Bima Sakhi Yojana 2024
Bima Sakhi Yojana In Marathi 2024: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार देशभरातील महिलांच्या कल्याणासाठी सातत्याने नवनवीन योजना राबवत असते. अशाच एका योजनेची आपण आज माहिती जाणून घेणार आहोत, ती म्हणजेच “विमा सखी योजना 2024” होय. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील महिलांना दरमहा सात हजार रुपये मिळणार आहेत. ते कसे मिळणार? काय आहे नक्की ही योजना? या योजनेचे मुख्य उद्देश तसेच वैशिष्ट्ये काय काय आहेत? संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पहाणार आहोत.
मित्रांनो, केंद्र सरकार सतत महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी त्याचबरोबर महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने नवनवीन योजना राबवत असते. अशातच केंद्र सरकारने महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच विमा सखी योजना होय.
चला तर मग जाणून घेऊया या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? ही योजना कोणी आणि कधी सुरू केली? या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र असणार आहे? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे? या योजनेचा अर्ज कसा करायचा ई संपूर्ण माहिती पाहूया.
विमा सखी योजना 2024 थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Bima Sakhi Yojana 2024 (विमा सखी योजना 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | पंतप्रधान नरेंद्र मोदी |
योजनेचे सुरुवात कधी करण्यात आली | 09 डिसेंबर 2024 |
योजनेचे मुख्य उद्देश | देशभरातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे |
योजनेचे लाभार्थी | राज्यातील महिला |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | 7,000/- रुपये दरमहा |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
विमा सखी योजना म्हणजे काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारत देशातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजेच “विमा सखी योजना” होय. या योजनेची सुरुवात 9 डिसेंबर 2024 रोजी पानिपत हरियाणा येथे करण्यात आली. त्याचबरोबर भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी (LIC) या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीतून ही योजना राबविण्यात येत आहे.
विमा सखी योजना 2024 अंतर्गत देशातील 1 लाख महिलांचा विमा एजंट म्हणून समावेश करण्यात येणार असून, या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 35 हजार महिलांना विमा सखी बनविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून नक्कीच आपल्या देशभरातील महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होईल. त्याचबरोबर महिला सशक्त व आत्मनिर्भर देखील बनतील.
Bima Sakhi Yojana In Marathi 2024: योजनेचे मुख्य उद्देश
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “विमा सखी योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?
- देशातील महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
- महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य करणे.
- आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून देशभरातील 3 वर्षात तब्बल 2 लाख महिलांना स्वावलंबी बनविण्याचे उद्देश आहे.
विमा सखी योजनेच्या माध्यमातून काय लाभ मिळणार?
Bima Sakhi Yojana 2024 (विमा सखी योजना 2024) च्या माध्यमातून महिलांना 3 वर्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कालावधीमध्ये त्यांना स्टायपेंड देखील मिळणार आहे. तसेच महिलांचा प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर त्यांना एलआयसी एजंट म्हणून काम करता येणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विमा सखींना एलआयसी (LIC) मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.
विमा सखी योजना 2024 अंतर्गत महिलांना किती पैसे मिळणार?
Bima Sakhi Yojana 2024 (विमा सखी योजना 2024) अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून 7,000/- रुपये मिळणार आहेत. तसेच दुसऱ्या वर्षी महिलांना 6,000/- रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000/- रुपये रक्कम महिलांना दिली जाणार आहे.
महिलांनी दिलेले टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमिशन देखील दिले जाणार आहे. विमा सखी योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35 हजार महिलांना विमा योजनेचा फायदा होणार आहे, म्हणजेच त्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळणार आहेत. आणि दुसऱ्या टप्प्यात 50 हजार महिलांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे.
Bima Sakhi Yojana In Marathi 2024:पात्रता, अटी व शर्ती
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “विमा सखी योजना 2024” साठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहेत? कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत?
- Bima Sakhi Yojana 2024 (विमा सखी योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी फक्त महिलाच अर्ज करू शकणार आहेत.
- अर्जदार महिलेचे शिक्षण किमान इयत्ता 10 वी पास असणे आवश्यक आहे.
- त्याचबरोबर अर्जदार महिलेचे वय हे 18 ते 70 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिला पात्र ठरल्यास 3 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, त्यानंतर महिला विमा एजंट म्हणून कार्य करू शकणार आहेत.
विमा सखी योजना 2024 आवश्यक कागदपत्रे
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “विमा सखी योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत?
- अर्जदार महिलेचे आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट साईज फोटो
Bima Sakhi Yojana In Marathi 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “विमा सखी योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
- Bima Sakhi Yojana 2024 (विमा सखी योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
- त्यासाठी तुम्हाला एलआयसी च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- अधिकृत वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुम्हाला होमपेजवरील सर्वात खाली “Click here for Bima Sakhi” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी लागणार आहे.
- त्यानंतर कॅप्चा कोड भरून “सबमीट” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “विमा सखी योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Bima Sakhi Yojana In Marathi 2024:FAQ’s
Bima Sakhi Yojana 2024 (विमा सखी योजना 2024) ची सुरुवात कोणी आणि कधी केली?
विमा सखी योजना 2024 ची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी 09 डिसेंबर 2024 रोजी केली.
Bima Sakhi Yojana 2024 (विमा सखी योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?
देशभरातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
Bima Sakhi Yojana 2024 (विमा सखी योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?
सदर योजनेच्या माध्यमातून देशातील महिला लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
विमा सखी योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?
या योजनेच्या माध्यमातून महिलांना पहिल्या वर्षी 7 हजार रुपये दरमहा मिळणार आहेत. दुसऱ्या वर्षी 6 हजार तर तिसऱ्या वर्षी 5 हजार रुपये महिलांना दिले जाणार आहेत.
Bima Sakhi Yojana 2024 (विमा सखी योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?
विमा सखी योजना 2024 चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.