Ayushman Bharat Bima Yojana In Marathi 2024
Ayushman Bharat Bima Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Ayushman Bharat Bima Yojana 2024 (आयुष्मान भारत विमा योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील 70 वर्षावरील नागरिकांना भरपूर फायदा होणार आहे. देशभरातील 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे.
चला तर मग जाणून घेऊया Ayushman Bharat Bima Yojana 2024 (आयुष्मान भारत विमा योजना 2024) योजनेची सविस्तर माहिती जसे की नक्की काय आहे ही योजना? या योजनेची सुरुवात कोणी केली? या योजनेच्या माध्यमातून कोणाला लाभ घेता येणार आहे? ही योजना कशी काम करणार आहे? त्याचबरोबर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
केंद्र आणि राज्य सरकार आपल्या देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी सातत्याने नवनवीन योजना राबवत असते. देशभरातील तरुणांसाठी विविध प्रकारच्या कर्ज योजना असतील, जेणेकरून तरुणांना शासनामार्फत कर्ज मिळावे. त्या कर्जाच्या मदतीने तरुण आपला स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहतील. तसेच देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कृषि योजना, देशभरातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना असतील, जेणेकरून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे व त्यांचे भविष्य उज्वल व्हावे.
त्याचबरोबर केंद्र सरकार आपल्या देशातील महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने नवनवीन योजना राबवत असते. तसेच देशभरातील वृद्ध नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील असते. अशातच देशभरातील 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच Ayushman Bharat Bima Yojana 2024 (आयुष्मान भारत विमा योजना 2024) होय.
आयुष्मान भारत विमा योजना 2024 नक्की काय आहे?
मित्रांनो, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये एक अतीशय महत्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या भारत देशातील 70 वर्षापेक्षा जस वय असलेल्या सर्व वृद्ध नागरिकांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमा भारत योजनेचा लाभ मिळणार आहे.
या मध्ये कुठल्याही प्रकारे गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव केला जाणार नाही महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून सर्व वृद्ध नागरिकांना लाभ दिला जाणार आहे. कॅबिनेट मध्ये झालेल्या निर्णयाची माहिती देत असताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून एक नवीन कॅटेगरी बनविण्यात येणार आहे.
Ayushman Bharat Bima Yojana 2024 (आयुष्मान भारत विमा योजना 2024) च्या माध्यमातून देशभरातील 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वृद्ध नागरिकांना 50 लाख रुपये पर्यंतच्या मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आयुष्मान भारत विमा योजना 2024 ची कार्यपद्धती
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आयुष्मान भारत विमा योजना 2024” कशाप्रकारे काम करणार आहे?
आपल्या देशातील असे कुटुंब की जे पहिल्यापासून आयुष्यमान भारत योजनेचा भाग आहेत. त्यांच्या कुटुंबातील जर एखादा व्यक्ती 70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेला असेल तर त्याला 5 लाख रुपये प्रति वर्ष अतिरिक्त टॉपअप मिळणार आहे.
Ayushman Bharat Bima Yojana 2024 (आयुष्मान भारत विमा योजना 2024) ची सविस्तर माहिती देत असताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाल्या की 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी एक युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज असणार आहे.
आयुष्यमान भारत च्या या कॅटेगरी मध्ये जर 70 वर्षापेक्षा जास्त वय असलेले कुटुंब असेल तर त्यांना 50 लाख रुपयांचा विमा कव्हर दोन्हीसाठी एकच असेल. याचा फायदा आपल्या देशातील मध्यमवर्गीयांसोबतच श्रीमंतांनाही होणार आहे.
आता आयुष्यमान भारत योजनेचा लाभ हा देशभरातील केवळ 12.3 कोटी कुटुंबांना मिळत आहे. तसेच देशभरातील वृद्धांसाठी सुरू करण्यात आलेल्या सुविधांचा लाभ जवळपास 4.5 कोटी कुटुंबांना म्हणजेच 60 कोटी जेष्ठ नागरिकांना मिळणार आहे.
Ayushman Bharat Bima Yojana 2024:सरकारी कर्मचाऱ्यांना देखील लाभ मिळणार
Ayushman Bharat Bima Yojana 2024 (आयुष्मान भारत विमा योजना 2024) च्या माध्यमातून देशभरातील असे वृद्ध नागरिक जे केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही आरोग्य योजना अथवा सैन्याची आरोग्य योजना मध्ये येत असतील तर त्यांना आपल्या जुन्या योजनेसोबत राहणे किंवा आयुष्यमान भारत योजनेचे कव्हर निवडणे हा पर्याय देण्यात येणार आहे.
कर्मचारी राज्य विमा योजना (ESCL) किंवा खाजगी हेल्थ इन्शुरन्स असलेल्या वृद्ध नागरिकांनाही आयुष्यमान भारत मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. Ayushman Bharat Bima Yojana 2024 (आयुष्मान भारत विमा योजना 2024) चा लाभ नागरिकांना मोफत दिला जाणार आहे. यासाठी सरकारने 3437 कोटी रुपयांचा निधी निश्चित केला आहे.
Ayushman Bharat Bima Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आयुष्मान भारत विमा योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
- Ayushman Bharat Bima Yojana 2024 (आयुष्मान भारत विमा योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागणार आहे.
- अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर पात्र व्यक्तीने आधार कार्ड किंवा रेशनकार्ड PMJAY कीओस्कवर सत्यापित करणे आवश्यक आहे.
- आणि त्यानंतर अर्जदाराला कुटुंब ओळख पुरावे सबमीट करावे लागणार आहेत.
- कुटुंबाचे ओळख पुरावे सबमीट केल्यानंतर तुम्हाला तुमचे ई कार्ड मिळेल.
Ayushman Bharat Bima Yojana 2024:समाविष्ट बाबी
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आयुष्मान भारत विमा योजना 2024” अंतर्गत समाविष्ट असलेल्या बाबी कोणत्या आहेत?
- वैद्यकीय तपासणी उपचार आणि सल्लामसलत
- औषधे आणि वैद्यकीय वस्तू
- प्री हॉस्पिटललायझेशन काळजी प्रवेश करण्यापूर्वी तीन दिवसांपर्यंत
- निदान आणि प्रयोगशाळा तपासणी
- नॉन इंटेसिव्ह आणि इंटेसिव्ह केअर सेवा
- वैद्यकीय रोपण आवश्यक असल्यास
- हॉस्पिटललायझेशन दरम्यान अन्न सेवा व निवास
- उपचारादरम्यान होणारी गुंतागुंत
- डिस्चार्ज नंतर पंधरा दिवसांपर्यंत हॉस्पिटललायझेशन फॉलोअप
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “आयुष्मान भारत विमा योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️