Vihir Anudan Yojana 2024 In Marathi
Vihir Anudan Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात “विहीर अनुदान योजना २०२४” बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जसे की, काय आहे ही योजना? कोण कोण या योजनेसाठी पात्र आहे? कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे? अर्ज करताना कोणत्या अटी व शर्ती तसेच कोणते नियम आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कशा प्रकारे घेऊ शकतो? ई सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. तुम्ही सदर योजनेची सर्व माहिती काळजीपूर्वक वाचाल अशी आम्ही आशा करतो. चला तर मग मंडळी “विहीर अनुदान योजना २०२४” ची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मित्रांनो, केंद्र आणि राज्यसरकार आपल्या राज्यातील तसेच देशातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांचे भविष्य उज्वल बनविण्यासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. यासाठी महाराष्ट्र सरकार कायम प्रयत्नशील असते.जसे की आपल्या राज्यातील तरुणांसाठी विविध प्रकारच्या कर्ज योजना असतील, जेणे करून आपल्या राज्यातील तरुणांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, विविध प्रकारच्या विमा योजना, आरोग्य सुविधा, आपल्या देशातील आणि राज्यातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना व अर्थसहाय्य योजना आणि महत्वाचं म्हणजेच राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी निवृत्ती वेतन योजना, अपंग आणि विधवा महिलांसाठी पेन्शन योजना त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना अशा विविध प्रकारच्या योजना सरकार राबवत असते, त्यातीलच एक म्हणजे “विहीर अनुदान योजना २०२४” होय.
विहीर अनुदान योजना २०२४ ची थोडक्यात माहिती
मित्रांनो, आज देखील महाराष्ट्र राज्यातील अनेक तालुके ही दुष्काळग्रस्त आहेत, त्यामुळे शेतकरी फार मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अनियमित पाऊस पडतो आणि काही ठिकाणी तर अदृश्य पाऊस पडतो. त्यामुळे शेतकऱ्याला शेती करण्यासाठी पुरेसे पानी मिळत नाही. पुरेसे पानी न मिळाल्याने शेतकऱ्याने पेरलेले पीक उगवत नाही, त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान होते. आर्थिक अडचणीमुळे महाराष्ट्राचे शेतकरी हा स्वतः आपल्या शेतात विहीर खोदू शकत नाही. मित्रांनो, याच मुख्य कारणाने आज शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाकडून पाठ फिरवलेली आहे. मित्रांनो, जर शेतकऱ्यांनी शेती करणे बंद केले तर त्याचे परिणाम खूपच वाईट होऊ शकतात. असे विपरीत घडू नये म्हणूनच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विहीर अनुदान योजना २०२४ ही अत्यंत महत्वाची योजना ठरणार आहे.
मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने विवध प्रकारच्या कृषि योजना तसेच सरकारी योजना राबविल्या आहेत, त्या सर्वांमध्ये “विहीर अनुदान योजना २०२४” ही एक अतीशय महत्वाची योजना आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील तसेच अतीदुर्गम भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा नक्कीच मोठ्याप्रमाणात फायदा झालेला आहे. मागील काही काळामध्ये मनरेगाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सरकार कार्यरत आहे.
भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे महाराष्ट्र राज्यात ०३,८७,५०० विहिरी खोदणे शक्य आहे. त्यामुळे मागेल त्याला विहीर ही योजना सरकारने अमलात आणलेली आहे.
अनियमित आणि अपुऱ्या पावसामुळे गेल्या काही वर्षात राज्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. दुष्काळी स्थितीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत व पुनर्वसन विभागाकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
विहीर अनुदान योजना २०२४ GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Vihir Anudan Yojana 2024:योजनेचा थोडक्यात आढावा
योजनेचे नाव | विहीर योजना २०२४ |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
विभाग | कृषि विभाग |
लाभ | ४ लाख रुपये |
योजनेचे उद्देश | शेतात विहीर खोदण्यासाठी आर्थिक सहाय्य (अनुदान) |
लाभार्थी | महराष्ट्र राज्यातील शेतकरी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन /ऑफलाइन |
Vihir Anudan Yojana 2024: योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया विहीर अनुदान योजना २०२४ ची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत?
- महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून कृषि विभागाद्वारे सुरू केलेली एक महत्वाची योजना म्हणजेच विहीर अनुदान योजना २०२४ होय.
- विहीर अनुदान योजना २०२४ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आकर्षित करण्यासाठी ही एक अतीशय महत्वाची योजना मानली जाते.
- मित्रांनो, विहीर अनुदान योजना २०२४ ला “मागेल त्याला विहीर अनुदान योजना” या नावाने देखील ओळखले जाते.
- आपण पाहतच आहोत की, आपल्या महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणचे शेतकरी मोठ्याप्रमाणात आत्महत्या करत आहेत. त्यांच्या या आत्महत्या रोखण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने ही एक अत्यंत महत्वाची योजना मानली जाते.
- विहीर अनुदान योजना २०२४ अंतर्गत मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा घोटाळा किंवा भ्रष्टाचार होणार नाही.
- महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मांच्या शेतकऱ्यांना विहीर अनुदान योजना २०२४ चा लाभ घेता येणार आहे.
- मित्रांनो, विहीर अनुदान योजना २०२४ साठी अर्ज प्रकिया अतीशय सोपी ठेवण्यात आली आहे.
- शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी तुम्ही आता तुमच्या मोबईलवर घरबसल्या अर्ज करू शकताय. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.
Vihir Anudan Yojana 2024: योजनेचे मुख्य उद्देश
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया विहीर अनुदान योजना २०२४ ची मुख्य उद्देश काय आहेत?
- आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील तसेच अतीदुर्गम भागातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेतासाठी तसेच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी “विहीर अनुदान योजना २०२४ ” या योजनेची स्थापना करण्यात आली आहे.
- विहीर अनुदान योजना २०२४ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायाकडे आकर्षित करणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाचा स्रोत उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर त्यांचे भविष्य उज्वल करणे.
- आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे दारिद्र्य संपवून शेतकऱ्यांना प्रगल्भ करणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील तसेच अतीदुर्गम भागातील सर्व शेतकऱ्यांचा आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक विकास करणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी इतरांवर ते अवलंबून राहू नये किंवा त्यासाठी दसऱ्यांकडून कर्ज काढू नये हा देखील “विहीर अनुदान योजना २०२४” चा मुख्य उद्देश आहे.
Vihir Anudan Yojana 2024: साठी लाभार्थी निवड
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया विहीर अनुदान योजना २०२४ साठी लाभार्थी निवड कशी होणार आहे? कोण कोण या योजनेचा लाभ घेणार आहे?
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- स्री करता असणारे कुटुंब
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे
- शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती
- इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
- अल्पभूधारक (५ एकर पर्यंत)
- जॉब कार्डधारक व्यक्ती
- जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी
Vihir Anudan Yojana 2024: आवश्यक कागदपत्रे
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया विहीर अनुदान योजना २०२४ साठी अर्ज करताना कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक पहावी.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- उत्पन्नाचा दाखला
- रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड
- बँक खात्याचा तपशील (पासबुक)
- जमिनीचे कागदपत्रे
- ७/१२ व ८ अ उतारा
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर पेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा, सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत पत्रांचे करार पत्र.
Vihir Anudan Yojana 2024: योजनेसाठी अर्ज कसा करावा
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया विहीर अनुदान योजना २०२४ साठी अर्ज कसा करायचा?
● ऑनलाइन अर्ज पद्धत :-
- विहीर अनुदान योजना २०२४ साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम “Official Website” वर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर होम पेज ओपन होईल.
- आता होम पेजवर “मागेल त्याला विहीर” या वर क्लिक करावे लागेल.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर “विहीर अनुदान योजना २०२४” अर्ज उघडेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरायची आहे.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
- त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून तुमची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
- अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही सदर योजनेची ऑनलाइन प्रकिया पूर्ण होईल.
● ऑफलाइन अर्ज पद्धत :-
- विहीर अनुदान योजना २०२४ साठी अर्ज करण्यासाठी इच्छूक असणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल.
- ग्रामपंचायत कार्यालयात गेल्यानंतर ग्रामसेवक यांच्याकडून “विहीर अनुदान योजना २०२४” चा अर्ज घ्यायचा आहे.
- अर्जात संपूर्ण माहिती पूर्णपणे आणि काळजीपूर्वक भरायची आहे.
- माहिती पूर्णपणे भरून झाल्यानंतर त्यासोबत दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज जमा करताना त्यासोबत संमतीपत्र जोडून द्यायचे आहे.
- अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही “विहीर अनुदान योजना २०२४” ऑफलाइन अर्ज प्रकिया पूर्ण होईल.
Vihir Anudan Yojana 2024:महत्वाच्या लिंक्स
विहीर अनुदान योजना २०२४ चा अर्ज | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
विहीर अनुदान योजना २०२४ GR पाहण्यासाठी | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “विहीर अनुदान योजना २०२४” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
कृपया ही सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी योजनांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.
Vihir Anudan Yojana 2024:FAQ’s
विहीर अनुदान योजना २०२४ चा लाभ कोण घेऊ शकतो?
महराष्ट्र राज्यातील शेतकरी
या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे?
विहीर अनुदान योजना २०२४ साठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
विहीर अनुदान योजना २०२४ मध्ये शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे?
एकूण ४ लाख रुपये अनुदान मिळणार आहे.