Yuva Prashikshan Yojana In Marathi 2024
Yuva Prashikshan Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Yuva Prashikshan Yojana 2024 (युवा प्रशिक्षण योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील तरुण तरुणींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य प्रशिक्षण अगदी मोफत दिले जाणार आहे. जेणेकरून राज्यातील तरुण तरुणींना आपला स्वतःचा एखादा उद्योग व्यवसाय सुरू करता यावा.
आपल्याला माहितीच आहे की, आजच्या घडीला राज्यातील तरुणांना त्यांच्या शिक्षणानुसार तसेच त्यांच्या आवडीनुसार रोजगार मिळत नसल्यामुळे बहुतांश तरुण स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असतात. मात्र एखादा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या क्षेत्राशी संबंधित कौशल्य असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर एखादा व्यवसाय उभा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची देखील आवश्यकता असते.
मित्रांनो, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे बहुतांश तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एखाद्या व्यवसायाच्या निगडीत कौशल्य प्रशिक्षण नसल्यामुळे तसेच उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसल्यामुळे तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देखील मिळत नाही. त्यामुळे इच्छा असून देखील बहुतांश तरुण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अपयशी ठरतात.
आता मात्र तरुणांच्या या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील अनुसूचित जातीतील त्याचबरोबर मागास वर्गातील तरुणांना स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याचबरोबर त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने Yuva Prashikshan Yojana 2024 (युवा प्रशिक्षण योजना 2024) सुरू करण्याचा अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतला आहे.
युवा प्रशिक्षण योजना 2024 थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Yuva Prashikshan Yojana 2024 (युवा प्रशिक्षण योजना 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
योजनेचे मुख्य उद्देश | राज्यातील तरुण तरुणींना स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी अगदी मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण मिळणार आहे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Yuva Prashikshan Yojana 2024 नक्की काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य प्रशिक्षण अगदी मोफत प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली Yuva Prashikshan Yojana 2024 (युवा प्रशिक्षण योजना 2024) ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
आपल्या महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या सुशिक्षित तरुणांना स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जेणेकरून राज्यातील तरुण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील. त्याचबरोबर राज्यातील तरुण तरुणी स्वावलंबी व आत्मनिर्भर बनतील. महत्वाचं म्हणजे Yuva Prashikshan Yojana 2024 (युवा प्रशिक्षण योजना 2024) च्या माध्यमातून राज्यातील तरूणांचा आर्थिक आणि समाजिक विकास देखील होईल.
Yuva Prashikshan Yojana 2024:योजनेचे उद्देश
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “युवा प्रशिक्षण योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?
- आपल्या महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब व सुशिक्षित तरुण-तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, ते ही अगदी मोफत हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करणे.
- त्याचबरोबर राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे, हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
- तसेच राज्यातील तरुणांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
- राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनविणे.
Yuva Prashikshan Yojana 2024:योजनेचे लाभार्थी
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “युवा प्रशिक्षण योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?
- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील तसेच चर्मकार समाजातील, मागास वर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी Yuva Prashikshan Yojana 2024 (युवा प्रशिक्षण योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.
Yuva Prashikshan Yojana 2024:लाभ
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “युवा प्रशिक्षण योजना 2024” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?
- Yuva Prashikshan Yojana 2024 (युवा प्रशिक्षण योजना 2024) अंतर्गत राज्यातील चर्मकार, मागासवर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्योग क्षेत्राशी निगडीत कौशल्य प्रशिक्षिण उपलब्ध करून दिले जाते.
- महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे कौशल्य प्रशिक्षण हे अगदी मोफत दिले जाणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण विनामूल्य कौशल्य प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील.
- त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.
- तसेच राज्यातील तरुणांचे जीवनमान देखील सुधारेल.
- या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील बेरोजगार तरुण तरुणी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
Yuva Prashikshan Yojana 2024:लाभाचे स्वरूप
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “युवा प्रशिक्षण योजना 2024” च्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप कसे असणार आहे?
- Yuva Prashikshan Yojana 2024 (युवा प्रशिक्षण योजना 2024) अंतर्गत प्रशिक्षण कालावधी दरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा 1,000/- रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.
Yuva Prashikshan Yojana 2024:कालावधी
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “युवा प्रशिक्षण योजना 2024” अंतर्गत मिळणारे प्रशिक्षण किती कालावधीसाठी असणार आहे?
- सदर योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे प्रशिक्षण हे दोन ते चार महीने पर्यंत असणार आहे.
Yuva Prashikshan Yojana 2024: दिले जाणारे प्रशिक्षण
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “युवा प्रशिक्षण योजना 2024” अंतर्गत काय काय प्रशिक्षण दिले जाणार आहे?
- शिवणकला
- सौंदर्यशास्त्र
- संगणक प्रशिक्षण
- सर्वोद्योग प्रशिक्षण
- वाहन चालक
- टीव्ही दुरुस्ती
- रेडिओ दुरुस्ती
- टेलरिंग
- वेल्डिंग
- फिटर
- विविध व्यवसाय अनुरूप प्रशिक्षण
Yuva Prashikshan Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “युवा प्रशिक्षण योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहेत? कोणत्या कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत?
- Yuva Prashikshan Yojana 2024 (युवा प्रशिक्षण योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- सदर योजनेच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकच लाभ मिळवू शकणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार नाही.
- तसेच अर्जदार तरुण तरुणी हे अनुसूचित जातीतील किंवा मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
- अर्जदारास प्रशिक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या बाहेर व्यवसाय सुरू करता येणार नाही.
- महत्वाचं म्हणजे अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 50 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्ती हा कमीत कमी 7 वी पास असणे आवश्यक आहे.
- ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 90 हजार तसेच शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार रुपये असणे आवश्यक आहे.
- राज्यसरकार पुरस्कृत योजनांसाठी ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये असणे आवश्यक आहे.
- तसेच या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे जातीचा दाखला त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्ती हा सरकारी कर्मचारी नसावा.
- या पूर्वीच्या काळात जर अर्जदाराने केंद्र व राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू केला असेल तर, त्यांना या योजनेच्या माध्यमातून कोणताही लाभ मिळणार नाही.
Yuva Prashikshan Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “युवा प्रशिक्षण योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे?
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- डोमेसाईल प्रमाणपत्र
- शपथ पत्र
- बँक खात्याचा तपशील
Yuva Prashikshan Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “युवा प्रशिक्षण योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
● ऑफलाइन अर्ज पद्धत :-
- Yuva Prashikshan Yojana 2024 (युवा प्रशिक्षण योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी अर्जदारास ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- त्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम आपल्या जवळील जिल्हा कार्यालयात जावे लागणार आहे.
- त्यानंतर जिल्हा कार्यालयातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागणार आहे.
- आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक व अचूकपद्धतीने भरायची आहे.
- त्याबरोबरच तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आपल्या अर्जासोबत जोडावी लागतील.
- आता तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही भरलेला अर्ज व्यवस्थित तपासून घ्यायचा आहे. अर्जात भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
- संपूर्ण माहिती अचूक असल्यास तुम्ही तुमचा अर्ज संबंधित कार्यालयात जमा करू शकताय.
- अशाप्रकारे मित्रांनो, तुमची Yuva Prashikshan Yojana 2024 (युवा प्रशिक्षण योजना 2024) ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “युवा प्रशिक्षण योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Yuva Prashikshan Yojana 2024:FAQ’s
Yuva Prashikshan Yojana 2024 (युवा प्रशिक्षण योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?
युवा प्रशिक्षण योजना 2024 ची सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकारने केली आहे.
Yuva Prashikshan Yojana 2024 (युवा प्रशिक्षण योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?
राज्यातील तरुण तरुणींना स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी अगदी मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
Yuva Prashikshan Yojana 2024 (युवा प्रशिक्षण योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?
महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.
Yuva Prashikshan Yojana 2024 (युवा प्रशिक्षण योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?
युवा प्रशिक्षण योजना 2024 च्या माध्यमातून राज्यातील तरुण तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण मिळणार आहे
Yuva Prashikshan Yojana 2024 (युवा प्रशिक्षण योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?
युवा प्रशिक्षण योजना 2024 चा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.