Gatai Stall Yojana 2024:राज्यातील गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल!!

Table of Contents

Gatai Stall Yojana In Marathi 2024

Gatai Stall Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Gatai Stall Yojana 2024 (गटई स्टॉल योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. राज्य सरकारने आपल्या राज्यातील गटई कामगारांना मोफत पत्र्याचे स्टॉल देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही योजना? यायोजनेची सुरुवात कोणी केली? या योजनेचे मुख्य उद्देश काय काय आहेत? या योजनेचे वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी काय काय पात्रता तसेच कोणत्या अटी व शर्ती आवश्यक आहेत? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत? आणि या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

आपल्या महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी म्हणजेच राज्यातील महिलांसाठी, वृद्ध नागरिकांसाठी, राज्यातील तरुण वर्गासाठी, त्याचबरोबर आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार सातत्याने नवनवीन योजना राबवत असते. त्याचप्रमाणे राज्यातील छोटे मोठे व्यवसाय करणारे म्हणजेच रस्त्याच्या बाजूला आपले छोटेसे दुकान मांडून बसणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असते. अशातच एक योजना राज्यातील गटई कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केली आहे, ती म्हणजेच Gatai Stall Yojana 2024 (गटई स्टॉल योजना 2024) होय.

या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील गटई कामगारांना अगदी मोफत पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपल्या राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती चामड्याच्या विविध वस्तु तसेच पादत्राणे दुरुस्तीचे काम करत असतात. हे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला बसून आपले काम करत असतात. आपली व आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे ते ऊन, वारा, पाऊस न पाहता रस्त्याच्या कडेला बसून आपला छोटासा व्यवसाय करत असतात.

त्यांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. आपल्या कुटुंबातील सदस्यांचे पोट भरण्यासाठी ते ऊन असो वा पाऊस कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले काम सोडत नाहीत. त्यांना खूप समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्या या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून महाराष्ट्र राज्य शासनाने Gatai Stall Yojana 2024 (गटई स्टॉल योजना 2024) सुरू करण्याचा अतीशय योग्य असा निर्णय घेतला आहे.

Gatai Stall Yojana 2024

गटई स्टॉल योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावGatai Stall Yojana 2024
(गटई स्टॉल योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
योजना कधी सुरू झाली2013
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य
योजनेचे मुख्य उद्देशमहाराष्ट्र राज्यातील गटई कामगारांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील चर्मकार समाज
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभमोफत पत्र्याचे स्टॉल दिले जाणार आहे
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Gatai Stall Yojana 2024 नक्की काय आहे?

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत Gatai Stall Yojana 2024 (गटई स्टॉल योजना 2024) ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील चर्मकार समाजातील व्यक्ती जे रस्त्याच्या कडेला किंवा झाडाखाली बसून आपला व्यवसाय करतात,अशा व्यावसायिकांना शासनामार्फत मोफत पत्र्याचे स्टॉल दिले जाणार आहे.

आपल्या राज्यातील गटई कामगारांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे त्याचबरोबर त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात 100 टक्के सहाय्यक अनुदानावर Gatai Stall Yojana 2024 (गटई स्टॉल योजना 2024) अंतर्गत मोफत पत्र्याचे स्टॉल बांधून दिले जाणार आहेत. त्यामुळे गटई कामगारांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

या योजनेच्या माध्यमातून गटई कामगारांना मोफत पत्र्याचे स्टॉल मिळाल्यामुळे त्यांचा ऊन, वारा, पाऊस यापासून बचाव होईल. त्याचबरोबर ते सावलीत बसून आपले काम आनंदाने करतील. Gatai Stall Yojana 2024 (गटई स्टॉल योजना 2024) च्या माध्यमातून नक्कीच आपल्या राज्यातील गटई कामगारांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होणार आहे. त्याचबरोबर या व्यावसायिकांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान देखील सुधारले जाणार आहे.

Gatai Stall Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “गटई स्टॉल योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • आपल्या राज्यातील गटई कामगारांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाने Gatai Stall Yojana 2024 (गटई स्टॉल योजना 2024) सुरू केली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून पादत्राणे दुरुस्ती करणाऱ्या गटई कामगारांची आर्थिक स्थिती सुधारणे.
  • राज्यातील चर्मकार समाजातील व्यावसायिकांना आपला व्यवसाय करताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांना या योजनेअंतर्गत मोफत पत्र्याचे स्टॉल देण्यात येणार आहे.
  • त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यातील चर्मकार समाजातील पादत्राणे दुरुस्ती करणाऱ्या व्यवसायिकांचे जीवनमान सुधारणे, हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Gatai Stall Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “गटई स्टॉल योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत Gatai Stall Yojana 2024 (गटई स्टॉल योजना 2024) ही योजना राबविली जाते.
  • गटई स्टॉल योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गटई कामगारांना 100 टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करून दिले जातात.
  • या योजनेच्या माध्यमातून 100 टक्के अनुदानावर म्हणजेच अगदी मोफत पत्र्याचे स्टॉल मिळाल्यामुळे लाभार्थी गटई कामगारांना स्वतःच्या खिशातून रक्कम भरण्याची गरज नाही.
  • त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील चर्मकारी समाजातील अपंग व्यक्तींना प्राधान्य दिले जाणार आहे.
  • महत्वाचं म्हणजे गटई स्टॉल योजना 2024 च्या माध्यमातून मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी व्यक्तीच्या थेट बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येणार आहे.
  • मित्रांनो, या योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया अतीशय सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे सदर योजनेचा अर्ज करताना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

Gatai Stall Yojana 2024:योजनेचे लाभार्थी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “गटई स्टॉल योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील चर्मकार समाजातील नागरिक, जे रस्ताच्या कडेला बसून आपला व्यवसाय करतात ते Gatai Stall Yojana 2024 (गटई स्टॉल योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत.

Gatai Stall Yojana 2024:लाभ

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “गटई स्टॉल योजना 2024” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?

  • गटई स्टॉल योजना 2024 च्या माध्यमातून राज्यातील चर्मकार समाजातील व्यावसायिकांना 100 टक्के अनुदानावर म्हणजेच अगदी मोफत पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
Gatai Stall Yojana 2024 1

Gatai Stall Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “गटई स्टॉल योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहेत? कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत?

  • Gatai Stall Yojana 2024 (गटई स्टॉल योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाचा या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे.
  • राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा अर्ज करता येणार नाही, त्यांना या योजनेच्या माध्यमातून कोणताही लाभ दिला जाणार नाही.
  • राज्यातील अर्जदार व्यक्ती हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  • अर्जदार व्यक्तीचे वय 18 वर्षे ते 50 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीला आपल्या व्यवसायाचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर अर्जदारच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 98 हजार रुपये हे ग्रामीण भागासाठी असणे आवश्यक आहे, तसेच शहरी भागासाठी 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीकडे जातीचा दाखला असावा.
  • महत्वाचं म्हणजे अर्जदाराने या पूर्वी जर केंद्र आणि राज्य सरकारद्वारे सुरू असलेल्या कुठल्याही योजनेच्या माध्यमातून पत्र्याच्या स्टॉलचा लाभ घेतला असेल तर अशा व्यक्तीस या योजनेच्या माध्यमातून कुठलाही लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार व्यक्ती हा सरकारी नोकरीमध्ये कार्यरत नसावा.
  • अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची जागा असणे आवश्यक आहे.
  • तसेच ती जागा ग्रामपंचायत, कंटेंटमेंट बोर्ड किंवा महानगरपालिकेने भाड्याने/ खरेदी केलेली किंवा मोफत उपलब्ध करून दिलेली असणे आवश्यक आहे.

Gatai Stall Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “गटई स्टॉल योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँक खात्याचा तपशील
  • अर्जदार व्यक्ती जर अपंग असेल तर अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  • प्रतिज्ञापत्र

Gatai Stall Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “गटई स्टॉल योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑफलाइन अर्ज पद्धत :-

  • Gatai Stall Yojana 2024 (गटई स्टॉल योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी अर्जदारास ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करावे लागणार आहेत.
  • त्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जावे लागणार आहे.
  • त्याठिकाणी गेल्यानंतर गटई स्टॉल योजनेचा अर्ज घ्यावा लागणार आहे.
  • अर्ज घेतल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी लागणार आहे.
  • आता संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • आता तुम्हाला तुम्ही भरलेला अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायचा आहे, आपण भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • अर्जात संपूर्ण माहिती अचूक असल्यास तुम्ही तुमचा अर्ज संबंधित कार्यालयात जमा करू शकताय.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची Gatai Stall Yojana 2024 (गटई स्टॉल योजना 2024) ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
  • तुमच्या अर्जाची संपूर्ण पडताळणी केल्यानंतर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “गटई स्टॉल योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
मोफत शौचालय योजना 2024ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024
विहीर अनुदान योजना २०२४ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
शेळी पालन योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024पंचायत समिती योजना 2024
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024मृदा आरोग्य कार्ड योजना 2024
स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024आम आदमी विमा योजना 2024
डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना 2024देवदासी कल्याण योजना 2024
ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना 2024सोयाबीन कापूस अनुदान योजना 2024
Gatai Stall Yojana 2024:FAQ’s
Gatai Stall Yojana In Maharashtra 2024 (गटई स्टॉल योजना 2024) योजना कोणी आणि कधी सुरू केली?

सदर योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 2013 साली केली आहे.

Gatai Stall Yojana In Maharashtra 2024 (गटई स्टॉल योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील गटई कामगारांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Gatai Stall Yojana In Maharashtra 2024 (गटई स्टॉल योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील नागरिक लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

Gatai Stall Yojana In Maharashtra 2024 (गटई स्टॉल योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

गटई स्टॉल योजना 2024 च्या माध्यमातून लाभार्थी व्यक्तीस पत्र्याचे स्टॉल अगदी मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Gatai Stall Yojana In Maharashtra 2024 (गटई स्टॉल योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.