Pradhan Mantri Matsya Sampada Yojana In Marathi
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2026: नमस्कार मित्रांनो आपण आजच्या या लेखात केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या एका महत्वपूर्ण योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की केंद्र आणि राज्य सरकार आपल्या राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी त्याचबरोबर देशभरातील शेतकरी बांधवांसाठी विविध योजना राबवत असते. त्यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना होय.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2026 Latest Update: प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2026 मध्येही सुरू असून केंद्र सरकारने मत्स्य क्षेत्राच्या विकासासाठी ₹2.500 कोटींची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मत्स्य तलाव, बायोफ्लॉक, मत्स्यबीज उत्पादन तसेच इतर मत्स्यपालन प्रकल्पांसाठी 40% ते 60% पर्यंत अनुदानाचा लाभ मिळू शकतो.
⇒ हे देखील वाचा: प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2026–27: नवीन अपडेट आणि लाभ वेबस्टोरी
मित्रांनो, आपला भारत देश हा जगातील दूसरा सर्वात मोठा मासे उत्पादक आणि चौथा सर्वात मोठा मासे निर्यात करणारा देश आहे. आपल्या भारत देशातील बहुतांश संख्येने नागरिक मत्स्यपालन हा व्यवसाय करतात. मत्स्यपालन व्यवसाय करत असताना नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामाना करावा लागू नये, त्याचबरोबर शेतकऱ्यांना मत्स्यपालन हा व्यवसाय करून आपले जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया ही योजना कोणी आणि कधी सुरू केली? ही योजना नक्की काय आहे? काय आहेत या योजनेचे फायदे? या योजनेची वैशिष्ट्ये आणि उद्देश काय काय आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून तुम्ही लाभ कसा मिळवू शकताय व त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे? आय संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे या लेखात जाणून घेणार आहोत.

| योजनेचे नाव | Pradhan Mantri Matsya Sampada Yojana (PMMSY) प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना |
| योजनेची सुरुवात कोणी केली | केंद्र सरकार |
| विभाग | मत्स्य विभाग (Department of Fisheries) |
| योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली | 10 सप्टेंबर 2020 |
| राज्य | महाराष्ट्र |
| उद्देश | देशातील मत्स्योत्पादन क्षेत्राला चालना देणे |
| योजनेचे लाभार्थी | मच्छीमार, मत्स्य शेतकरी |
| अर्ज कसा करायचा | ऑनलाइन /ऑफलाइन |
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana (PMMSY) नक्की काय आहे?
केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी एकूण 20 हजार 50 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना लाभ मिळणार आहे. Pradhan Mantri Matsya Sampada Yojana (PMMSY) ही योजना मत्स्य पालन, पशुपालन त्याचबरोबर डेरी मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेली एक अत्यंत महत्वाची योजना आहे.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे मुख्य उद्देश देशातील मत्स्य उत्पादन वाढवणे, मत्स्य निर्यातीला चालना देणे, आधुनिक मत्स्यपालनाला प्रोत्साहन देणे आणि मत्स्यशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. यासाठी मच्छिमारांना आवश्यक असलेल्या सर्वप्रकारच्या सुविधांचा पुरवठा करणे, तसेच देशातील मत्स्य पालन क्षेत्रातील जवळपास 55 लाख रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे, हा आहे.
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana (PMMSY) प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला मोदी सरकारद्वारे “ब्ल्यु रिव्होल्यूशन” असे नाव देण्यात आले आहे. Pradhan Mantri Matsya Sampada Yojana (PMMSY) या योजनेअंतर्गत मत्स्यपालन क्षेत्रातील विविध प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य आणि अनुदान दिले जाते. महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी अर्थसंकल्पात एकूण 20 हजार 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana लाभार्थी
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना” चे लाभार्थी कोण कोण आहेत?
- फिशर
- मत्स्य शेतकरी
- मासे कामगार /मासे विक्रेते
- मत्स्य विकास महामंडळ
- मासेमारी क्षेत्र
- मत्स्यव्यवसाय सहकारी संघटना
- मत्स्यपालन संघटना
- उद्योजक आणि खाजगी कंपन्या
- मत्स्य शेतकरी उत्पादक संस्था व कंपन्या
- अनुसूचित जाती/ जमाती/ महिला/ विविध सक्षम व्यक्ती
- बचत गटांमध्ये संयुक्त दायित्व गट
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana (PMMSY)पात्रता
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना” साठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे?
- Pradhan Mantri Matsya Sampada Yojana (PMMSY) प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेला नागरिक हा भारत देशाचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- देशभरातील सर्व मत्स्य उत्पादक शेतकरी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
- त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले नागरिक देखील या योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ शकतात.
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana आवश्यक कागदपत्रे
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- अर्जदाराचे आधार कार्ड
- मासेमारी कार्ड
- अर्जदाराचा जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
- मोबाइल नंबर
- बँक खात्याचा तपशील
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana: अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना” चा अर्ज कसा करायचा आहे?
● ऑनलाइन अर्ज प्रकिया :
- Pradhan Mantri Matsya Sampada Yojana (PMMSY) प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारास सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइट https://dof.gov.in/pmmsy ला भेट द्यावी लागणार आहे.
- वेबसाइट उघडल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन होमपेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला स्कीम विभागातील “PMMSY” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला “Booklet of Pradhan Mantri Matsya Sampada Yojana” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा अर्ज ओपन होईल.
- आता तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
- संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक भरल्यानंतर तुम्हाला त्यासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज व्यवस्थित तपासून घ्यायचा आहे.
- आणि शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक करून आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
- मित्रांनो, अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही Pradhan Mantri Matsya Sampada Yojana (PMMSY) प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा अर्ज भरू शकताय.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला Pradhan Mantri Matsya Sampada Yojana (PMMSY) “प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
कृपया ही सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी योजनांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.
