PM Matru Vandana Yojana 2025 प्रधानमंत्री मातृ वंदना योजना| गरोदर महिलांना ₹5000 चा लाभ कसा मिळेल? पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया|

Table of Contents

PM Matru Vandana Yojana In Marathi 2025

PM Matru Vandana Yojana 2025 प्रधानमंत्री मातृ वंदना योजना: नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या घरात कोणी महिला गरोदर असेल किंवा नुकतेच बाळ झाले असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ ही केंद्र सरकारची एक खास योजना आहे, जी फक्त गरोदर आणि नवीन मातांसाठी सुरू करण्यात आली आहे.

मित्रांनो, जेव्हा एखादी महिला गरोदर असते, तेव्हा तिला कामातून सुट्टी घ्यावी लागते. त्यामुळे तिचे पैसे मिळणे थांबते. या काळात तिला चांगला आहार मिळावा आणि तिने आपल्या बाळाची काळजी घ्यावी, यासाठी शासनाकडून ₹5000/- ची आर्थिक मदत दिली जाते. शासनामार्फत दिली जाणारी ही आर्थिक मदत तीन टप्प्यात थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होते.

PM Matru Vandana Yojana 2025 प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही गरोदर आणि स्तनदा मातांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आर्थिक सहाय्य योजना आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे माता आणि बालकांचे आरोग्य सुधारणे आणि त्यांना आर्थिक आधार देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया PM Matru Vandana Yojana 2025 प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नेमकी काय आहे? या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत आणि या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पाहणार आहोत. कृपया संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

PM Matru Vandana Yojana 2025

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025 संक्षिप्त माहिती

योजनेचे नावPM Matru Vandana Yojana
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025
योजनेची सुरुवातकेंद्र सरकार (जानेवारी 2017)
राज्यमहाराष्ट्र
विभागमहिला आणि बालविकास मंत्रालय
उद्देशगरोदर महिला आणि स्तनदा मातांना सकस आहार आणि आर्थिक सहाय्य देणे, जेणेकरून माता व बालकांचे आरोग्य सुधारेल.
लाभपहिल्या जिवंत बाळासाठी ₹5000/- ची थेट डीबीटीद्वारे आर्थिक मदत केली जाते.
लाभार्थीगरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन/ ऑफलाइन (अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य उपकेंद्रामार्फत
अधिकृत वेबसाइट➡️https://pmmvy.wcd.gov.in/⬅️

➡️प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025⬅️

PM Matru Vandana Yojana 2025: योजनेचे लाभ आणि टप्पे

● PM Matru Vandana Yojana प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025 च्या माध्यमातून पात्र महिलेला एकूण ₹5000/- तीन टप्प्यात थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केले जातात.

टप्पालाभाची रक्कमअट
पहिला हप्ता₹1,000/-गरोदरपणाची नोंदणी झाल्यानंतर
दूसरा टप्पा₹2,000/-किमान एकदा प्रसूतिपूर्व तपासणी झाल्यावर , गरोदरपणाला सहा महीने पूर्ण झाल्यानंतर
तिसरा टप्पा₹2,000/-बाळाचा जन्म झाल्यावर आणि त्याची नोंदणी झाल्यावर, बालकाला पहिल्या लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाल्यावर

PM Matru Vandana Yojana 2025: पात्रता

● चला तर मग जाणून घेऊया PM Matru Vandana Yojana प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025 च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता आवश्यक आहे?

  1. अर्जदाराचे वय कमीत कमी 19 वर्षे आणि ती गर्भवती महिला असावी.
  2. अर्जदार नोकरी करत असावा आणि गर्भधारणेमुळे त्याला वेतनात घट झाली असावी.
  3. ही योजना फक्त पहिल्या जिवंत जन्मासाठी लागू आहे.
  4. पात्र लाभार्थी बाळाच्या जन्मापासून 270 दिवसांच्या आत PMMVY योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज करू शकतात.
  5. जर एखाद्या लाभार्थीने तिच्या दुसऱ्या गरोदरपणात जुळे/तिहेरी/चौघेरी मुले जन्माला घातली, ज्यामध्ये एक किंवा अधिक मुले मुलगी असतील, तर तिला PMMVY 2.0 नियमांनुसार दुसऱ्या मुलीसाठी प्रोत्साहन मिळेल.

PM Matru Vandana Yojana प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025 समाजातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटक निश्चित करण्यासाठी निकष खालीलप्रमाणे

  • अनुसूचित जाती आणि जमातीतील महिला
  • ज्या महिला अंशतः 40% किंवा पूर्णपणे अपंग आहेत
  • बीपीएल रेशन कार्डधारक महिला
  • आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी.
  • ई-श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला
  • किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी असलेल्या महिला शेतकरी
  • मनरेगा जॉब कार्ड हातात घेतलेल्या महिला
  • ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे
  • गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या अंगणवाडी महिला/अंगणवाडी महिला/ आशा महिला
  • NFSA (एनएफएसए) कायदा 2013 अंतर्गत रेशन कार्ड धारक महिला
  • केंद्र सरकारने विहित केलेली इतर कोणतेही श्रेणी

PM Matru Vandana Yojana 2025: आवश्यक कागदपत्रे

● चला तर मग जाणून घेऊया PM Matru Vandana Yojana प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025 चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • आधार लिंक केलेले बँक/पोस्ट ऑफिस
  • बँक खात्याची माहिती
  • पात्रता पुरावा
  • MCP कार्ड (मातृत्व आणि शिशु संरक्षण कार्ड):
    • यामध्ये LMP (शेवटच्या मासिक पाळीची तारीख)
    • ANC (प्रसूतिपूर्व तपासणीची माहिती असते)
  • जन्म नोंदणी
  • बाळाच्या जन्माचा दाखला
  • अंगणवाडी नोंदणी
  • बालकाच्या लसीकरणाची माहिती

PM Matru Vandana Yojana 2025: अर्ज कसा करायचा?

● चला तर मग जाणून घेऊया PM Matru Vandana Yojana प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025 चा अर्ज कसा करायचा आहे?

  • नोंदणी केंद्र:
    • अर्जदार महिलेने आपल्या परिसरातील अंगणवाडी केंद्र किंवा मान्यताप्राप्त आरोग्य उपकेंद्र येथे संपर्क साधावा.
  • पहिला अर्ज (फॉर्म 1-ए):
    • गर्भधारणा नोंदणीसाठी मकप कार्डासह पहिला अर्ज फॉर्म 1-ए भरावा लागतो. ही नोंदणी शासकीय आरोग्य संस्था किंवा अंगणवाडीत करावी लागते.
  • पडताळणी:
    • अर्जदाराने सादर केलेले कागदपत्रे आणि बँक तपशील अंगणवाडी सेविका किंवा आशा कार्यकर्ती यांच्या मदतीने ICDS अधिकाऱ्यांकडून पडताळून पहिले जातात.
  • हप्ता जमा:
    • पडताळणी पूर्ण झाल्यावर, प्रत्येक टप्प्याची अट पूर्ण होताच रक्कम DBT द्वारे थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाते.

सारांश

शेतकरी मित्रांनो, आम्ही तुम्हाला “PM Matru Vandana Yojana प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
मोफत शौचालय योजना 2024ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024
विहीर अनुदान योजना २०२४ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
शेळी पालन योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
अपंग पेन्शन योजना 2024कन्या वन समृद्धी योजना 2024
अटल बांबू समृद्धी योजना 2024प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024
मृदा आरोग्य कार्ड योजना 2024डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024

कृपया ही सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी योजनांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

PM Matru Vandana Yojana 2025:FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कोण आणि कधी सुरू केली?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र सरकारने जानेवारी 2017 मध्ये सुरू केली आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना च्या माध्यमातून किती आर्थिक मदत मिळते?

या योजनेच्या माध्यमातून एकूण 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते.

या योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी आर्थिक मदत किती टप्प्यात दिली जाते?

सदर योजनेच्या माध्यमातून लाभाची रक्कम ही एकूण तीन टप्प्यात दिली जाते.

या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे?

गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन/ ऑफलाइन (अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य उपकेंद्रामार्फत.