Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana 2025:भजनी मंडळांना शासनाद्वारे मिळणार 25,000 रुपये अनुदान!!

Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana In Marathi 2025

Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana 2025: नमस्कार मित्रांनो, आपल्या राज्यातील भजनी मंडळांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, आपण आजच्या या लेखात राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या “महाराष्ट्र भजनी मंडळ अनुदान योजना 2025” ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 24 नोव्हेंबर 2025 रोजी नवीन शासन निर्णय GR जारी केला आहे. यामध्ये प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्र राज्यातील पारंपारिक लोककलेला चालना व प्रोत्साहन देण्यासाठी त्याचबरोबर राज्यातील भजनी मंडळांना सक्षम करण्यासाठी एकूण 4 कोटी 50 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

भजनी मंडळ भांडवली अनुदान योजना 2025 च्या माध्यमातून 1800 भजनी मंडळांना प्रत्येकी 25,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया ही योजना नेमकी काय आहे? या योजनेची सुरुवात कोणी आणि कधी केली? या योजनेचे उद्देश काय आहे? या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र आहेत? त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या अर्जदारांना कोणती कोणती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी अर्ज सादर कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पाहणार आहोत.

Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana 2025

भजनी मंडळ भांडवली अनुदान योजना 2025

योजनेचे नावMaharashtra Bhajani Mandal Anudan Yojana 2025
(महाराष्ट्र भजनी मंडळ अनुदान योजना 2025)
योजनेची सुरुवात कोणी केलीमहाराष्ट्र शासन
विभागपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन
योजनेचे उद्देशमहाराष्ट्र राज्यातील लोककला त्याचबरोबर पारंपारिक कलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आणि भजनी मंडळांना वाद्य आणि साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत करणे
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ25 हजार रुपयांचे भांडवली अनुदान
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील भजनी मंडळे
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana 2025 योजनेचे उद्देश

● चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “भजनी मंडळ भांडवली अनुदान योजना 2025” चे काय काय उद्देश आहेत?

  • महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana 2025 (महाराष्ट्र भजनी मंडळ अनुदान योजना 2025) चे मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्यातील लोककला, विशेषतः भजन तसेच कीर्तन या पारंपारिक कलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्याचबरोबर भजनी मंडळांना वाद्य आणि साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणे.

अनुदान रक्कम आणि वापर

  • या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या 1800 भजनी मंडळांना प्रत्येकी 25,000 रुपये अनुदान दिले जाईल.
  • या रकमेतून भजनी मंडळांनी वाद्य (हार्मोनियम, मृदुंग, पखवाज, वीणा, तंबोरा, एकतारी, टाळ) त्याचबरोबर आवश्यक भजन साहित्य खरेदी करणे आवश्यक आहे.

Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana 2025 पात्रता

● चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र भजनी मंडळ अनुदान योजना 2025” साठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे?

  • सदस्य संख्या – भजनी मंडळामध्ये किमान 20 सदस्य असणे आवश्यक आहेत.
  • कार्यक्रम – भजनी मंडळाने एका वर्षात किमान 50 कार्यक्रम सादर केलेले असावेत. तसेच पूर्णवेळ व्यवसाय करणारी भजनी मंडळे असावीत.
  • नोंदणी – भजनी मंडळ नोंदणीकृत असावे.

Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana 2025 निवड प्रक्रिया

● चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र भजनी मंडळ अनुदान योजना 2025” साठी निवड प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे?

  • सदर योजनेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • निवड प्रक्रिया ही “प्रथम अर्ज दाखल करणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वानुसार केली जाणार आहे.
  • पात्र असलेल्या आणि ऑनलाइन पोर्टलवर सर्वात प्रथम अर्ज करणाऱ्या 1800 भजनी मंडळांची निवड केली जाईल.

Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana 2025 आवश्यक कागदपत्रे

● चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र भजनी मंडळ अनुदान योजना 2025” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • स्थानिक संस्थेने तसेच ग्रामपंचायतीने दिलेले मंडळाच्या अस्तित्वाचे प्रमाणपत्र.
  • मंडळाच्या बँक खात्याचा तपशील (बँक खाते नंबर, IFSC कोड)
  • मंडळाच्या भजनांच्या कार्यक्रमांचे पुरावे (आयोजकाचे पत्र, हँडबिल, कार्यक्रम सादरीकरणाचा पुरावा)
  • भजनी मंडळाच्या कार्याची माहिती आणि इतर मागील कामगिरीची नोंद (कार्यक्रमांचे फोटो, स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या)
  • आणि आवश्यक असल्यास मंडळाचे पॅन कार्ड

Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana 2025 अर्ज करण्याची प्रक्रिया

● चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र भजनी मंडळ अनुदान योजना 2025” चा अर्ज कसा करायचा आहे?

  • Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana 2025 (महाराष्ट्र भजनी मंडळ अनुदान योजना 2025) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.
Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana 2025
  • अधिकृत संकेतस्थळ उघडल्यानंतर तुम्हाला होमपेज वरील “संस्था/भजनी मंडळ नोंदणी” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana 2025
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नोंदणीचा अर्ज उघडेल.
  • त्यामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  • संपूर्ण विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल ओटीपी च्या सहाय्याने लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल, त्यामध्ये सदस्य संख्या, बँक खाते तपशील, तुमचा संपर्क क्रमांक ई. माहिती भरावी लागेल.
  • अर्ज संपूर्ण भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.
  • आणि शेवटी संपूर्ण आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला “सबमिट” या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • अशा अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो, तुम्ही तुमची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकताय.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “महाराष्ट्र भजनी मंडळ अनुदान योजना 2025” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
मोफत शौचालय योजना 2024ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024
विहीर अनुदान योजना २०२४ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
शेळी पालन योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
अपंग पेन्शन योजना 2024कन्या वन समृद्धी योजना 2024
अटल बांबू समृद्धी योजना 2024प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024
मृदा आरोग्य कार्ड योजना 2024डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024

कृपया ही सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी योजनांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.