Mukhyamantri Vayoshri Yojana 2024| महाराष्ट्र सरकारद्वारे वरिष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये!!

Table of Contents

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 In Marathi

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 (मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024) विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, दिनांक 05 फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024” ची घोषणा केली. जी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि केंद्र सरकारच्या “राष्ट्रीय वयोश्री योजेनेचे प्रतिबिंब आहे. या योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धापकाळात मदत करण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना आवश्यक असणारी उपकरणे खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे तीन हजार रुपये मिळणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकार आपल्या देशातील नागरिकांच्या हेतुसाठी तसेच त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा म्हणून नवनवीन योजना राबवत असते. जसे की विविध प्रकारच्या कर्ज योजना असतील, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या कृषि योजना. आरोग्य सुविधा, राज्यातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना असतील, वृद्ध व्यक्तींसाठी पेन्शन योजना, अशा प्रकारच्या विविध योजना सरकार राबवत असते, त्यातीलच एक म्हणजे “मुख्यमंत्री वयोश्री योजना” होय.

महाराष्ट्र राज्यातल्या 65 वर्ष व त्या अधिक वय वर्ष असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना कार्यरत असणार आहे. ज्या उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख आहे व ज्यांचे वय 65 हून अधिक आहे, त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारचा असा अंदाज आहे की, राज्यातल्या सर्व जिल्ह्यातील सुमारे 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल. यासाठी आरोग्य विभागांमार्फत नागरिकांचे सर्वेक्षण करून लाभार्थी असलेल्यांची तपासणी करण्यात येईल. यात पात्र लाभार्थी असलेल्या नागरिकांना त्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा केले जातील.

महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण सव्वा ते दिड कोटींच्या दरम्यान ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. त्यामध्ये मानसिक अस्वास्थ्य बिघडलेले आणि अपंगत्व असलेल्या सुमारे 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारद्वारे “राष्ट्रीय वयोश्री योजना” ही केवळ राज्यातील निवडक जिल्ह्यात राबविली जाते. मात्र “मुख्यमंत्री वयोश्री योजना” ही राज्यातील सर्वच जिल्ह्यात राबवण्यात येईल. मित्रांनो, या योजनेसाठी 480 कोटी रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल आणि “मुख्यमंत्री वयोश्री योजना” चा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या साठी हा लेख पूर्ण व काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. राज्यातील वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी या संधीचा लाभ घ्या. महाराष्ट्र सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या या योजेनबाबत अधिक माहिती जसे की काय आहे ह्या योजेनचे फायदे? कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो? आणि महत्वाचं महजेच या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ?अशी सविस्तर माहिती आम्ही खाली दिलेली आहे. कृपया सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: आढावा खालीलप्रमाणे

योजनेचे नावMukhyamantri Vayoshri Yojana 2024
(मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024)
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
कोण कोण याचा लाभ घेऊ शकतो (लाभार्थी)जेष्ठ नागरिक
आर्थिक मदतरुपये – 3,000/-
योजनेचे उद्दिष्टजेष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारणे
आवश्यक कागदपत्रेआधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, रहिवासी दाखला
राज्यमहाराष्ट्र

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: कोण कोण पात्र आहे?

महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 चा लाभ घेण्यासाठी तसेच नोंदणी करण्यासाठी विशिष्ट पात्रता असणे आवश्यक आहे. अधिक माहिती आम्ही खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकताय.

  • मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 चा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
  • अर्जदारांकडे लेखात नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  • त्याचप्रमाणे, अर्जदारांनी त्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील किमान 30 % महिला या योजनेसाठी पात्र असतील.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: फायदे काय आहेत?

  • मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 मुळे महाराष्ट्र राज्यातील सुमारे 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत मिळणार आहे.
  • ही मदत एकूण रु. 3,000/- प्रति लाभार्थी असेल.
  • पात्र ज्येष्ठ नागरिकांना अपंगत्व आणि अशक्तपणाच्या मर्यादेनुसार मोफत उपकरणांचे वितरण केले जाईल.
  • ALIMCO म्हणजेच आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ची मदत आणि सहाय्यक जिवंत उपकरणांची एक वर्ष मोफत देखभाल करण्यात येईल.
  • एकाच व्यक्तीमध्ये अनेक अपंगत्व आणि अशक्तपणा असल्यास प्रतेक अपंगत्व आणि अशक्तपणाच्या संदर्भात षयीक उपकरणे दिली जातील.
  • उपायुक्त/ जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थी असलेल्या नागरिकांची ओळख राज्य सरकार तसेच केंद्र प्रदेश प्रशासनाद्वारे केली जाईल.
  • उपकरणे कॅम्प मोडमध्ये वितरित केली जातील.
  • हा उपक्रम महाराष्ट्रातील वयोवृद्ध नागरिकांसमोरील आव्हाने कमी करण्याचे आश्वासन देतो.
  • त्यांना त्यांच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य प्रदान करतो.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 चा लाभ घेण्यासाठी तसेच नोंदणी करण्यासाठी अर्जदारांकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक कागदपत्रांची यादी आम्ही खाली दिली आहे, काळजीपूर्वक वाचा.

  1. आधार कार्ड
  2. पासपोर्ट आकाराचा फोटो
  3. मोबाइल नंबर
  4. उत्पन्नाचा दाखला
  5. शिधापत्रिका (रेशन कार्ड)
  6. पत्त्याचा पुरावा
  7. घोषणा प्रमाणपत्र
  8. बँक खाते पासबुक

येथे क्लिक करून तुम्ही GR पाहू शकताय.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: उपकरणांची यादी

महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्र सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांना आधार म्हणून तीन हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन मदतीचा हात पुढे करत आहे. ही मदत त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी ही मदत लाभदायक ठरणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 महाराष्ट्रामध्ये वृद्ध नागरिकांचे दैनंदिन जीवन सुधारण्यासाठी विविध उपकरणे त्यांना प्रदान करत आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणती कोणती उपकरणे आहेत.

  • चालण्यासाठी काठी
  • कोपर क्रचेस
  • वॉकर /क्रचेस
  • ट्रायपॉड्स / क्वाडपॉड्स
  • श्रवणयंत्र
  • व्हीलचेअर
  • कृत्रिम दात
  • चष्मा
  • बाथरूम कमोड खुर्च्या
  • पाठीच्या आधारासाठी कंबर बेल्ट

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: नोंदणी कशी करावी?

● मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 अंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला थोडा धीर धरावा लागणार आहे.

● महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 ला नुकतीच मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. लवकरच ही योजना लागू करण्यात येईल. एकदा की ही योजना लागू झाली तर आम्ही तुम्हाला या पोस्टद्वारे अपडेट करू. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी तुमची उत्सुकता आम्हाला समजली तरी योजनेच्या अधिकृत शुभारंभाची प्रतीक्षा करणे महत्वाचे आहे. जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.

● आम्ही तुम्हाला या योजनेबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: हेल्पलाइन नंबर

● महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करण्यात अडचण येत असल्यास, काळजी करू नका. तुम्ही महाराष्ट्र सरकारने मदतीसाठी हेल्पलाइन नंबर दिला आहे (1800-180-5129) या वर संपर्क करू शकताय.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकताय.⤵️⤵️⤵️
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 शबरी घरकुल योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना २०२४ अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४
आम आदमी विमा योजना 2024स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024
देवदासी कल्याण योजना 2024निपुण भारत योजना 2024
महतारी वंदना योजना 2024एचडीएफसी बँक शिष्यवृत्ती योजना 2024
कृषी उन्नती योजना 2024राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024
विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024
महाडीबीटी शेतकरी योजना 2024प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024
अटल भूजल योजना 2024महामेष योजना 2024
महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024
गोदाम अनुदान योजना 2024एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024
युवा प्रशिक्षण योजना 2024एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना 2024

कृपया ही सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि सरकारी योजनांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024:FAQ’s
महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 चे उद्दिष्ट काय आहे?

महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 चे महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे जेष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारणे, आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 साठी कोण पात्र आहे?

महाराष्ट्र राज्याचे रहिवासी, ज्यांचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, असे उमेदवार या योजनेसाठी पात्र आहेत.

महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 मध्ये जेष्ठ नागरिकांना कोणती उपकरणे मिळणार आहेत ?

चालण्यासाठी काठी, कोपर क्रचेस, वॉकर /क्रचेस, ट्रायपॉड्स / क्वाडपॉड्स, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, कृत्रिम दात, चष्मा, बाथरूम कमोड खुर्च्या, पाठीच्या आधारासाठी कंबर बेल्ट ई .

अर्जदारांकडे कोणती कोणती आवश्यक कागदपत्रे असावीत ?

आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाइल नंबर, उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका (रेशन कार्ड), पत्त्याचा पुरावा, घोषणा प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक