Thet Karj Yojana Maharashtra In Marathi 2024
Thet Karj Yojana Maharashtra 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Thet Karj Yojana Maharashtra 2024 (थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभगामार्फत राबविण्यात येणारी एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
चला तर मग जाणून घेऊया ही योजना नक्की काय आहे? या योजनेची सुरुवात कोणी आणि कधी केली? काय आहेत या योजनेचे मुख्य उद्देश आणि वैशिष्ट्ये? या योजनेच्या माध्यमातून कोण कोण लाभ मिळवू शकणार आहे? त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे? सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. जेणेकरून आपल्या राज्यातील नागरिकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा, नागरिकांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील असते. मित्रांनो, अशातच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभगाने एक योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच Thet Karj Yojana Maharashtra 2024 (थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024) होय.
राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी तसेच त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्याच्या उद्देशाने त्यांना अतीशय कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
मित्रांनो, तुम्हालाही या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवायचा असेल तर कृपया हा संपूर्ण लेख वाचा. तसेच आपल्या जवळील मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करण्यास विसरू नका. जेणेकरून त्यांनादेखील Thet Karj Yojana Maharashtra 2024 (थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024) च्या माध्यमातून लाभ घेता येईल.
थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Thet Karj Yojana Maharashtra 2024 (थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | महाराष्ट्र राज्य सरकार |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य |
योजनेचे मुख्य उद्देश | आपल्या राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील बेरोजगार तरुण-तरुणींना स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील तरुण-तरुणी |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन अर्ज पद्धत |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Thet Karj Yojana Maharashtra 2024:योजनेचे उद्देश
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?
- महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
- त्याचबरोबेर मागासवर्गीय प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार तरुणांना स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे देखील या योजनेचे उद्देश आहे.
- थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत लाभ देऊन मागासवर्गीयांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे.
- महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील बेरोजगार तरुण-तरुणींना अत्यंत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणे.
- या योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे तसेच बेरोजगारी दर कमी करणे.
- या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य करून मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना विकसित समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
- त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
Thet Karj Yojana Maharashtra 2024:योजनेची वैशिष्ट्ये
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?
- महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणारी Thet Karj Yojana Maharashtra 2024 (थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024) ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील बेरोजगार तरुण-तरुणींना स्वतःच्या व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी अत्यंत कमी व्याज दरात 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी व्यक्तीच्या थेट बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा केली जाते.
- या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील बेरोजगार नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास नक्कीच हातभार लागणार आहे.
- तसेच या योजनेची अर्ज प्रक्रिया अतीशय सोपी असल्यामुळे अर्ज करतेवेळी अर्जदारास कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
Thet Karj Yojana Maharashtra 2024:योजनेचे लाभार्थी
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?
- Thet Karj Yojana Maharashtra 2024 (थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024) च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील तरुण-तरुणी लाभ घेण्यास पात्र आहेत.
Thet Karj Yojana Maharashtra 2024:व्याज रक्कम व कर्ज रक्कम
प्रकल्प | एक लाख रुपयांपर्यंत |
व्याजदर | नियमित कर्जाची परतफेड केल्यास व्याज आकारले जाणार नाही. |
कर्ज परतफेड कालावधी व थकबाकी कर्जदार यांच्याकडून व्याजाचा दंड म्हणून घेण्यात येणारा दर | कर्जाची परतफेड 3 वर्षात समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल 2,085/- रुपये करणे. आणि जर कर्जदाराने नियमितपणे कर्जाची परतफेड केली नाही तर 4 टक्के व्याज दंड म्हणून आकारले जाईल. |
सदर योजनेअंतर्गत महामंडळाचा सहभाग 100 टक्के | एक लाख रुपये |
पहिला हप्ता 75 टक्के रक्कम | 75 हजार रुपये |
दूसरा हप्ता 25 टक्के रक्कम , उद्योग सुरू झाल्याच्या 3 महिन्यानंतर | 25 हजार रुपये |
Thet Karj Yojana Maharashtra 2024:योजनेअंतर्गत सुरू करता येणारे व्यवसाय खालीलप्रमाणे
- मत्स्यव्यवसाय
- बैलगाडी
- संगणक प्रशिक्षण
- झेरॉक्स
- स्टेशनरी
- सलून
- सौंदर्य प्रसाधनगृह
- मसाले उद्योग
- पापड उद्योग
- मसाला मिरची कांडप उद्योग
- वडा पाव विक्री
- भाजीदुकान
- फळ विक्री
- ऑटो रिक्शा
- चहा विक्री केंद्र
- खेळणी विक्री
- डिटीपी कार्य
- स्वीट मार्ट
- ड्राय क्लिनिंग सेंटर
- ऑटो दुरुस्ती कार्यशाळा
- मोबाईल दुरुस्ती
- गॅरेज
- फ्रीज, एसी दुरुस्ती
- चिकन/मटन दुकान
- मासे विकणे
- आठवडी बाजारातील छोटे दुकान
- टेलिफोन बूथ
- अन्य लघु उद्योग
Thet Karj Yojana Maharashtra 2024:पात्रता, अटी व शर्ती
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024” साठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे? कोणत्या कोणत्या अटी व शर्ती आहेत?
- Thet Karj Yojana Maharashtra 2024 (थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार नाही.
- अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदारांचा CIBIL स्कोर 500 किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- त्याचबरोबर अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत नसावा.
- आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या अनुभवी व प्रशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना प्राधान्य दिले जाईल.
- अर्जदाराचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक असावे.
- लाभार्थ्याने सुरू कलेल्या व्यवसायाचा विमा स्वतः काढावा लागेल, त्याचबरोबर दरवर्षी विम्याचे नूतनीकरण स्वतःच करावे लागेल.
Thet Karj Yojana Maharashtra 2024:आवश्यक कागदपत्रे
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत?
- संगणक प्राणलीवर अर्जदार नावनोंदणी
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- व्यवसायाच्या ठिकाणाची भाडे पावती
- व्यवसाय करार
- जमिनीचा 7/12 उतारा
- जन्मदाखला
- संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची व्यवसायासाठी NOC
- प्रतिज्ञापत्र
- तांत्रिक व्यवसाय असल्यास आवश्यक परवाने
- प्रकल्प अहवाल
- कच्चा माल व यंत्रसामग्रीचे बिल
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
Thet Karj Yojana Maharashtra 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
● ऑफलाइन अर्ज पद्धत :-
- Thet Karj Yojana Maharashtra 2024 (थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारास ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
- त्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम संबंधित जिल्हा कार्यालय मधील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला भेट द्यावी लागणार आहे.
- त्यानंतर अर्जदारास संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून ‘थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024’ चा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्ज घेतल्यानंतर अर्जदारास संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक वाचून घ्यावा.
- त्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक व अचूकपद्धतीने भरावी लागेल.
- तसेच संपूर्ण माहिती भरल्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहेत.
- आणि नंतर संपूर्ण भरलेला अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावा लागणार आहे.
- अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुमची Thet Karj Yojana Maharashtra 2024 (थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024) ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, कर्ज मिळवण्यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Thet Karj Yojana Maharashtra 2024:FAQ’s
Thet Karj Yojana Maharashtra 2024 (थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024) ची सुरुवात कोणी केली?
महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभगामार्फत थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 ची सुरुवात करण्यात आली आहे.
Thet Karj Yojana Maharashtra 2024 (थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?
आपल्या राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील बेरोजगार तरुण-तरुणींना स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
Thet Karj Yojana Maharashtra 2024 (थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024) चे लाभार्थी कोण आहेत?
महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील तरुण-तरुणी या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी पात्र आहेत.
Thet Karj Yojana Maharashtra 2024 (थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?
सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील तरुणांना स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
Thet Karj Yojana Maharashtra 2024 (थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?
थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 चा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.