Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana in Marathi 2024
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024 ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जसे की, काय आहे ही योजना? कोण कोण या योजनेचा फायदा घेऊ शकतो? या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास कोणते नियम व अटी आहेत/ सदर योजनेचा अर्ज कसा भरावा? आणि सर्वात महत्वाच म्हणजेच या योजनेचा लाभ आपण कशा प्रकारे घेऊ शकतो? ई सर्व माहिती आपण खाली दिलेल्या माहितीमध्ये पाहणार आहोत, आणि म्हणूनच मित्रांनो, तुम्ही खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचाल अशी आम्ही आशा करतो. चला तर मग “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024” बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मित्रांनो, आपल्या देशातील तसेच राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी तसेच नागरिकांचे भविष्य उज्वल होण्यासाठी आपले केंद्र सरकार त्याचप्रमाणे राज्य सरकार सतत नवनवीन योजना सुरू करत असतात. यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार कायम प्रयत्नशील असतात. मित्रांनो, महाराष्ट्र सरकार वेळोवेळी नवीन योजनांची अंमलबजावणी करत असत. जसे की विविध प्रकारच्या विमा योजना, राज्यातील तरुणांसाठी विवध प्रकारच्या कर्ज योजना जेणे करून आपल्या राज्यातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे रहाता यावे, त्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, त्याचबरोबर आरोग्य सुविधा, आपल्या देशातील तसेच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना व अर्थसहाय्य योजना आणि महत्वाचं म्हणजेच राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी निवृत्ती वेतन योजना, त्याचप्रमाणे अपंग तसेच विधवा महिलांसाठी पेन्शन योजना अशा अनेक नवनवीन योजना सरकार राबवत असते.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024: योजनेची संपूर्ण माहिती
आपल्या देशातील व राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदान आणि कर्जमुक्ती योजना देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार राबवत असते. मित्रांनो, अशीच एक योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ती म्हणजेच “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024” होय.
राज्यातील शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे अशा प्रकारच्या अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात या मुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अनेक अडचणींची परिस्थिती निर्माण होते, अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास आणि त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता कोणतेही स्वतंत्र विमायोजना नसल्यामुळे शासनाने सन 2005-06 पासून अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी विमा योजना कार्यान्वित केली.
मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी हे दारिद्रय रेषेखाली आपले जीवन जगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. यामुळे अशा शेतकऱ्यांना स्वतःचा तसेच आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांचा विमा उतरवणे शक्य होत नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे ते विमा काढू शकत नाहीत. असे असल्यास एखाद्या शेतकऱ्याला किंवा इतर कुटुंबातील सदस्यांना शेतात काम करताना एखाद्या कारणामुळे अपघात झाल्यास किंवा त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला जगण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात.
म्हणूनच, या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करून महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना” सुरू करण्याचा एक उत्तम असा निर्णय घेतला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024 अंतर्गत शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य, आई -वडील, शेतकऱ्याची पत्नी. शेतकऱ्याचा मुलगा आणि अविवाहित मुलगी, 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण 2 व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024:थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024 चे परिपत्रक डाउनलोड करा
योजनेचे संपूर्ण नाव | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना |
योजना कोनाद्वारे सुरू करण्यात आली | महाराष्ट्र सरकार |
या योजनेचा लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
या योजने अंतर्गत किती लाभ मिळणार | 2,00,000/- रुपये विमा |
योजेनचे उद्देश | महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विमा प्रदान करणे |
विभाग | कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य |
सदर योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन अर्ज पद्धत |
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024: लाभार्थी पात्रता
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024 चा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ निवासी असणे आवश्यक आहे.
- महसूल नोंदी नुसार खातेदार असलेला शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य महाराष्ट्र राज्यातील १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकूण २ व्यक्तींना लाभ घेता येईल.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024: योजने अंतर्गत किती लाभ मिळणार ?
अपघाताचे कारण | नुकसान भरपाई (एकूण रक्कम) |
---|---|
अपघाती मृत्यू झाल्यास | 2 लाख |
अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास | 2 लाख |
अपघातामुळे एक डोळा आणि एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास | 2 लाख |
अपघातामुळे एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास | 1 लाख |
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024: योजनेचे मुख्य उद्देश
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची सुरुवात शेतकऱ्याला समाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना व त्यांच्या परिवारांना संकट कालावधी विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली गेली आहे.
- शेती हा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असतात. शेती हा व्यवसाय करताना त्यांचा अपघात झाला किंवा परिणामी मृत्यू झाला, अशावेळी शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- जेणे करून कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा त्यांना अपंगत्व आल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये, या उद्देशाने देखील या योजनेची सुरुवात केली गेली आहे.
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनविणे.
- त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी या योजनेची सुरुवात केली गेली आहे.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024: योजनेमध्ये समाविष्ठ असलेल्या बाबी खालीलप्रमाणे
- रस्ता /रेल्वे अपघात
- पाण्यात बुडून मृत्यू
- जंतुनाशके हताळताना किंवा इतर कारणाने विषबाधा
- विजेचा धक्का बसल्याने झालेला अपघात
- विज पडून मृत्यू
- खून
- उंचावरून पडून झालेला अपघात
- सर्पदंश /विंचूदंश
- नक्षलवादी कडून झालेल्या हत्या
- जनावरांच्या चावल्यामुळे जखमी /किंवा मृत्यू
- बाळंतपणातील मृत्यू
- दंगल
- अन्य कोणतेही अपघात
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024: योजनेमध्ये समाविष्ठ नसलेल्या बाबी खालीलप्रमाणे
- नैसर्गिक मृत्यू
- विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व
- आत्महत्येचा प्रयत्न
- आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे
- गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
- अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात
- भ्रमिष्ठपणा
- शरिरा अंतर्गत रक्तस्राव
- मोटार शर्यतीतील अपघात
- युद्ध
- सैन्यातील नोकरी
- जवळच्या लाभधारकांकडून खून
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024: योजनेचे फायदे खालीलप्रमाणे
- शेती व्यवसाय करत असताना शतकऱ्याला भरपूर अढथळे येत असतात. शेतात काम करत असताना शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर उपाशी झोपण्याची वेळ येऊ नये, त्यांच्यावर आर्थिक संकट येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकार अपघातग्रस्त कुटुंबाला २ लाख रुपये आर्थिक मदत करते.
- काम करत असताना शेतकऱ्याचा अपघात होऊन मृत्यू झाल्यास किंवा अपघातात २ डोळे किंवा २ अवयव निकामी झाल्यास सरकार कडून २ लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
- अपघातामुळे शेतकऱ्याचा १ डोळा व १ अवयव निकामी झाल्यास व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १ लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते.
- Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024 अंतर्गत शेतकऱ्यांना विम्याच्या हप्ता भरण्याची आवश्यकता नाही कारण महाराष्ट्र सरकार विम्याची रक्कम स्वतः भरते.
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आत्मनिर्भर व स्वावलंबी बनतील.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024 अंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी आपल्या ऑफलाइन अर्जासोबत खाली दिलेली सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- ७/१२ उतारा
- मृत्यूचा दाखला
- शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमूना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद.
- वारसदाराचे ओळखपत्र (आधार कार्ड/पॅनकार्ड /बँक पासबुक/ निवडणूक ओळखपत्र
- अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला :- जन्म दाखला /शाळा सोडल्याचा दाखला /शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र /ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र /आधार कार्ड /पॅन कार्ड /वाहन चालविण्याचा परवाना /पारपत्र /निवडणूक ओळखपत्र या पैकी कोणतेही एक कागदपत्र
- प्रथम माहिती अहवाल /घटनास्थळ पंचनामा/पोलिस पाटील माहिती अहवाल
- अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम प्रस्तावासोबत सादर करावायचे कागदपत्र (पपत्र-अ)
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024:अर्ज करण्याची पद्धत
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे; जाणून घेऊया |
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024 साठी म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याने सर्व प्रथम जवळच्या जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात जायचे आहे.
- जवळच्या जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा.
- आणि अर्जात सर्व माहिती अचूकपणे आणि सविस्तर पूर्णपणे भरावी.
- त्याचप्रमाणे वर दिलेल्या आवश्यक कागदपत्रांची यादी लक्षात घेऊन म्हणजेच दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे आपल्या अर्जासोबत जोडावीत.
- आणि नंतर अर्ज कार्यालयात जमा करावा.
- मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024 चे अर्ज करू शकताय.
➡️गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024 चे परिपत्रक डाउनलोड करा ⬅️
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024 ” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
कृपया ही सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी योजनांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024:FAQ’s
“गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024” कोनाद्वारे सुरू केली गेली आहे?
महाराष्ट्र सरकार
या योजनेचे उद्देश काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विमा प्रदान करणे
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024 चा अर्ज कसा करायचा आहे?
ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.