Asmita Yojana 2024: या योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळणार कमी दरात सॅनिटरी नॅपकिन!

Asmita Yojana 2024 In Marathi

Asmita Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात अस्मिता योजना 2024 ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच आपले महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील महिलांच्या कल्याणासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. अशातच महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांच्या व मुलींच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी एक योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच “अस्मिता योजना” होय.

अस्मिता योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकारने 8 मार्च 2018 रोजी करण्यात आली आहे. आपल्या राज्यातील ग्रामीण भागातील महिला व मुली त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील किशोरवयीन म्हणजेच 11 ते 19 वयोगटातील मुली यांना अतीशय कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप या योजनेअंतर्गत करण्यात येते.

मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की ग्रामीण भागात आज देखील मासिक पाळी बद्दल अनेक गैरसमज आहेत. राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना व मुलींना मासिक पाळीच्या दरम्यान वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावी भरपूर समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर ग्रामीण भागातील महिला व मुलींना सॅनिटरी नॅपकिन महाग असल्यामुळे ते विकत घेऊ शकत नाहीत. तसेच मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी नॅपकिन न वापरल्यामुळे त्यांना विविध प्रकारचे आजार जडतात.

आपल्या राज्यातील ग्रामीण भागातील महिला व मुलींना स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली “अस्मिता योजना” ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. चला तर मग पाहूया या योजनेची संपूर्ण माहिती.

जसे की ही योजना नक्की काय आहे, या योजनेची सुरुवात कोणी केली, या योजनेचे मुख्य उद्देश आणि वैशिष्ट्ये काय काय आहेत, या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकणार आहे, या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे, या योजनेच्या मध्यमातू लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे, त्याचबरोबर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पहाणार आहोत.

Asmita Yojana 2024

अस्मिता योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावAsmita Yojana 2024
(अस्मिता योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीमहाराष्ट्र शासन
योजनेची सुरुवात कधी झाली08 मार्च 2018
राज्यमहाराष्ट्र
विभागग्राम विकास विभाग, महाराष्ट्र राज्य
योजनेचे मुख्य उद्देशग्रामीण भागातील महिला व मुलींना अतीशय कमी दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
योजनेचे लाभार्थीराज्यातील ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या किशोरवयीन मुली
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभअत्यंत कमी दरात सॅनिटरी नॅपकिन मिळणार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Asmita Yojana 2024:योजनेचे मुख्य उद्देश

चला तर मग जाणून घेऊया “अस्मिता योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • राज्यातील ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळेतील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना अत्यंत कमी दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • ग्रामीण भागातील महिला व मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे.
  • त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिला व मुलींचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांचे व किशोरवयीन मुलींचे जीवणामन सुधारणे.
  • महिला व मुलींना सशक्त व आत्मनिर्भ्रर बनविणे, हे देखील या योजनेचे उद्देश आहे.

Asmita Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग जाणून घेऊया “अस्मिता योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांचे व मुलींचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने त्याचबरोबर त्यांच्या मासिक पाळी दरम्यान वैयक्तिक स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली “अस्मिता योजना” ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
  • त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत राबविण्यात आलेली ही एक महत्वाची योजना आहे.
  • अस्मिता योजनेअंतर्गत स्वयंसहायता समूहाची सॅनिटरी नॅपकिन ची मागणी कण्यासाठी अस्मिता योजना हे मोबाईल अॅप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे.
  • राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून मुलींना “अस्मिता कार्ड” देखील देण्यात येते.
  • महत्वाचं म्हणजे ही योजना प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळेतील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे.
Asmita Yojana 2024

Asmita Yojana 2024:अस्मिता कार्ड

चला तर मग जाणून घेऊया “अस्मिता योजना 2024” च्या माध्यमातून अस्मिता कार्ड कसे मिळणार आहे?

  • अस्मिता योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील मुलींना त्यांचे नाव आपले सरकार सेवा केंद्र मार्फत नोंदणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर मुलींना अस्मिता योजना अंतर्गत अस्मिता योजना कार्ड दिले जाईल. त्यानंतर लाभार्थी मुलींना बचत गटाकडून सॅनिटरी नॅपकिन ची खरेदी करता येईल.
  • अस्मिता कार्ड अंतर्गत शासनाकडून बचत गटांना पॅकेटच्या संख्येच्या प्रमाणात प्रति पॅकेट 15.20 रुपयांप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.
  • सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना वर्षभरात एकूण 13 सॅनिटरी नॅपकिनचे पॅकेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Asmita Yojana 2024:योजनेचे लाभार्थी

चला तर मग जाणून घेऊया “अस्मिता योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • अस्मिता योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिला व मुली तसेच जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या 11 ते 19 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुली लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

Asmita Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग जाणून घेऊया “अस्मिता योजना 2024” चा लाभ घेण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • जन्म प्रमाणपत्र
  • बोनाफाईड
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

Asmita Yojana 2024:योजनेची अंमलबजावणी

  • प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतील मुलींकडे अस्मिता कार्ड असणे आवश्यक आहे.
  • जिल्हा परिषद शाळेमध्ये नोंदविलेल्या यादीमध्ये 11 ते 19 वयोगटातील सर्व मुलींची यादी मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रात प्रत्येक शाळेला जमा करावी लागेल.
  • त्यानंतर शाळेतील किशोरवयीन मुलींची नोंदणी आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्रप्रमुख गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन करतील, यासाठी मुलींकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.
  • त्याचबरोबर प्रत्येक मुलीच्या नोंदणीसाठी 5 रुपये प्रमाणे नोंदणी शुल्क शासनाकडून जमा करण्यात येईल.
  • नोंदणी झालेल्या सर्व मुलींचे अस्मिता कार्ड बनविणे जाईल तसेच ते उमेद मार्फत जिल्हा परिषद शाळेत पोहोचवण्यात येईल.
  • अस्मिता कार्ड मिळाल्यानंतर स्वयंसहायता गटाकडून मुलींना 5 रुपये किंमतीत सॅनिटरी नॅपकिन विकत घेता येईल.
Asmita Yojana 2024

Asmita Yojana 2024:नोंदणी

चला तर मग जाणून घेऊया “अस्मिता योजना 2024” च्या मोबाईल अॅप्लिकेशन माध्यमातून नोंदणी कशी करायची?

  • सर्वप्रथम अस्मिता मोबाईल अॅप्लिकेशन प्ले-स्टोअर वरुन डाउनलोड करावे लागेल.
  • त्यानंतर स्वयंसहायता गटांनी त्या अॅपवर NIC कोड टाकावा लागेल.
  • स्वयंसहायता गटांच्या नोंदणीकृत मोबईलवर नोंदणीसाठी OTP येईल, तो टाकावा लागेल.
  • तसेच जर एखाद्या स्वयंसहायता गटांचा मोबाईल नंबर हा NIC च्या SHG पोर्टलवर नोंदणी झालेला नसेल तर त्यांना त्या गटांना अस्मिता अॅपवर नोंदणी करता येणार नाही. त्यासाठी त्यांनी मोबाईल नंबरची नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • अस्मिता अॅप वरून सॅनिटरी नॅपकिन ची ऑनलाइन मागणी करण्यासाठी अस्मिता अॅपमध्ये असलेल्या वॉलेट मध्ये पुरेशी रक्कम असणे आवश्यक आहे.
  • जर त्यात पुरेशी रक्कम नसेल तर रिचार्ज करावे लागेल.
  • हे रिचार्ज तुम्हाला कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र द्वारे करता येईल.
  • त्याचबरोबर तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड चा वापर करून देखील रिचार्ज करू शकता.
  • प्रत्येक प्रकारच्या सॅनिटरी नॅपकिनची मागणी नोंदविताना ही 140 पॅकेटच्या पटीत नोंदविणे आवश्यक आहे. जसे की 240 मी. मी. चे किमान 140 पॅकेटत किंवा 280 मी. मी. चे किमान 140 पॅकेट किंवा मुलींसाठी 240 मी. मी. चे किमान 140 पॅकेट अशा प्रकारे नोंदणी नोंदवणे आवश्यक आहे.
  • आणि त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक एसएमएस पाठवला जाईल.
  • त्यानंतर सॅनिटरी नॅपकिन ची किंमत ही तुमच्या वॉलेट मधून डेबिट केली जाईल.
  • त्यानंतर तालुका पातळीवरील वितरकाकडून हे सॅनिटरी नॅपकिन त्यांच्या संबंधित स्वयंसहायता गटाकडे प्राप्त करून घेतील.
  • आणि अस्मिता पावती बद्दल नोंदणी करतील.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “अस्मिता योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
गाय गोठा अनुदान योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024
कृषी उन्नती योजना 2024राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024
महाडीबीटी शेतकरी योजना 2024प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024
महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना 2024थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024
Asmita Yojana 2024:FAQ’s
Asmita Yojana 2024 (अस्मिता योजना 2024) ची सुरुवात कोणी आणि कधी केली?

अस्मिता योजना 2024 ची सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकारने 08 मार्च 2018 रोजी केली.

Asmita Yojana 2024 (अस्मिता योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

ग्रामीण भागातील महिला व मुलींना अतीशय कमी दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Asmita Yojana 2024 (अस्मिता योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

राज्यातील ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या किशोरवयीन मुली या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.

Asmita Yojana 2024 (अस्मिता योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून अत्यंत कमी दरात सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहेत.

Asmita Yojana 2024 (अस्मिता योजना 2024) ची नोंदणी कशी करायची?

अस्मिता योजना 2024 ची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करायची आहे.