Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024:अपघात ग्रस्तांना मिळणार 30 हजार रुपये आर्थिक सहाय्य!

Table of Contents

Balasaheb Thakre Apghat Vima Yojana In Marathi 2024

Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024 (स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून अपघात ग्रस्तांना एकूण 30 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे ही योजना? या योजनेची सुरूवात कोणी केली? या योजनेचे मुख्य उद्देश काय काय आहेत? त्याचबरोबर या योजनेची वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेची पात्रता, अटी व शर्ती काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत विविध योजना राबविल्या जात असतात. या योजनांच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना भरपूर प्रमाणात फायदा होतो. त्यातीलच एक योजना म्हणजे Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024 (स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024) होय. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत ही योजना राबविली जाते. या योजनेच्या माध्यमातून अपघात ग्रस्तांना तात्काळ सेवा पुरविली जाते.

ज्या व्यक्तीचा अपघात झाला आहे, त्या व्यक्तीसाठी अपघात झाल्यानंतर सुरुवातीचे काही तास आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. त्यांना तात्काळ उपचाराची गरज असते. जर अपघात ग्रस्तांवर तातडीने उपचार करता आले नाही तर त्यांना आपला जीव देखील गमवावा लागू शकतो. त्याच सुरुवातीच्या महत्वाच्या वेळेला वैद्यकीय क्षेत्रात गोल्डन आवर असे म्हणतात.

Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024 (स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024) या योजनेच्या माध्यमातून अपघात झालेला नागरिक हा राज्यातीलच नव्हे तर कोणत्याही देशाचा असला तरी त्यांच्यावर उपचार केले जातात. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत अतीशय तातडीने अपघात ग्रस्तांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024 (स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024) ला मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने ही योजना 16 सप्टेंबर 2020 पासून संपूर्ण राज्यामध्ये सुरू केली आहे. महत्वाचं म्हणजे अपघात झालेल्या व्यक्तीला 72 तासांच्या आत आवश्यक असणारी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाने ही योजना सुरू करण्याचा अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतला आहे.

Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024

स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावBalasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024
(स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीमहाराष्ट्र राज्य शासन
योजनेची सुरुवात कधी झाली16 सप्टेंबर 2020
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागसार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
योजनेचे मुख्य उद्देशअपघात झालेल्या व्यक्तीला 72 तासाच्या आत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्याचे नागरिक
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभअपघात ग्रस्तांना 30 हजार रुपयांच्या विमा संरक्षण अंतर्गत आवश्यक ती मदत केली जाणार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️
स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024 शासन निर्णय➡️येथे पहा⬅️

Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024 नक्की काय आहे?

आपल्या राज्यातील तसेच देशातील वाढत्या वाहनांच्या गर्दीमुळे परिसरातील रस्त्यांवर किंवा महामार्गावर मोठ्याप्रमाणात अपघात होतात. अपघात ग्रस्तांना वेळेवर उपचार न मिळाल्याने परिणामी त्यांना आपले प्राण देखील गमवावे लागतात. त्याचबरोबर अपघात झाल्यानंतर काही व्यक्तींना कायमचे अपंगत्व देखील येते. त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने अतीशय महत्वाची अशी योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024 (स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024) होय.

Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024 (स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024) योजना ही राज्यभर राबविण्यात येणार आहे. जेणेकरून अपघात ग्रस्तांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी. या योजनेची सुरुवात 16 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्र शासनाने केली आहे. या योजनेसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीला आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर या योजनेसाठी विहित पद्धतीने विमा कंपन्यांची निवड देखील करण्यात येणार आहे.

अपघात ग्रस्तांना वेळेवर उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकतात. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून अपघात झालेला नागरिक हा कुठल्याही राज्याचा तसेच कुठल्याही देशाचा असला तरी त्यांना आवश्यक असणारा योग्य तो उपचार देण्यात येतो. त्याचबरोबर Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024 (स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024) च्या माध्यमातून अपघात ग्रस्तांना 72 तासांच्या आत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाते. राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेली ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.

Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024 (स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024) चा मुख्य उद्देश म्हणजे रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना अतीशय तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे.
  • अपघात ग्रस्तांना 72 तासांच्या आत वैद्यकीय सेवा मिळवून देणे, जेणेकरून त्यांचे प्राण वाचावे.

Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • रस्ते अपघात ग्रस्तांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेली ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
  • अपघात ग्रस्त व्यक्तीला कुठलीही फी भरावी लागणार नाही.
  • सदर योजनेच्या माध्यमातून रस्ते अपघात ग्रस्तांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
  • त्याचबरोबर रस्ते अपघात ग्रस्तांना पहिल्या 72 तासांच्या आत अंगीकृत हॉस्पिटलमध्ये 74 उपचार पद्धतीच्या माध्यमातून केले जातात.
  • या योजनेअंतर्गत अपघात झालेल्या व्यक्तीला 30 हजार रुपयांपर्यंत खर्च अगदी मोफत केला जातो.
  • एखाद्या जवळच्या हॉस्पिटल मध्ये अपघात ग्रस्तांना उपचारांसाठी सुविधा उपलब्ध नसल्यास अशा सुविधा ज्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत तेथे 108 रुग्णालयामार्फत स्थलांतरित केले जाते.
  • स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024 अंतर्गत अपघात झालेल्या नागरिकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा दिल्या जातात.

Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024:योजनेचे लाभार्थी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोणताही व्यक्ती या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवू शकतो.
  • महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही रस्त्यावर अपघात झाल्यास जखमी झालेला व्यक्ती योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहे.

Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024:लाभ

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?

  • स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024 च्या माध्यमातून अपघात ग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्याची सुविधा दिली जाते.
  • त्याचबरोबर अपघात झालेल्या व्यक्तीला तीन दिवसांपर्यंत हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जातात.
  • या योजनेच्या माध्यमातून अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला घरी किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिकेतून पोहोचविले जाते.
  • रुग्णवाहिकेसाठी एक हजार रुपयांपर्यंतचा खर्च शासनामार्फत केला जातो.
  • स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024 अंतर्गत 30 हजार रुपयांच्या विमा संरक्षण अंतर्गत अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात दाखल करणे, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे तसेच औषधोपचार केले जातात.
Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024

Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024” साठी काय काय पात्रता? कोणत्या अटी व शर्ती आहेत?

  • सदर योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अपघात झालेल्या व्यक्तीकडे वैध आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • महत्वाचं म्हणजे अपघात झालेला व्यक्ती हा रस्ते अपघातात जखमी झालेला असणे आवश्यक आहे.
  • अपघातग्रस्त व्यक्तीचा अपघात झाल्यानंतर 72 तासांच्या आत वैद्यकीय उपचार घेण्यास सुरुवात झालेली असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर अपघात ग्रस्त नागरिकाने अपघाताच्या 30 दिवसांच्या आत “स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024” साठी अर्ज करणे आवश्यक राहील.

Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • अपघातग्रस्त व्यक्तीचे आधार कार्ड
  • अपघाताचा पोलिस अहवाल
  • रुग्णालयातून मिळालेली वैद्यकीय पावती
  • अपघातग्रस्त व्यक्तीचा अपघात झालेल्या तारखेस महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा

Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

  • Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024 (स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी अर्जदारस ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • त्यासाठी अर्जदार व्यक्तीला सर्वप्रथम संबंधित जिल्हा चिकित्सालयाकडुन अर्ज घ्यावा लागणार आहे.
  • त्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरायची आहे.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
  • आता तुमचा अर्ज संबंधित जिल्हा चिकित्सालयामध्ये जमा करायचा आहे.
  • अशाप्रकारे तुमची Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024 (स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024) ची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
मोफत शौचालय योजना 2024ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024
विहीर अनुदान योजना २०२४ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
शेळी पालन योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024पंचायत समिती योजना 2024
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024मृदा आरोग्य कार्ड योजना 2024
डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना 2024देवदासी कल्याण योजना 2024
ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना 2024सोयाबीन कापूस अनुदान योजना 2024
Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024:FAQ’s
Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024 (स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024) ची सुरुवात कोणी आणि कधी केली?

सदर योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य शासनाने 16 सप्टेंबर 2020 रोजी केली आहे.

Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024 (स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

अपघात झालेल्या व्यक्तीला 72 तासाच्या आत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024 (स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून अपघात ग्रस्तांना 30 हजार रुपयांच्या विमा संरक्षण अंतर्गत आवश्यक ती मदत केली जाणार आहे.

Balasaheb Thakre Apghat Vima Yojana 2024 (स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.