Aam Aadmi Vima Yojana In Marathi 2024
Aam Aadmi Vima Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Aam Aadmi Vima Yojana 2024 (आम आदमी विमा योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व सामान्य नागरिकांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया ही योजना काय आहे? या योजनेचे उद्देश तसेच वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी काय काय पात्रता आवश्यक आहेत? कोणत्या अटी व शर्ती आहेत? त्याचबरोबर या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखाद्वारे पाहणार आहोत.
महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे राज्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच राज्यातील नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नवनवीन योजना राबविल्या जातात. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी देखील राज्य सरकारमार्फत विविध योजना राबविल्या जात असतात. त्यातीलच एक योजना म्हणजेच Aam Aadmi Vima Yojana 2024 (आम आदमी विमा योजना 2024) होय. या योजनेची सुरुवात 20 ऑक्टोबर 2007 रोजी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे करण्यात आली आहे.
मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपल्या देशातील बहुतांश नागरिक आज देखील आपले जीवन गरिबीत आणि दारिद्र्य रेषेखालील जगत आहेत. त्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अतोनात कष्ट करावे लागतात. आपली व आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी हाताला येईल ते काम करावे लागते. त्यांना आपल्या दैनंदिन गरजा, आपल्या मुलाबाळांचे शिक्षण, घरातील वृद्ध व्यक्तीच्या औषधोपचारचा खर्च अशा अनेक गोष्टींसाठी अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
आपली व आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांना स्वतःचा विमा उतरवणे शक्य नसते. तसेच विम्याच्या हप्त्याची रक्कम त्यांना परवडणारी नसते. अशातच त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा एकाएकी मृत्यू किंवा अपघात झाल्यास तसेच अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. घरातील कर्त्या पुरुषाच्या एकाएकी जाण्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. त्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो.
या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून राज्य शासनाने Aam Aadmi Vima Yojana 2024 (आम आदमी विमा योजना 2024) ही योजना सुरू करण्याचा अतीशय योग्य असा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील नागरिकांचा विमा उतरविला जातो. त्यामुळे लाभार्थी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास आम आदमी विमा योजना 2024 अंतर्गत अशा नागरिकांना 30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. राज्यातील सामान्य जनतेसाठी ही योजना अतीशय महत्वाची अशी योजना आहे.
मित्रांनो, तुम्हालाही या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवायचा असेल तर आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच हा लेख आपल्या जवळील मित्रांना आणि नातेवाईकांना देखील शेअर करण्यास विसरू नका, जेणेकरून त्यांनाही आम आदमी विमा योजना 2024 च्या माध्यमातून लाभ घेता येईल.
आम आदमी विमा योजना 2024 थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Aam Aadmi Vima Yojana 2024 (आम आदमी विमा योजना 2024) |
योजना कोणी सुरू केली | महाराष्ट्र राज्य शासन |
योजना कधी सुरू झाली | 20 ऑक्टोबर 2007 |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेचे मुख्य उद्देश | राज्यातील नागरिकांना विमा संरक्षण देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील नागरिक |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | 75 हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाणार आहे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Aam Aadmi Vima Yojana 2024 नक्की काय आहे?
महाराष्ट्र राज्य शासनाने 2 ऑक्टोबर 2007 रोजी Aam Aadmi Vima Yojana 2024 (आम आदमी विमा योजना 2024) ची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील कुटुंबांतील व्यक्तींना विम्याचे संरक्षण दिले जाते. त्याचबरोबर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमहा शिष्यवृत्ती देखील या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते. मित्रांनो, या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास किंवा अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास शासनामार्फत आर्थिक सहाय्य केले जाते.
आपल्या महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे आरोग्य जोपासण्याच्या उद्देशाने राज्य सरकार विविध योजना राबवत असते. त्यातीलच Aam Aadmi Vima Yojana 2024 (आम आदमी विमा योजना 2024) ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे. या योजनेसाठी 200 रुपये वार्षिक प्रीमियम आकारला जातो. त्यापैकी 100 रुपये शासनामार्फत त्यामध्ये 50 टक्के केंद्र सरकार आणि 50 टक्के राज्य सरकारचे व उर्वरित 100 रुपये लाभार्थी व्यक्तीस स्वतः भरावे लागतात.
Aam Aadmi Vima Yojana 2024 (आम आदमी विमा योजना 2024) ही भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC मार्फत राबविली जाणारी सामाजिक सुरक्षा योजना आहे. आपल्या राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विमा काढणे ही अतीशय महत्वाची बाब आहे मात्र विमा काढणे किंवा विमा कंपनीचे हप्ते भरणे इतकी त्यांची आर्थिक परिस्थिती नसते. राज्यातील जे नागरिक विमा काढू शकत नाहीत, अशा कुटुंबांना विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने म्हणजेच आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनामार्फत आम आदमी विमा योजना 2024 राबविली जाते.
Aam Aadmi Vima Yojana 2024:योजनेचे उद्देश
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आम आदमी विमा योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना विमा सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आम आदमी विमा योजना 2024 ची सुरुवात करण्यात आली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
- त्याचबरोबर राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमजोर नागरिकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
- त्यांना आपल्या उपचारासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये म्हणून आर्थिक सहाय्य करणे.
- राज्यातील गरीब व मागासवर्गीय नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
Aam Aadmi Vima Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आम आदमी विमा योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?
- केंद्र आणि राज्य सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली Aam Aadmi Vima Yojana 2024 (आम आदमी विमा योजना 2024) ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या नागरिकांना सामाजिक सुरक्षा पुरविली जाते.
- या योजनेसाठी 200 रुपये वार्षिक प्रीमियम आकारला जातो.
- प्रीमियमची रक्कम ही 50 टक्के शासनामार्फत तसेच उर्वरित 50 टक्के रक्कम ही लाभार्थी व्यक्तीस स्वतःला भरावी लागते.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व सामान्य नागरिकांना भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे.
- त्यांना आपल्या औषधोपचारासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
- त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी असलेल्या व्यक्तीच्या पाल्यास जे 9 ते 12 वी चे शिक्षण घेत आहेत त्यांना दरमहा 100 रुपये शिष्यवृत्ती देखील दिली जाते.
Aam Aadmi Vima Yojana 2024:योजनेचे लाभार्थी
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आम आदमी विमा योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?
- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक आम आदमी विमा योजना 2024 च्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.
- त्याचबरोबर आम आदमी विमा योजना 2024 अंतर्गत 18 ते 59 वर्षे वयोगटातील भूमिहीन, अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक मजूर या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी पात्र आहेत.
Aam Aadmi Vima Yojana 2024:लाभ
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आम आदमी विमा योजना 2024” च्या माध्यमातून काय काय लाभ दिला जाणार आहे?
- नैसर्गिक मृत्यू झाल्यास :- विम्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नॉमिनी वारसदारास 30 हजार रुपये दिले जातात.
नैसर्गिक मृत्यू झाल्यास | 30,000/- रुपये |
अपघातात मृत्यू झाल्यास | 75,000/- रुपये |
अपघातात 80 टक्के कायमस्वरूपी अपंगत्व (एक डोळा आणि एक अवयव निकामी होणे) | 37,500/- रुपये |
अपघातामुळे कायमचे अपंगत्व (दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात पाय निकामी होणे) | 75,000/- रुपये |
Aam Aadmi Vima Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आम आदमी विमा योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहे? कोणत्या अटी व शर्ती आहेत?
- Aam Aadmi Vima Yojana 2024 (आम आदमी विमा योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महत्वाचं म्हणजे अर्जदाराचे वय 15 ते 59 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अजजदार व्यक्ती हा दारिद्र्यरेषे खालील कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
- सदर योजनेचा लाभ हा राज्यातील भूमिहीन, अल्पभूधारक, अत्यल्प भूधारकांना घेता येणार आहे.
- या योजनेचा अर्ज करताना वारसदाराचे नाव आवश्यक आहे.
- त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून मिळणारी शिष्यवृत्तीचा लाभ हा केवळ एक कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना घेता येणार आहे.
- तसेच शिष्यवृत्तीचा लाभ हा फक्त 9 ते 12 वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलांनाच दिला जाणार आहे.
- लाभार्थी व्यक्तीच्या मृत्यूच्यावेळी किंवा अपघात झालेल्या वेळी त्यांची पॉलिसी सक्रिय असणे आवश्यक आहे.
- योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा व्यक्ती हा कुटुंबातील एकच कमवता व्यक्ती असावा.
Aam Aadmi Vima Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आम आदमी विमा योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे?
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- शाळेचा दाखला
- मोबाईल नंबर
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
- वारसदाराची कागदपत्रे
- वारसाचे ओळखपत्र
- वारसाचा पत्ता
- बँक खात्याचा तपशील
Aam Aadmi Vima Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आम आदमी विमा योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
● ऑनलाइन अर्ज पद्धत :-
- आम आदमी विमा योजना 2024 चा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल.
- त्यामध्ये तुम्हाला ‘आम आदमी विमा योजना’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा अर्ज उघडेल.
- आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक आणि अचूक पद्धतीने भरायची आहे.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक राहील.
- सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आता तुम्हाला ‘सबमीट’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे मित्रांनो, तुमची Aam Aadmi Vima Yojana 2024 (आम आदमी विमा योजना 2024) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
● ऑफलाइन अर्ज पद्धत :-
- सदर योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास अर्जदारास सर्वप्रथम आपल्या जवळील महामंडळाच्या शाखेत जावे लागणार आहे.
- त्यानंतर तेथून तुम्हाला Aam Aadmi Vima Yojana 2024 (आम आदमी विमा योजना 2024) चा अर्ज घ्यावा लागणार आहे.
- अर्ज घेतल्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे.
- तसेच अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
- आणि शेवटी संपूर्ण भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात जमा करायचा आहे.
- अशा प्रकारे मित्रांनो, तुमची आम आदमी विमा योजना 2024 ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “आदमी विमा योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Aam Aadmi Vima Yojana 2024:FAQ’s
Aam Aadmi Vima Yojana 2024 (आम आदमी विमा योजना 2024) ची सुरुवात कोणी आणि कधी केली?
सदर योजनेची सुरुवात केंद्र आणि राज्य सरकारने 2 ऑक्टोबर 2007 रोजी केली आहे.
Aam Aadmi Vima Yojana 2024 (आम आदमी विमा योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?
राज्यातील नागरिकांना विमा संरक्षण देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
Aam Aadmi Vima Yojana 2024 (आम आदमी विमा योजना 2024) च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?
या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 75,000/- रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाणार आहे.
Aam Aadmi Vima Yojana 2024 (आम आदमी विमा योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?
आम आदमी विमा योजना 2024 चा अर्ज ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.