Atal Bamboo Samruddhi Yojana In Marathi 2024
Atal Bamboo Samruddhi Yojana 2024: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण या लेखात Atal Bamboo Samruddhi Yojana 2024 (अटल बांबू समृद्धी योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे ही योजना? ही योजना कोणी सुरू केली? या योजनेचे मुख्य उद्देश आणि मुख्य वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता तसेच कोणत्या अटी व शर्ती आहेत? महत्वाचं म्हणजे कोणाला या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे? अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? त्याचबरोबर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.
आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच आपले महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच राज्यातील शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी सातत्याने नवनवीन योजना घेऊन येत असते. जेणेकरून आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचा आणि इतर नागरिकांचा आर्थिक विकास व्हावा, त्यांचे भविष्य उज्वल व्हावे. शेतकऱ्यांना आपल्या शेती या व्यवसायाला जोडधंदा करता यावा, त्याचबरोबर त्यांना नवनवीन उद्योग व्यवसाय सुरू करता यावेत यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील असते. अशातच आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच Atal Bamboo Samruddhi Yojana 2024 (अटल बांबू समृद्धी योजना 2024) होय.
Atal Bamboo Samruddhi Yojana 2024 (अटल बांबू समृद्धी योजना 2024) ची सुरुवात 28 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था कंपनी, बांबू शेती करणारे शेतकरी, नोंदणीकृत संस्था इ. सभसदांनी एकत्रित आपले अर्ज सादर केल्यास त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर राज्यातील खाजगी शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांचा त्यानंतर विचार केला जाणार आहे.
शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की बांबूचा वापर ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात केला जातो. बांबू ही एक बहुउपयोगी वनस्पती आहे. त्याचप्रमाणे बांबूचे गरिबांच्या जीवनात आणि ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायात मोलाचे स्थान आहे, तसेच बांबू आर्थिकदृष्ट्या अतीशय महत्वाचा असल्यामुळे त्याला ‘हिरवे सोने’ देखील म्हंटले जाते. राज्यातील बांबू शेतीला चालना मिळावी, त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन, त्यांचा आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेली Atal Bamboo Samruddhi Yojana 2024 (अटल बांबू समृद्धी योजना 2024) ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.
अटल बांबू समृद्धी योजना 2024 थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Atal Bamboo Samruddhi Yojana 2024 (अटल बांबू समृद्धी योजना 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | महाराष्ट्र राज्य सरकार |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
विभाग | वन विभाग, महाराष्ट्र राज्य |
योजनेचे मुख्य उद्देश | राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचा आर्थिक विकास करणे |
योजनेचे लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | शेतकऱ्यांना प्रति रोप 175 रुपये अनुदान मिळणार |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन /ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
अटल बांबू समृद्धी योजना 2024 अर्ज | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Atal Bamboo Samruddhi Yojana 2024 नक्की काय आहे?
आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने शेती हा व्यवसाय केला जातो. आजदेखील बहुतांश ठिकाणी पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते तसेच काही ठिकाणी आधुनिक यंत्रांचा वापर करून देखील शेती केली जाते. आपल्याला माहितीच आहे की राज्यातील बहुतांश शेतकरी हे आर्थिकदृष्ट्या गरीब असल्यामुळे शेती करताना त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे वारंवार हवामानात होणाऱ्या बदलांमुळे, ऊन, वारा, पाऊस यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते, परिणामी शेतकऱ्याला अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. शेतकरी बांधवांच्या या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून राज्य सरकारने Atal Bamboo Samruddhi Yojana 2024 (अटल बांबू समृद्धी योजना 2024) योजना सुरू करण्याचा अतीशय योग्य असा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने 28 जून 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार अटल बांबू समृद्धी योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपे पुरविण्याची तरतूद करण्यात आली होती, मात्र त्याच्या संगोपणासाठी आणि देखभालीसाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान देण्याची तरतूद योजनेमध्ये नसल्यामुळे केंद्र सरकारमार्फत सुरू असलेल्या राष्ट्रीय बांबू योजनेच्या सहाय्याने Atal Bamboo Samruddhi Yojana 2024 (अटल बांबू समृद्धी योजना 2024) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपे लागवडीसाठी अनुदान देण्याची तरतूद महाराष्ट्र राज्य सरकारने 28 फेब्रुवारी 2024 रोजी केली आहे.
मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांबू लागवड आणि त्याची देखभाल करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. 2 हेक्टर जमिनीवर शेतकरी एकूण 1200 बांबूची लागवड करू शकतो. 3 वर्षांच्या कालावधीसाठी शेतकऱ्यांना प्रति रोप 350/- रुपये खर्च करावे लागतील, त्यासाठी प्रति रोप 350/- रुपये पैकी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे , जे की प्रति रोप 175/- रुपये इतके आहे. त्याचबरोबर पहिल्या वर्षात प्रति रोप 90/- रुपये, दुसऱ्या वर्षात प्रति रोप 50/- रुपये आणि तिसऱ्या वर्षात 35/- रुपये अनुदान दिले जाणार आहे. असे एकूण 175/- रुपये प्रति रोप अनुदान देण्यात येणार आहे.
Atal Bamboo Samruddhi Yojana 2024:योजनेचे उद्देश
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “अटल बांबू समृद्धी योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
- त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास करणे, हे देखील या योजनेचे उद्देश आहे.
- शेतकऱ्यांना आपल्या शेतातून मिळणाऱ्या उत्पादनांना जोड देण्यासाठी त्याचबरोबर उद्योगाच्या कच्च्या मालाच्या आवश्यकतेच्या उपलब्धतेसाठी बांबू लागवड क्षेत्र वाढविणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना उपजीविकेचे नवीन साधन उपलब्ध करून देणे.
- त्याचप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
- तसेच या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास देखील हातभार लागणार आहे.
Atal Bamboo Samruddhi Yojana 2024:योजनेचे वैशिष्ट्ये
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “अटल बांबू समृद्धी योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?
- महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच राज्यात बांबू शेतीला चालना देण्यासाठी सुरू केलेली Atal Bamboo Samruddhi Yojana 2024 (अटल बांबू समृद्धी योजना 2024) ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति रोप 175/- रुपये अनुदान दिले जाणार आहे.
- जे की पहिल्या वर्षी 90/- रुपये, दुसऱ्या वर्षी 50/- रुपये आणि तिसऱ्या वर्षी 35/- रुपये इतके असणार आहे.
- सदर योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या मदतीने शेतकऱ्यांना बांबूची देखभाल करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
- त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यात बांबू शेतीला चालना मिळणार आहे.
- तसेच आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन, शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार आहेत.
Atal Bamboo Samruddhi Yojana 2024:योजनेचे लाभार्थी
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “अटल बांबू समृद्धी योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?
- Atal Bamboo Samruddhi Yojana 2024 (अटल बांबू समृद्धी योजना 2024) चा अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधव पात्र आहेत.
Atal Bamboo Samruddhi Yojana 2024:योजनेचे फायदे
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “अटल बांबू समृद्धी योजना 2024” चे काय काय फायदे आहेत?
- बांबूचा वापर घरे, इमारती, शाळा बांधण्यासाठी मोठ्याप्रमाणात केला जातो.
- बांबूची मुळे मजबूत असल्यामुळे त्यापासून मातीची धूप रोखण्यास मदत होते.
- महत्वाचं म्हणजे बांबू कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो आणि ऑक्सिजन सोडतो, त्यामुळे परिसरातील हवा शुद्ध होते.
- बांबूचे झाड अनेक प्रजातींसाठी निवाऱ्याचे काम करते, त्यामुळे जैवविविधता वाढण्यास मदत होते.
- बहुतांश ठिकाणी बांबू खाद्यपदार्थ म्हणून वापरला जातो.
- त्याचबरोबर बांबूचा उपयोग लाकडासाठी पर्याय इंधन म्हणून देखील केला जातो.
- तसेच बांबूचा वापर विविध प्रकारच्या हस्तकला बनविण्यासाठी देखील केला जातो.
- त्याचबरोबर बांबूचे झाड पाणी शोषून घेतात त्यामुळे पूर आणि दुष्काळ यापासून बचाव होतो, अशा प्रकारे बांबूचा विविध प्रकारे वापर केला जातो. त्यामुळे बांबू हे शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पन्नाचा स्रोत बनतो.
Atal Bamboo Samruddhi Yojana 2024:पात्रता अटी व शर्ती
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “अटल बांबू समृद्धी योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहे? कोणत्या अटी व शर्ती आहेत?
- Atal Bamboo Samruddhi Yojana 2024 (अटल बांबू समृद्धी योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी इच्छुक असणारी अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- सदर योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच दिला जाणार आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून कोणताही लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार शेतकऱ्याकडे ठिबक सिंचन असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याने रोपे लहान असताना त्यांची व्यवस्थित संगोपन करण्यासाठी आपल्या शेताभोवती संरक्षण कुंपण तयार करणे आवश्यक आहे.
- लागवड पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना जिओ टॅग/जी. आय. एस मार्फत फोटो पाठवणे आवश्यक आहे.
- एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त एक हेक्टर क्षेत्रातच लागवड करावी लागणार आहे.
- त्याचबरोबर एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 600 बांबूची रोपे दिली जातील.
- सदर योजनेचा लाभ हा एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला घेता येणार आहे.
Atal Bamboo Samruddhi Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “अटल बांबू समृद्धी योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
Atal Bamboo Samruddhi Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “अटल बांबू समृद्धी योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
● ऑनलाइन अर्ज पद्धत :-
- Atal Bamboo Samruddhi Yojana 2024 (अटल बांबू समृद्धी योजना 2024) चा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
- वेबसाइट उघडल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल.
- होम पेज मध्ये तुम्हाला बॉम्बे बोर्ड मध्ये बॉम्बे एप्लीकेशन वर क्लिक करायचे आहे.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता Atal Bamboo Samruddhi Yojana 2024 (अटल बांबू समृद्धी योजना 2024) चा अर्ज उघडेल.
- आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित अचूक पद्धतीने भरायची आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर आता तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
- तुम्ही एकदा तुमचा अर्ज तपासून घ्यावा, अर्जात भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे गरजेचे आहे.
- अर्जात संपूर्ण माहिती अचूक असल्यास ‘सबमीट’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुमची अटल बांबू समृद्धी योजना 2024 ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “अटल बांबू समृद्धी योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Atal Bamboo Samruddhi Yojana 2024:FAQ’s
Atal Bamboo Samruddhi Yojana 2024 (अटल बांबू समृद्धी योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?
सदर योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य शासनाने केली आहे.
Atal Bamboo Samruddhi Yojana 2024 (अटल बांबू समृद्धी योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?
राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचा आर्थिक विकास करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
Atal Bamboo Samruddhi Yojana 2024 (अटल बांबू समृद्धी योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?
सदर योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति बांबूच्या रोपांसाठी 175/- रुपये अनुदान दिले जाणार आहे.
Atal Bamboo Samruddhi Yojana 2024 (अटल बांबू समृद्धी योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?
अटल बांबू समृद्धी योजना 2024 चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.