुम्ही जर नवीन वापरकर्ते असाल तर तुम्हाला प्रथम नोंदणी करावी लागणार आहे.

पायरी 2: जिल्हा, तालुका आणि गाव निवडा

  • स्क्रीनवर दिसणाऱ्या ड्रॉप-डाऊन मेन्यूमधून तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
  • आता तुम्ही तुम्हाला हवा असलेला उतारा निवडा (7/12 किंवा 8 अ)

पायरी 3: गट क्रमांक/खाते क्रमांक टाकून तपशील शोधा

  • 7/12 काढण्यासाठी तुमच्या जमिनीचा गट क्रमांक (Survey Number) किंवा उप-विभाग क्रमांक अचूकपणे टाका.
  • 8 अ साठी तुम्हाला तुमचा खाते क्रमांक टाकावा लागणार आहे.
  • आता माहिती भरल्यानंतर तुम्ही ‘Search’ या बटणावर क्लिक करा.

पायरी 4: ऑनलाइन शुल्क भरा

  • उतारा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला प्रती उतारा 15 रुपये इतकी रक्कम भरावी लागेल.
  • आता तुम्हाला वर क्लिक करून UPI/नेट बँकिंग/डेबिट कार्ड द्वारे पेमेंट प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

पायरी 5: डिजिटल स्वाक्षरीसह उतारा डाउनलोड करा

  • पेमेंट यशस्वी झाल्यावर तुम्हाला तुमचा उतारा डाउनलोड करण्याची लिंक उपलब्ध होईल.
  • त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही उतारा डाउनलोड करू शकताय.

सारांश

शेतकरी मित्रांनो, आम्ही तुम्हाला “Online 7/12 Download 2025” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana 2025:भजनी मंडळांना शासनाद्वारे मिळणार 25,000 रुपये अनुदान!!Aai Karj Yojana Apply Online 2025:महिलांसाठी खुशखबर! आता महिलांना मिळणार 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज!
Ladki Bahin Yojana E-KYC Update 2025: आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजना ई-केवायसी मुदत वाढली|Rooftop Solar Yojana Maharashtra 2025: स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार योजना|
Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project 2.0 (Pocra 2.0):पोकरा योजना 2.0 ऑनलाइन अर्ज सुरू, संपूर्ण माहिती|Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2025:प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची संपूर्ण माहिती|
Pm Dhan Dhanya Krishi Yojana 2025: देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ!!Kalakar Mandhan Yojana 2025: आता सरकारकडून कलाकारांना मिळणार दरमहा 3150 रुपये आर्थिक मदत!

Online 7/12 Download 2025 FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 कायदेशीर वैध असतो का?

होय, नक्कीच! महाराष्ट्र शासनाची डिजिटल स्वाक्षरी असल्यामुळे हा उतारा कोणत्याही सरकारी, निम सरकारी किंवा खासगी कामांसाठी कायदेशीररीत्या पूर्णपणे वैध आहे. यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात सही-शिक्क्याची वेगळी गरज नसते.

7/12 उतारा डाउनलोड करण्यासाठी किती शुल्क लागतो?

डिजिटल सातबारा किंवा 8 अ उतारा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला प्रती उतारा 15 रुपये इतका शुल्क लागतो.

तुम्ही एकाच वेळी किती उतारे डाउनलोड करू शकता?

तुम्ही एकाच वेळी 10, 20, 30, 40 किंवा 50 पर्यंत उतारे खरेदी करून डाउनलोड करू शकताय.

ऑनलाइन सातबारा डाउनलोड करण्यासाठी कोणती वेबसाइट वापरली जाते?

7/12 उतारा आणि 8 अ उतारा ऑनलाइन काढण्यासाठी महाराष्ट्र महसूल विभागाच्या डिजिटल स्वाक्षरी सातबारा पोर्टल (digitalsatbara.mahabhumi.gov.in) या पोर्टल चा वापर केला जातो.

हे पोर्टल 24 तास उपलब्ध असते का?

होय, हे पोर्टल 24 तास उपलब्ध असते.