APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024:अमृत आहार योजना महाराष्ट्र 2024|

Table of Contents

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana In Marathi 2024

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरोदर महिला तसेच स्तनपान करणाऱ्या मातांना सहाय्य केले जाणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे ही योजना? या योजनेची सुरुवात कोणी केली? या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ दिले जाणार आहेत? काय आहेत या योजनेचे मुख्य उद्देश? या योजनेचे वैशिष्ट्ये काय काय आहेत? त्याचबरोबर पात्रता अटी व शर्ती काय काय आहेत? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत? महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

आपल्या महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकार सतत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते. त्यामध्ये महिलांना देखील प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सरकार आपल्या राज्यातील महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राज्यामध्ये राबवत असते. तसेच राज्यातील गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी देखील विविध योजना राज्य सरकारद्वारे राबविल्या जातात. त्यातीलच एक योजना म्हणजेच APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024) होय.

मित्रांनो, आपल्या राज्यातील ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना आपले पोट भरण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यामध्ये आदिवासी महिला जर गरोदर असतील तरी सुद्धा त्यांना काम करावेच लागते. राज्यातील ग्रामीण भागातील आदिवासी महिलांची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.

आपली व आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे त्यांना गरोदर अवस्थेत आवश्यक असणाऱ्या आहाराचा समतोल राखणे जमत नाही. गरोदर अवस्थेत आवश्यक असणाऱ्या आहाराच्या कमतरतेमुळे त्यांची बालके कमी वजनाची जन्माला येतात. त्याचबरोबर पौष्टिक आहार, सात्विक अन्न भेटत नसल्यामुळे त्यांचे वजन वाढत नाही, याचा परिणाम त्यांच्या नवजात बालकांवर दिसून येतो. बाळाचे वजन कमी भरल्याने अशी बालके कुपोषित होतात.

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावAPJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024
(डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
योजना कधी सुरू झाली24 जुलै 2015
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागआदिवासी विकास विभाग,
एकात्मिक बाल विकास सेवा
योजनेचे मुख्य उद्देशराज्यातील गरोदर महिलांना तसेच स्तनपान करणाऱ्या मातांना पोषक आणि सकस आहार देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभएक वेळेचा चौरस आहार
योजनेचे लाभार्थीराज्यातील गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024 पीडीएफ➡️येथे पहा⬅️

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 नक्की काय आहे?

राज्य सरकारने आपल्या राज्यातील गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024) सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने 24 जुलै 2015 रोजी या योजनेची सुरुवात केली. ही योजना महिलांच्या विकासासाठी सुरू करण्यात आली होती.

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024) च्या माध्यमातून राज्यातील गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांना आवश्यक असणारा पोषक आणि सकस आहार दिला जाणार आहे. मित्रांनो, आपल्या राज्यातील ग्रामीण भागातील आदिवासी महिला गर्भवस्थेत आवश्यक असणारी काळजी घेत नाहीत, त्याचबरोबर गरोदर अवस्थेत आवश्यक असणारा आहार देखील त्यांना घेता येत नाही. अशा महिलांची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अतोनात कष्ट घ्यावे लागतात.

राज्यातील आदिवासी महिला, ज्या गर्भवती आहेत या नऊ महीने काम करतात, त्यांना गरोदर अवस्थेत विश्रांतीची खूप गरज असते. मात्र कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजुक असल्यामुळे त्यांना काम करावेच लागते. त्यांना अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने 24 जुलै 2015 रोजी आपल्या राज्यातील महिलांसाठी APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024) सुरू करण्याचा अतीशय योग्य असा निर्णय घेतला आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांना एक वेळचा चौरस आहार दिला जाणार आहे. जेणेकरून गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांचे आरोग्य उत्तम राहील आणि जन्माला येणारी बालके देखील सुदृढ जन्माला येतील. या आहारामुळे महिलांचे वजन वाढण्यात मदत होईल, तसेच त्यांचे बाळ देखील चांगले जन्माला येईल.

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024” चे मुख्य उद्देश काय आहे?

  • राज्यातील गरोदर महिला आणि स्तनपान अवस्थेत असणाऱ्या मातांना पौष्टिक आणि सकस आहार देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील गरोदर महिलांना सकस आणि पौष्टिक आहार देऊन त्यांचे वजन वाढविण्यास मदत करणे, जेणेकरून त्यांचे बाळ देखील सुदृढ जन्माला यावे.
  • त्याचबरोबर राज्यातील गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये आवश्यक असणारी जनजागृती करणे.
  • या योजनेमुळे नवजात बालकांचा मृत्यू दर कमी होईल, तसेच योजनेअंतर्गत सकस आहार मिळाल्यामुळे बाळ सुदृढ जन्माला येईल.
  • तसेच या योजनेच्या माध्यमातून कुपोषित कमी वजनाची बालके जन्माला येणे टळणार आहे.

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत राज्यातील गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024) ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील गरोदर मातांना शेवटच्या तीन महिन्यात व स्तनपान करणाऱ्या मातांना प्रसुतीनंतरच्या पहिल्या तीन महिन्यात अशा एकूण 6 महिन्यांच्या कालावधीत चौरस आहार दिला जाणार आहे.
  • महत्वाचं म्हणजे राज्यातील अनुसूचित भागातील लाभार्थी असलेल्या महिलांना 1 डिसेंबर 2015 पासून हा चौरस आहार देण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्र राज्यात 85 एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024 राबविण्यात येते.
  • त्याचप्रमाणे राज्यातील 16 हजार 30 अंगणवाडी आणि 2013 मिनी अंगणवाडी क्षेत्रातील लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो.

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024:आहाराचे स्वरूप

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024” च्या माध्यमातून दिला जाणारा आहार कसा असणार आहे?

  • या योजनेअंतर्गत गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांना एक वेळचा पूर्ण आहार असणार आहे.
  • त्यामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्य, डाळ, दूध, शेंगदाणा लाडू, अंडी अथवा केळी तसेच नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गूळ अथवा साखर, आयोडीनयुक्त मीठ आणि मसाला ई. असणार आहे.
  • योजनेच्या माध्यमातून हा आहार खरेदी करण्यासाठी एका अंगणवडीसाठी एक अशी चार सदस्य आहार समिती नियुक्त करण्यात आली आहे.
APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024” साठी काय काय पात्रता व कोणत्या अटी व शर्ती आहेत?

  • सदर योजनेचा लाभ हा केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच घेता येणार आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील गरोदर महिलांना या योजनेच्या माध्यमातून माध्यमातून कोणताही लाभ दिला जाणार नाही.
  • अनुसूचित भागातील आदिवासी उपाय योजना क्षेत्रातील गरोदर महिलांना शेवटच्या 3 महिन्यात व स्तनपान करणाऱ्या मातांना प्रसुतीनंतरच्या पहिल्या 3 महिन्यात अशा एकूण 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये एक वेळचा सकस आहार देण्यात येणार आहे.
  • सदर योजनेचा लाभ हा गरोदर अवस्थेतील शेवटच्या 3 महिन्यातील महिलांना घेता येणार आहे.
  • त्याचबरोबर स्टंपणा करणाऱ्या महिलांना पहिल्या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • महत्वाचं म्हणजे सदर योजनेचा लाभ अनुसूचित भागातील आदिवासी महिलांना घेता येणार आहे.

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024” च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी या योजनेचा अर्ज करतेवेळी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • रेशनकार्ड
  • महिला गरोदर आणि स्तनपान माता असल्याची जवळील अंगणवाडी मधील नोंदणी करणे आवश्यक आहे.

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑफलाइन अर्ज पद्धत :-

  • APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024) चा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील अंगणवाडी मध्ये जावे लागणार आहे.
  • सदर योजनेचा अर्ज अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध असणार आहे.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
मोफत शौचालय योजना 2024ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024
विहीर अनुदान योजना २०२४ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
शेळी पालन योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024पंचायत समिती योजना 2024
गटई स्टॉल योजना 2024स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024
डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना 2024देवदासी कल्याण योजना 2024
निपुण भारत योजना 2024महतारी वंदना योजना 2024
APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024:FAQ’s
APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024) कोणी आणि कधी सुरू केली?

सदर योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने 24 जुलै 2015 रोजी सुरू केली.

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

राज्यातील गरोदर महिलांना तसेच स्तनपान करणाऱ्या मातांना पोषक आणि सकस आहार देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024) च्या माध्यमातून कोणाला लाभ दिला जाणार आहे?

सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांना लाभ दिला जाणार आहे.

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ दिला जाणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांना एक वेळचा सकस आहार दिला जाणार आहे.

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

या योजनेचा अर्ज आपल्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन करायचा आहे.