Sukanya Samriddhi Yojana In Marathi 2024:सुकन्या समृद्धी योजना;येथे पहा संपूर्ण माहिती!!

Sukanya Samriddhi Yojana 2024

Sukanya Samriddhi Yojana In Marathi 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात “सुकन्या समृद्धी योजना 2024” ची सविस्तर आणि पुरेपूर माहिती जाणून घेणार आहोत. जसे की, काय आहे ही योजना? कोण कोण या योजनेचा फायदा घेऊ शकतो? या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास कोणते नियम व अटी आहेत/ सदर योजनेचा अर्ज कसा भरावा? आणि सर्वात महत्वाच म्हणजेच या योजनेचा लाभ आपण कशा प्रकारे घेऊ शकतो? ई सर्व माहिती आपण खाली दिलेल्या माहितीमध्ये पाहणार आहोत, आणि म्हणूनच मित्रांनो, तुम्ही खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचाल अशी आम्ही आशा करतो. चला तर मग “सुकन्या समृद्धी योजना 2024” बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो, राज्य सरकार आपल्या राज्यातील आणि केंद्र सरकार आपल्या देशातील मुलींचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा म्हणून कायम प्रयत्नशील असते. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य शासन बँक तसेच पोस्ट ऑफिस विभागाद्वारे गुंतवणुकीच्या अनेक विविध प्रकारच्या योजना सुरू करत असतात. मित्रांनो आपल्या देशातील आणि राज्यातील मुलींच्या उत्तम भविष्यासाठी त्याचबरोबर बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानअंतर्गत आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे “सुकन्या समृद्धी योजना” सुरू करण्यात आलेली आहे.

आपल्या मुलींचे शिक्षण, त्यांचे आरोग्य, त्याचप्रमाणे मुलींचे लग्न तसेच आपल्या मुलींच्या उज्वल आणि उत्तम भविष्य घडवण्यासाठी खूप कमी गुंतवणुकीची हि एक बचत योजना आहे. आपल्या राज्यातील मुलींच्या पालकांना त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी, ऊतम आरोग्यासाठी तसेच आपल्या मुलींच्या लग्नासाठी लागणारा पैसा जमा करण्यासाठी “सुकन्या समृद्धी योजना” प्रोत्साहन देते. मित्रांनो, “सुकन्या समृद्धी योजना” प्रामुख्याने मुलींसाठी म्हणजेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सुरू केली गेली आहे. त्याचप्रमाणे ही योजना केंद्र शासनाची सर्वात कमी गुंतवणुकीची एक बचत योजना आहे.

मित्रांनो, कोणताही भारतीय व्यक्ती 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या आपल्या मुलींसाठी ” “सुकन्या समृद्धी योजना “(Sukanya Samriddhi Yojana) मध्ये गुंतवणूक सुरू करू शकतोय. जेणेकरून आपल्या मुलींचे शिक्षण, आरोग्यासाठी व लग्नासाठी त्याचा फायदा होईल. मुलीच्या जन्मानंतर ती 10 वर्षांची होईपर्यंत कधीही खाते उघडले जाऊ शकते. Sukanya Samriddhi Yojana अंतर्गत मुलीच्या जन्मापासून ती 10 वर्षाची होई पर्यंत आपल्या क्षेत्रातील कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा डाक कार्यालयात मुलीचे नावे सुकन्या खाते उघडता येते. त्याचबरोबर मुलीचे वय 18 वर्ष होईपर्यंत कायदेशीर पालक किंवा पालकांद्वारे ही रक्कम जमा केली जाऊ शकते. महत्वाच म्हणजेच मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर ती एकटीच खाते चालवू शकते.

सध्या ही योजना तुमच्या गुंतवणुकीवर 7.6% व्याज देत आहे. यासाठी तुम्ही वार्षिक किमान 250 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. त्याचबरोबर मित्रांनो मुलीसाठी 15 वर्षांसाठी योजनेत योगदान देता येईल.

Sukanya Samriddhi Yojana In Marathi 2024

Sukanya Samriddhi Yojana In Marathi 2024:सुकन्या समृद्धी योजना 2024 सविस्तर माहिती

योजनेचे नावसुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)
लाभार्थीभारत देशातील सर्व राज्यातील 10 वर्षे वयोगटातील मुली
उद्देशमुलींचे भविष्य सुधारणे
लाभआर्थिक सहाय्य
सुरू केले होतेकेंद्र सरकार
गुंतवणुकीची रक्कमकमीत कमी 250 रुपये, जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये
गुंतवणूक कालावधी15 वर्षांपर्यंत
गुंतवणुकीवर व्याज दर8% प्रतिवर्ष
वर्ष2024
योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन अर्ज पद्धत

➡️सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) चा अर्ज डाउनलोड करा⬅️

Sukanya Samriddhi Yojana In Marathi 2024: योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत? जाणून घेऊया;

  • मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना ही भारत देशातील मुलींसाठी सुरू करण्यात आलेली एक कमी गुणवणूक आणि महत्वाकांक्षी योजना आहे.
  • सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे.
  • त्याचबरोबर महत्वाच म्हणजेच या योजनेला भारत सरकारचे पाठबळ असल्यामुळे मुलींच्या पालकांना कोणत्याही प्रकारची अडचण तसेच कुठलीही काळजी करण्याची गरज पडणार नाही.
  • आपल्या देशातील मुलींचे भविष्य उज्वल करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) महत्वाची योजना आहे.
  • आपल्या राज्यातील तसेच देशातील मुलींचे जीवनमान सुधारण्यासाठी त्याचबरोबर त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक महत्वाची भूमिका बजावणार आहे.
  • सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) चे खाते कुठल्याही राष्ट्रीयकृत असणाऱ्या बँकेत त्याचप्रमाणे पोस्ट कार्यालयात उघडता येते. त्याचबरोबर खाते एका बँकेतून तसेच पोस्ट कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात ट्रान्सफर करता येते.
  • मित्रांनो, या योजनेला पंतप्रधान सुकन्या योजना या नावाने देखील ओळखता येते.
  • सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) अंतर्गत अर्ज प्रकिया सोपी ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला अर्ज करताना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

● खाते कोण उघडू शकते

  • सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) चे खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते.
  • जुळ्या तसेच तिप्पट मुलींच्या जन्माच्या बाबतीत दोनपेक्षा जास्त खाती उघडली जाऊ शकतात.
  • 10 वर्षाखालील मुलीच्या नावाने पालकाद्वारे खाते उघडले जाऊ शकते.
  • मुलीच्या नावाने भारतात पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत फक्त एकच खाते उघडता येते.

● ठेवी

  • आर्थिक वर्षात कमीत कमी 250 रुपये, जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये एकरकमी किंवा अनेक हप्त्यांमध्ये.
  • ठेव उघडण्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 15 वर्षे पूर्ण होई पर्यंत ठेवली जाऊ शकते.
  • जर किमान ठेव रु. 250 एका वित्तीय वर्षात खात्यात जमा केले नाहीत तर संबंधित खाते डिफॉल्ट खाते मानले जाईल.
  • खाते उघडण्यापासून 15 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी किमान रु. भरून डिफॉल्ट खाते पुन्हा चालू केले जाऊ शकते.

Sukanya Samriddhi Yojana In Marathi 2024: मुख्य उद्देश

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ची मुख्य उद्देश नक्की काय आहेत, जाणून घेऊया खालील माहितीमध्ये;

  • महाराष्ट्र राज्यातील मुलींचे जीवनमान सुधारणे.
  • आपल्या राज्यातील मुलींना सन्मानाने जगता यावे या उद्देशाने या सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ची सुरुवात करण्यात आली आहे.
  • राज्यातील मुलींचा आर्थिक व सामाजिक विकास व्हावा.
  • मुलींच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या लग्नासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • राज्यातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने देखील सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ची सुरुवात केली गेली आहे.
  • त्याचबरोबर मुलींचे आरोग्य, शिक्षण, मुलींचे लग्न तसेच मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ची सुरुवात करण्यात आली आहे.
  • राज्यातील भ्रूणहत्या थांबविणे तसेच महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणे.
  • मुलींचे भविष्य उज्वल करणे.
  • राज्यातील मुलींना आत्मनिर्भर बनवून स्वतःच्या पायावर उभे करणे.
  • त्यांना आपल्या आई वडिलांवर, नातेवाईकांवर अवलंबून न राहता त्यांना स्वतःला आत्मनिर्भर बनविणे.
  • आपल्या समाजातील मुलींबद्दल असलेला नकरात्मक विचार बदलून, त्यांच्याबद्दल समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे.

Sukanya Samriddhi Yojana In Marathi 2024: योजना देणाऱ्या बँका

  1. इंडियन बँक
  2. स्टेट बँक ऑफ इंडिया
  3. बँक ऑफ महाराष्ट्र
  4. पंजाब आणि सिंध बँक
  5. इंडियन ओव्हरसीज बँक
  6. युको बँक
  7. IDBI बँक
  8. बँक ऑफ बडोदा
  9. बँक ऑफ इंडिया
  10. HDFC बँक
  11. कॅनरा बँक
  12. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  13. अॅक्सिस बँक
  14. युनियन बँक ऑफ इंडिया
  15. पंजाब नॅशनल बँक
  16. आयसीआयसीआय बँक

Sukanya Samriddhi Yojana In Marathi 2024: Important Documents [आवश्यक कागदपत्रे]

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत, जाणून घेऊया; [मुली लहान असल्यास, कमी वय असल्यामुळे म्हणजेच तिची कागदपत्रे उपलब्ध नसल्यावर आई वडिलांची कागदपत्रे जमा करावीत. जेव्हा मुलीची कागदपत्रे तयार होतील तेव्हा मुलीची कागदपत्रे जमा करावीत]

  • सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • मोबाइल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मुलीचा जन्माचा दाखला

Sukanya Samriddhi Yojana In Marathi 2024:अर्ज कसा करावा

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा; खालील माहिती काळजीपूर्वक वाचा

  • सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) चा लाभ घेण्यासाठी म्हणजेच तुमचे खाते उघडण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत जावे लागेल.
  • तेथे जाऊन सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) अंतर्गत गुंतवणुकीसाठी अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्ज घेतल्यानंतर त्यात संपूर्ण माहिती अचूक आणि योग्यरित्या भरावी.
  • सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रांच्या प्रती अर्जासोबत जोडाव्यात.
  • सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला हा पूर्णपणे भरलेला अर्ज प्रीमियमच्या रकमेसह पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सबमिट करावा लागेल.
  • मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) चे अर्ज करू शकताय.

➡️सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) चा अर्ज डाउनलोड करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 मोफत शौचालय योजना 2024
मोदी आवास घरकुल योजना 2024मोफत शिलाई मशीन योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४लेक लाडकी योजना 2024
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
रमाई आवास योजना २०२४सुकन्या समृद्धी योजना 2024
महतारी वंदना योजना 2024एचडीएफसी बँक शिष्यवृत्ती योजना 2024
राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024
पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024महाडीबीटी शेतकरी योजना 2024
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना 2024प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024
अटल भूजल योजना 2024महामेष योजना 2024
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024गोदाम अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024आयुष्मान भारत विमा योजना 2024
एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना 2024मनोधैर्य योजना 2024

कृपया ही सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी योजनांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

Sukanya Samriddhi Yojana In Marathi 2024:FAQ’s

सुकन्या समृद्धी योजना कोनाद्वारे सुरू केली आहे?

केंद्र सरकारद्वारे

सुकन्या समृद्धी योजनेचे उद्देश काय आहे?

मुलींचे भविष्य सुधारणे

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)चा कोण लाभ घेऊ शकतो?

भारत देशातील सर्व राज्यातील 10 वर्षे वयोगटातील मुली

या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.