Kalakar Mandhan Yojana In Marathi 2025
Kalakar Mandhan Yojana 2025: नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कलाकार आहेत. साहित्यिक आणि कलाक्षेत्रात असणाऱ्या कलाकारांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. साहित्य व कलाक्षेत्रात असणाऱ्या कलावंतांसाठी आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारने 7 फेब्रुवारी 2024 रोजी अतीशय महत्वाची अशी योजना सुरू केली, ती म्हणजेच “कलाकार मानधन योजना” होय.
महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या कलाकार मानधन योजनेअंतर्गत वृद्ध कलाकारांना दरमहा 3150 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की कलाकार हा थेट कलाक्षेत्रात आपली कामगिरी बजावत असतो. राज्यातीलच नव्हे तर देशभरातील नागरिकांचे मनोरंजन हे कलाकार करत असतात. परंतु हे कलाकार जेव्हा ज्येष्ठ नागरिक होतात तेव्हा मात्र त्यांना हे अशक्य असते. त्यांना कोणतीही पेन्शन मिळत नाही.
कोणतीही पेन्शन मिळत नसल्यामुळे त्यांना त्यांच्या वृद्ध काळात अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील कलाकारांना त्यांच्या वृद्ध काळात कोणत्याही आर्थिक समस्यांना तोंड देण्याची वेळ येऊ नये यासाठी त्याचबरोबर कलाकारांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी “कलाकार मानधन योजना” सुरू करण्याचा अतीशय महत्वाचा असा निर्णय घेतला आहे.
चला तर मग जाणून घेऊया हि योजना नक्की काय आहे? हि योजना कोणी आणि कधी सुरू केली? या योजनेचे मुख्य उद्देश आणि वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पाहणार आहोत.
योजनेचे नाव | Kalakar Mandhan Yojana (कलाकार मानधन योजना) |
योजनेची सुरुवात कोणी केली | महाराष्ट्र राज्य सरकार |
योजनेची सुरुवात कधी झाली | 7 फेब्रुवारी 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेचे मुख्य उद्देश | वृद्ध कलाकारांना दरमहा आर्थिक सहाय्य करणे |
योजनेचे लाभार्थी | राज्यातील वृद्ध कलाकार |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | दरमहा 3150 रुपये आर्थिक मदत |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन/ ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Kalakar Mandhan Yojana 2025 योजनेचे मुख्य उद्देश
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “कलाकार मानधन योजना 2025” चे मुख्य उद्देश काय आहे?
- महाराष्ट्र राज्यातील वृद्ध कलाकारांना त्यांच्या वृद्धपकाळात कोणत्याही आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी हि योजना सुरू करण्यात आली आहे.
- राज्यातील वृद्ध कलाकारांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी इतर दुसऱ्या व्यक्तींवर अवलंबून राहण्याची गरज भासू नये, यासाठी हि योजना सुरू केली गेली आहे.
- त्याचबरोबर कलाक्षेत्रास प्रोत्साहन देणे आणि वृद्ध कलाकारांचे जीवनमान सुधारणे हे देखील या योजनेचे उद्देश आहे.
Kalakar Mandhan Yojana 2025 योजनेची वैशिष्ट्ये
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “कलाकार मानधन योजना 2025” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?
- राज्यातील कलाकारांच्या उन्नतीसाठी तसेच आर्थिक विकासासाठी सुरू करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
- विधवा तसेच पर्यटक्ता विरुद्ध महिला कलाकारांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाणार आहे.
- सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून मिळणारी लाभाची रक्कम हि लाभार्थी कलाकारांच्या थेट बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा करण्यात येईल.
- तसेच या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व प्रवर्गातील वृद्ध कलाकार लाभ घेऊ शकतात.
Kalakar Mandhan Yojana 2025 योजनेअंतर्गत मिळणारा लाभ
वर्गवारी | दरमहा मानधन | वार्षिक मानधन |
---|---|---|
अ वर्ग | 3,150/- रुपये | 37,800/- रुपये |
ब वर्ग | 2,700/- रुपये | 32,400/- रुपये |
क वर्ग | 2,250/- रुपये | 27,000/- रुपये |
Kalakar Mandhan Yojana 2025 समाविष्ट कलाकार
भजनी | कवी |
किर्तनी | लेखक |
गोंधळी | महिला |
आराधी | विधवा |
तमाशा | दिव्यांग कलाकार |
साहित्यिक | खेळाडू |
गायक | वादक |
Kalakar Mandhan Yojana 2025 योजनेच्या अटी
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “कलाकार मानधन योजना 2025” साठी काय काय अटी आहेत?
- कलाकार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कलाकारांना या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार नाही.
- अर्जदाराने कलाकार म्हणून किमान 15 ते 20 वर्षे काम केलेले असावे.
- अर्जदार कलाकाराचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- अर्जदार कुष्ठरोग, क्षयरोग, कर्करोग, अर्धांगवायू या रोगांनी त्रस्त असलेल्या प्रमाणे 40 टक्के पेक्षा जास्त शारीरिकरित्या व्यंग किंवा अपघातात 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असल्यास त्यांना वयाची अट नाही.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 48 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- त्याचबरोबर अर्जदाराने अर्जामध्ये ज्या ज्या कलेचा उल्लेख केला आहे, त्या कलाक्षेत्राविषयी आवश्यक पुरावे असणे आवश्यक आहे.
- सर्वात महत्वाचं म्हणजे दरवर्षी मानधन मिळण्यापूर्वी संबंधित कलाकार हयात असल्याबाबतचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
- शासनाच्या इतर कोणत्याही योजनेच्या माध्यमातून नियमितपणे दरमहा आर्थिक लाभ घेत असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
Kalakar Mandhan Yojana 2025 आवश्यक कागदपत्रे
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “कलाकार मानधन योजना 2025” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- विहित अर्ज
- अर्जदार कलाकाराचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- वयाचा पुरावा
- अपंग प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- कलाकाराने कलाकार म्हणून किमान 15 ते 20 वर्षे काम केल्याचा पुरावा
- मोबाइल नंबर
- ई-मेल आयडी
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
Kalakar Mandhan Yojana 2025 अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “कलाकार मानधन योजना 2025” चा अर्ज कसा करायचा आहे?
● ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :-
- कलाकार मानधन योजना 2025 च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कलाकारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर होमपेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला नवीन युजर वर क्लिक करावे लागेल.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरून तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा होमपेजवर यावे लागेल.
- होमपेजवर आल्यानंतर सर्च बॉक्समध्ये वृद्ध कलावंत मानधन योजना हे टाइप करून सर्च करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेची संपूर्ण माहिती दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला लागू करा या बटणवर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल.
- त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक आणि अचूकपद्धतीने भरावी लागणार आहे.
- त्यासोबतच आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे देखील जोडावी लागणार आहेत.
- आणि शेवटी संपूर्ण अर्ज पुरेपूर भरल्यानंतर तुम्हाला सबमीट या बटणावर क्लिक करायचे आहे.
अशा प्रकारे तुमची कलाकार मानधन योजना 2025 ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
● ऑफलाइन अर्ज प्रक्रिया :-
कलाकार मानधन योजना 2025 च्या ऑफलाइन अर्ज प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमच्या जवळील गटविकास अधिकारी आणि समाज कल्याण विभाग अधिकारी किंवा अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यालयात जावे लागणार आहे. तेथील कर्मचाऱ्याकडून तुम्हाला सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला अर्ज काळजीपूर्वक भरून त्यासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. त्यानंतर भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावा लागेल.
अशा प्रकारे तुमची कलाकार मानधन योजना 2025 ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “कलाकार मानधन योजना 2025” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Kalakar Mandhan Yojana 2025 FAQ’s
Kalakar Mandhan Yojana 2025 (कलाकार मानधन योजना 2025) ची सुरुवात कोणी केली?
कलाकार मानधन योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकारने केली आहे.
Kalakar Mandhan Yojana 2025 (कलाकार मानधन योजना 2025) ची सुरुवात कधी करण्यात आली आहे?
कलाकार मानधन योजनेची सुरुवात 7 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आली आहे.
Kalakar Mandhan Yojana 2025 (कलाकार मानधन योजना 2025) चे मुख्य उद्देश काय आहे?
वृद्ध कलाकारांना दरमहा आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
Kalakar Mandhan Yojana 2025 (कलाकार मानधन योजना 2025) चे लाभार्थी कोण आहेत?
सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील वृद्ध कलाकार लाभ घेण्यास पात्र आहेत.
Kalakar Mandhan Yojana 2025 (कलाकार मानधन योजना 2025) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?
कलाकार मानधन योजनेच्या माध्यमातून राज्यातील वृद्ध कलाकारांना दरमहा 3150 रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
Kalakar Mandhan Yojana 2025 (कलाकार मानधन योजना 2025) चा अर्ज कसा करायचा आहे?
सदर योजनेचा अर्ज ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.