Vidyadhan Scholarship Yojana 2024:महाविद्यालायत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती!!

Table of Contents

Vidyadhan Scholarship Yojana In Marathi 2024

Vidyadhan Scholarship Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Vidyadhan Scholarship Yojana 2024 (विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शासनामार्फत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया ही योजना नक्की काय आहे? ही योजना कोणी आणि कधी सुरू केली? या योजनेचे उद्देश आणि वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून लाभ कोण कोण घेऊ शकणार आहे? या योजनेसाठी लाभार्थी कोण कोण असणार आहे? काय काय पात्रता आणि कोणत्या कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत? तसेच या योजनेचा अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या खालील लेखाद्वारे पाहणार आहोत.

आपल्याला माहितीच आहे की, आपल्या महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंबे ही आज देखील आपले जीवन दारिद्र्यरेषे खाली जगत आहेत. त्यांच्याकडे कायमस्वरूपी कुठलीही नोकरी नसते. त्यामुळे हाताशी येईल ते काम त्यांना करावे लागते. तसेच आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असतो. उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते.

अशातच या वाढत चाललेल्या महागाईमुळे त्यांना इच्छा असून देखील आपल्या मुला-बाळांना शिकवता येत नाही. दिवसेंदिवस वाढत असणारे शिक्षण शुल्क त्यांना परवडणारे नसते. त्यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील मुले 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षण सोडून देतात, कारण महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ नसते.

त्याचबरोबर काही कटुंबे आपली मुले मोठी व्हावीत, त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करावे, त्यांनी त्यांच्या पायावर उभे राहावे, त्यांची स्वप्न पूर्ण करावी यासाठी इतर कोणाकडून कर्ज घेतात. परंतु कर्ज परत न फेडू शकल्यामुळे त्यांना अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांच्या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून विद्यार्थी फाउंडेशन ने राज्यातील इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी Vidyadhan Scholarship Yojana 2024 (विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024) सुरू करण्यात आली आहे.

Vidyadhan Scholarship Yojana 2024

विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावVidyadhan Scholarship Yojana 2024
(विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीविद्यार्थी फाउंडेशन
योजनेची सुरुवात कधी झाली1999
राज्यमहाराष्ट्र राज्य
योजनेचे मुख्य उद्देशविद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे
योजनेचे लाभार्थीआर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील 10 वी उत्तीर्ण विद्यार्थी
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ20,000/- रुपये पर्यंत वार्षिक शिष्यवृत्ती
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Vidyadhan Scholarship Yojana 2024 नक्की काय आहे?

राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे यासाठी विद्यार्थी फाउंडेशन ने Vidyadhan Scholarship Yojana 2024 (विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024) ची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील महाविद्यालयीन शिक्षण म्हणजेच 11 वी, 12 चे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Vidyadhan Scholarship Yojana 2024 (विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024) मुळे राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत. या योजनेअंतर्गत 12 वी आणि पदवी पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेत प्राप्त गुणवत्तेवर शिष्यवृत्ती आधारित राहील. ही योजना सरोजिनी दामोदर फाउंडेशन द्वारे राबविण्यात येणारी भारत देशातील उच्च शिक्षण शिष्यवृत्ती आहे. या फाउंडेशनची स्थापना 1999 मध्ये श्री एसडी शिबुलाल संस्थापक इन्फोसिस आणि श्रीमती कुमारी शिबुलाल व्यवस्थापकीय विश्वस्थ यांनी केली होती.

महत्वाचं म्हणजे विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024 च्या माध्यमातून आतापर्यंत केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, ओडिसा आणि दिल्ली या ठिकाणी 27 हजाराहून जास्त शिष्यवृत्ती वितरित केल्या आहेत. त्याचबरोबर यामध्ये आत्ताच्या घडीला 47 हजाराहून अधिक विद्यार्थी आहेत.

मित्रांनो, तुम्हालाही या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवायचा असल्यास तुम्ही हा संपूर्ण लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि जवळच्या नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024 च्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळवता येईल.

Vidyadhan Scholarship Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहे?

  • राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी शिष्यवृत्ती देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे.
  • त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारणे, हे देखील या योजनेचे उद्देश आहे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024 च्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे.
  • राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढविणे.
  • आणि महत्वाचं म्हणजे राज्यातील विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू देऊ नये.

Vidyadhan Scholarship Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहे?

  • राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करता यावे, त्यांना कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून विद्याधन फाउंडेशन यांनी Vidyadhan Scholarship Yojana 2024 (विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024) ची सुरुवात केली आहे.
  • Vidyadhan Scholarship Yojana 2024 (विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024) च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रतिवर्ष 10 ते 20 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
  • तसेच या योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
  • सदर योजनेची अर्ज प्रक्रिया अतीशय सोपी असल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करतेवेळी कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.
  • त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळाल्यानंतर विद्यार्थी स्वावलंबी बनतील.
  • तसेच विद्यार्थ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे.

Vidyadhan Scholarship Yojana 2024:लाभार्थी

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • Vidyadhan Scholarship Yojana 2024 (विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील इयत्ता 10 वी पास झालेले विद्यार्थी पात्र आहेत.

Vidyadhan Scholarship Yojana 2024:लाभ

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?

  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी प्रतिवर्ष 10 ते 20 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
  • विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024 च्या माध्यमातून विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनणार आहेत.
  • विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
  • विद्यार्थ्यांचे जीवनमान या योजनेच्या माध्यमातून सुधारणार आहे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्याही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
Vidyadhan Scholarship Yojana 2024

Vidyadhan Scholarship Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहे? कोणत्या कोणत्या अटी व शर्ती आहेत?

  • Vidyadhan Scholarship Yojana 2024 (विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी इच्छुक असणारा अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार विद्यार्थी हा 10 वी पास असणे आवश्यक आहे.
  • आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्याला इयत्ता 10 वी मध्ये 85 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणे असणे आवश्यक आहे.
  • जर विद्यार्थी अपंग असेल तर त्यास इयत्ता 10 वी मध्ये 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर अर्जदार विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनाच लाभ दिला जाणार आहे.
  • विद्यार्थ्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कार्यरत नसावा.
  • अर्जदार विद्यार्थ्याने जर या पूर्वी राज्य किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून लाभ घेतला असेल तर, त्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार विद्यार्थ्याने जर अर्धवट शिक्षण सोडले असेल तर त्या विद्यार्थ्याला Vidyadhan Scholarship Yojana 2024 (विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024) च्या माध्यमातून लाभ दिला जाणार नाही.

Vidyadhan Scholarship Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत?

  • अर्जदार विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • दहावी उत्तीर्ण मार्कशीट
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

Vidyadhan Scholarship Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • Vidyadhan Scholarship Yojana 2024 (विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावे लागणार आहेत.
  • त्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांना सर्वप्रथम विद्याधन स्कॉलरशिप च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
  • अधिकृत वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर होमपेज उघडेल.
  • त्यामध्ये तुम्हाला ‘Apply For Scholarship’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला ‘Maharashtra 11th std Program’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर काही अटी व शर्ती दिसतील, टया तुम्हाला वाचून घायच्या आहेत.
  • त्यानंतर खाली तुम्हाला ‘Apply Now’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, त्यामध्ये ‘Student Registration’ चा अर्ज उघडेल.
  • आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे.
  • त्यानंतर ‘Register’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या gmail वर कन्फर्मेशन ची एक लिंक येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया पूर्ण होईल.
  • आता तुम्हाला तुमचा मेल आयडी आणि पासवर्ड टाकून पुन्हा लॉगइन करावे लागणार आहे.
  • लॉगइन केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला ‘Maharashtra 11th std Program’ मध्ये ‘Apply Now’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024 चा अर्ज उघडेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक आणि अचूकपद्धतीने भरायची आहे.
  • तसेच आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला ‘सबमीट’ या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची Vidyadhan Scholarship Yojana 2024 (विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
मोफत शौचालय योजना 2024ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024
विहीर अनुदान योजना २०२४ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
शेळी पालन योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024पंचायत समिती योजना 2024
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना 2024
गटई स्टॉल योजना 2024स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024
पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024महाडीबीटी शेतकरी योजना 2024
आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024मुख्यमंत्री राजश्री योजना 2024
Vidyadhan Scholarship Yojana 2024:FAQ’s
Vidyadhan Scholarship Yojana 2024 (विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?

सदर योजनेची सुरुवात विद्यार्थी फाउंडेशन यांनी केली आहे.

Vidyadhan Scholarship Yojana 2024 (विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे,

Vidyadhan Scholarship Yojana 2024 (विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील 10 वी उत्तीर्ण विद्यार्थी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

Vidyadhan Scholarship Yojana 2024 (विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024) चा अर्ज कसा करायचा?

विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024 चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.