MahaDBT Farmer Scheme 2024:शेतकऱ्यांना एकाच पोर्टलवर मिळणार सर्व योजनांची माहिती!

Table of Contents

MahaDBT Farmer Scheme In Marathi 2024

MahaDBT Farmer Scheme 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या या लेखात MahaDBT Farmer Scheme 2024 (महाडीबीटी शेतकरी योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आता एकाच पोर्टलवर सर्व शेती विषयक योजनांची माहिती मिळणार आहे. आता शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पोर्टलवर जाण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना सुरू केली आहे.

चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे ही योजना? काय आहेत या योजनेचे मुख्य उद्देश? काय आहेत या योजनेची वैशिष्ट्ये? याय योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना काय काय लाभ मिळणार आहे? आणि महत्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत कोणत्या कोणत्या योजना राबविल्या जातात? या योजनेसाठी काय काय पात्रता आवश्यक आहे? कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत? तसेच या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी अर्ज करताना कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेची नोंदणी कशी करायची आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखाद्वारे पाहणार आहोत.

MahaDBT Farmer Scheme 2024

महाडीबीटी शेतकरी योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावMahaDBT Farmer Scheme 2024
(महाडीबीटी शेतकरी योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागकृषी विभाग, महाराष्ट्र राज्य
योजनेचे मुख्य उद्देश कायराज्यातील शेतकऱ्यांना सर्व योजनांची माहिती एकाच पोर्टलवर उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील अल्पभूधारक शेतकरी
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभशेतकऱ्यांना एकाच पोर्टलवर सर्व योजनांची माहिती मिळणार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

MahaDBT Farmer Scheme 2024 नक्की काय आहे?

शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच आपले महाराष्ट्र राज्य सरकार सातत्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या उद्देशाने नवनवीन योजना राबवत असते. त्यातीलच एक योजना म्हणजे MahaDBT Farmer Scheme 2024 (महाडीबीटी शेतकरी योजना 2024) होय.

मित्रांनो, मागील काही वर्षांपूर्वी शेती विषयक म्हणजेच कृषी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पोर्टलवर जावे लागत होते. त्यानंतर वेगवेगळ्या पोर्टलवरून वेगवेगळ्या योजनांसाठी अर्ज सादर करावा लागत होता. त्या विविध पोर्टलमुळे बहुतांश शेतकऱ्यांना बऱ्याचशा योजनांची माहिती मिळत नव्हती तसेच विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांना शासनामार्फत सुरू असलेल्या योजनांचा लाभ घेता येत नव्हता. विविध पोर्टलमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता, या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाने MahaDBT Farmer Scheme 2024 (महाडीबीटी शेतकरी योजना 2024) म्हणेच महाडीबीटी फार्मर लॉगइन पोर्टल सुरू करण्याचा अतीशय योग्य असा निर्णय घेतला आहे.

MahaDBT Farmer Scheme 2024 (महाडीबीटी शेतकरी योजना 2024) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता वेगवेगळ्या पोर्टलवर जाऊन अर्ज करण्याची गरज भासणार नाही, कारण त्यांना सर्व योजनांची माहिती एकाच पोर्टलवर मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी आता एकाच पोर्टलच्या सहाय्याने सर्व योजनांसाठी अर्ज सादर करू शकणार आहेत. महत्वाचं म्हणजे या सर्व योजनांची अर्ज प्रक्रिया, योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक लाभाचे वितरण या सर्व गोष्टी एकाच पोर्टलवर उपलब्ध करून देणे हा MahaDBT Farmer Scheme 2024 (महाडीबीटी शेतकरी योजना 2024) चा मुख्य उद्देश आहे.

MahaDBT Farmer Scheme 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाडीबीटी शेतकरी योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या सर्व कृषी योजनांची माहिती एकाच पोर्टलवर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • शेतकऱ्यांना सर्व योजनांची माहिती एकाच पोर्टलवर भेटल्याने त्यांना विविध पोर्टलवर जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • राज्यातील शेतकऱ्यांना योजनांच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज भासू नये.

MahaDBT Farmer Scheme 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाडीबीटी शेतकरी योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • राज्यातील शेतकरी बांधवांच्या हितासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आलेली MahaDBT Farmer Scheme 2024 (महाडीबीटी शेतकरी योजना 2024) ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही वेळी कृषी योजनेचा अर्ज करता येणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना एकाच पोर्टलवर सर्व योजनांची माहिती मिळणार आहे, त्यामुळे त्यांना विविध पोर्टलवर भेट देण्याची गरज भासणार नाही.
  • महत्वाचं म्हणजे पारदर्शकतेसाठी जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा, आधार कार्डशी लिंक असलेले बँक खाते पासबुक प्रत त्याचबरोबर खरेदीच्या पवतीची प्रत ई. अपलोड करू शकणार आहेत.
  • तसेच या योजनेच्या माध्यमातून योजनांच्या अर्ज प्रक्रियेच्या विविध स्तरांवर अर्जदारांना एसएमएस आणि ई-मेल ची सुविधा देखील मिळते.
  • MahaDBT Farmer Scheme 2024 (महाडीबीटी शेतकरी योजना 2024) च्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे.
MahaDBT Farmer Scheme 2024

MahaDBT Farmer Scheme 2024:योजनेचे लाभार्थी

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाडीबीटी शेतकरी योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • आपल्या महाराष्ट्र राज्यातील अल्पभूधारक शेतकरी MahaDBT Farmer Scheme 2024 (महाडीबीटी शेतकरी योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

MahaDBT Farmer Scheme 2024:लाभ

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाडीबीटी शेतकरी योजना 2024” च्या माध्यमातून मिळणारा लाभ काय काय आहे?

  • या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकाच पोर्टलवर राज्य शासनाद्वारे सुरू असलेल्या सर्व कृषी योजनांची माहिती मिळते.
  • त्यामुळे शेतकरी एकाच पोर्टलवरून सर्व योजनांसाठी अर्ज करू शकणार आहेत.
  • अर्जदार शेतकरी ऑनलाइन नोंदणीद्वारे नोंदणी करून त्यांचे यूजर नेम आणि पासवर्ड टाकून संबंधित योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ शकतात.
  • त्याचबरोबर राज्यातील शेतकरी आता घरबसल्या आपल्या मोबाईलच्या मदतीने एकाच पोर्टलवर सर्व योजनांची माहिती पाहू शकणार आहेत.
  • त्यामुळे आता शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.

MahaDBT Farmer Scheme 2024:विविध योजना

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाडीबीटी शेतकरी योजना 2024” अंतर्गत कोणत्या कोणत्या योजना राबविल्या जातात?

  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
  • कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
  • राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (अन्नधान्य, तेलबिया, उस, कापूस)
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना
  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
  • कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम
  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना
  • राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
  • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
MahaDBT Farmer Scheme 2024

MahaDBT Farmer Scheme 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाडीबीटी शेतकरी योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहेत? कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत?

  • सदर योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी इच्छुक असणारा अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून कोणताही लाभ दिला जाणार नाही.
  • त्याचबरोबर या योजनेसाठी फक्त शेतकरीच अर्ज करू शकणार आहेत.

MahaDBT Farmer Scheme 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाडीबीटी शेतकरी योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे?

  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • पत्त्याचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • जातीचा दाखला
  • जमिनीचे प्रमाणपत्र
  • जमिनीचा 7/12 उतारा व 8 अ
  • बँक खात्याचा तपशील
  • पिकाची माहिती
  • कौटुंबिक माहिती
  • डोमेसाईल प्रमाणपत्र

MahaDBT Farmer Scheme 2024:नोंदणी प्रक्रिया

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाडीबीटी शेतकरी योजना 2024” ची नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे?

  • MahaDBT Farmer Scheme 2024 (महाडीबीटी शेतकरी योजना 2024) पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अर्जदारस सर्वप्रथम महाडीबीटी फार्मर पोर्टलवर जावे लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला ‘नवीन अर्जदार नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन नोंदणी अर्ज उघडेल.
  • आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरायची आहे, जसे की तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, पासवर्ड ओटीपी ई.
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला ‘नोंदणी करा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पर्याय उघडेल, त्यामध्ये तुमच्याजवळ आधार कार्ड आहे का त्यामध्ये तुम्हाला NO या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन नोंदणी अर्ज ओपन होईल.
  • तो म्हणजेच नॉन आधार चा, त्यामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  • आता तुम्हाला ‘जतन करा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही महाडीबीटी ची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “महाडीबीटी शेतकरी योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
मोफत शौचालय योजना 2024ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024
विहीर अनुदान योजना २०२४ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
शेळी पालन योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024पंचायत समिती योजना 2024
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना 2024
गटई स्टॉल योजना 2024स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024
MahaDBT Farmer Scheme 2024:FAQ’s
MahaDBT Farmer Scheme 2024 (महाडीबीटी शेतकरी योजना 2024) ची सुरुवात कोणी केली आहे?

सदर योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाने केली आहे.

MahaDBT Farmer Scheme 2024 (महाडीबीटी शेतकरी योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

राज्यातील शेतकऱ्यांना सर्व योजनांची माहिती एकाच पोर्टलवर उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

MahaDBT Farmer Scheme 2024 (महाडीबीटी शेतकरी योजना 2024) चे लाभार्थी कोण कोण आहेत?

महाराष्ट्र राज्यातील अल्पभूधारक शेतकरी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

MahaDBT Farmer Scheme 2024 (महाडीबीटी शेतकरी योजना 2024) च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाच पोर्टलवर सर्व योजनांची माहिती मिळणार आहे.

MahaDBT Farmer Scheme 2024 (महाडीबीटी शेतकरी योजना 2024) ची नोंदणी कशी करायची आहे?

MahaDBT Farmer Scheme 2024 (महाडीबीटी शेतकरी योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे.