Credit Guarantee Scheme Maharashtra 2024:केंद्र सरकारने करोडो शेतकऱ्यांसाठी सुरू केली 1000 कोटींची “क्रेडिट गॅरंटी स्कीम”

Credit Guarantee Scheme Maharashtra 2024 In Marathi

Credit Guarantee Scheme Maharashtra 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने पीएम किसान योजनेनंतर सुरू केलेली “क्रेडिट गॅरंटी स्कीम” ही अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. केंद्र सरकार देशभरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत. पीएम किसानसह विविध योजना सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवत आहेत.

देशातील करोडो शेतकरी पीएम किसान निधी अंतर्गत 19 व्या हप्त्याची वात पाहत आहेत. अशातच आता केंद्र सरकारने शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी एक नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ती म्हणजेच Credit Guarantee Scheme पत हमी योजना होय. केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा शेतकरी बांधवांना भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे.

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया या योजनेचा तुम्हाला काय काय फायदा होणार आहे? या योजनेची वैशिष्ट्ये काय काय आहेत? त्याचबरोबर पात्रता काय काय असणार आहे? या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाचा लाभ कसा घेता येईल? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पहाणार आहोत.

Credit Guarantee Scheme Maharashtra 2024

Credit Guarantee Scheme Maharashtra 2024 शेतकऱ्यांना पिक काढणीनंतर मिळणार कर्ज

  1. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की शेतातील पिक काढणीनंतर ते लगेच बाजारात विक्रीसाठी पाठवले जात नाही. अनेकदा बाजारात पिकाला योग्यभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हे धान्य घरीच साठवून ठेवतात.
  2. त्यामुळे मात्र, पुढील पिक आणि खर्चासाठी शेतकऱ्यांकडे पुरेसा पैसा उरत नाही, अशा परिस्थितीत नाईलाजाने शेतकऱ्यांना अत्यंत कमी भावात धान्याची विक्री करावी लागते.
  3. आता मात्र शेतकऱ्यांची ही समस्या दूर होणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या शेताजवळच धान्य साठवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक गोदामे उभारण्याची योजना आखत आहे. आणि त्यासाठी मोठ्याप्रमाणात निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे.

केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी इलेक्ट्रॉनिक गोदामाच्या पावत्यांचा लाभ घेऊन, शेतकऱ्यांना पिक काढणीनंतर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद असलेली “क्रेडिट हमी योजना” सुरू केली.

अनेक बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देतात. अशा परिस्थितीत धान्य गोदामांच्या पावत्यांवर हमी देऊन बँकाकडून शेतकऱ्यांना सहजरित्या कर्ज उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Credit Guarantee Scheme Maharashtra 2024 फायदा

या योजनेचा सर्वाधिक फायदा हा लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील रोखीचा प्रवाह देखील सुधारण्यास मदत होईल. त्याचबरोबर शेतीमालाचे होणारे नुकसान देखील कमी होईल.

Credit Guarantee Scheme Maharashtra 2024 गोदामांमध्ये साठवून ठेवलेल्या धान्यावर कर्ज मिळेल

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी 1,000 कोटी रुपयांची क्रेडिट गॅरंटी स्कीम सुरू केली आहे. अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले की, सध्या 21 लाख रुपयांच्या एकूण कृषी कर्जापैकी कापणीनंतरचे कर्ज केवळ 40,000 हजार कोटी रुपये आहे. सध्या ई-एनडब्ल्यूआर अंतर्गत कर्ज फक्त 4,000 कोटी रुपये आहे.

त्याचबरोबर चोप्रा म्हणाले की पुढील 10 वर्षात कापणीनंतरचे कर्ज हे 5.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल अशी आमची अपेक्षा आहे. तसेच हे लक्ष्य बँकिंग आणि गोदाम क्षेत्राच्या प्रयत्नांनी साध्य केले जाऊ शकते.

शेतकऱ्यांमध्ये हमी भावात जागरूकता निर्माण करणे, डिपॉझिटरी शुल्काचे पुनरावलोकन करणे आणि सध्याच्या 5,800 च्या पुढे गोदाम नोंदणी वाढविणे यावरही सचिवांनी भर दिला आहे.

Credit Guarantee Scheme Maharashtra 2024 शेतकरी आणि धान्य गोदमांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे क्रेडिट गॅरंटी स्कीम सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून व्यापारी आपला माल अधिक दिवस गोदमांमध्ये सुरक्षितरीत्या साठवू शकतील आणि त्या बदल्यात त्यांना बँकांकडून सहज कर्ज मिळू शकेल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “Credit Guarantee Scheme Maharashtra 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तुम्ही ही माहिती आपल्या जवळील नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करण्यास विसरू नका. त्याचबरोबर अशाच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या द महारोजगार डॉट कॉम या वेबसाइटला वेळोवेळी भेट देत रहा.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
गाय गोठा अनुदान योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024
कृषी उन्नती योजना 2024राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024
महाडीबीटी शेतकरी योजना 2024प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024
महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना 2024थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024