महाराष्ट्र राज्यातील मुलींना मिळणार जून २०२४ पासून मोफत उच्चशिक्षण!!Maharashtra Free Education Scheme 2024|

Free Education Scheme June 2024

Maharashtra Free Education Scheme 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व मुलींसाठी आनंदाची बातमी! ज्या मुली महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहेत, त्याचबरोबर ज्या मुली सध्या उच्चशिक्षण घेत आहेत किंवा भविष्यात उच्चशिक्षण घेणार आहेत, अशा मुलींसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन योजना घोषित केली आहे. मित्रांनो, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये ८ लाखापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील मुलींना येत्या जून महिन्यापासून (Free Education Scheme June 2024) म्हणजेच मोफत उच्चशिक्षण देण्यात येणार आहे.

मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार आपल्या देशातील त्याचप्रमाणे राज्यातील नागरिकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास व्हावा म्हणून सतत नवनवीन योजना राबवत असते. जसे की, विविध प्रकारच्या कर्ज योजना असतील, जेणे करून राज्यातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, सुरू केलेल्या व्यवसायातून इतर तरुणांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, विविध प्रकारच्या कृषि योजना असतील, राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, आरोग्य सुविधा, आणि महत्वाचं म्हणजेच राज्यातील वृद्ध तसेच विधवा महिलांसाठी पेन्शन योजना, अशा विविध प्रकारच्या योजना शासनाद्वारे राबविल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे “मोफत उच्चशिक्षण योजना” होय.

मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजनेची घोषणा आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्चशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या योजनेमध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग तसेच अजून ८०० नवीन अभ्यासक्रमांचा समावेश आहे. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील नवीन इमारतींच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात उच्चशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांनी या योजनेची घोषणा केली आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील नवीन इमारतींच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांची भेट घेतली. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते . या कार्यक्रमापूर्वी मंत्री पाटील यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रश्न विचारण्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये जामनेर तालुक्याच्या विद्यार्थ्याला कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वस्त वसतिगृहे, जेवण आणि कमी शुल्क या सारख्या सवलती हव्या होत्या. या घोषणेमुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांना उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले जाईल, म्हणूनच या घोषणेमुळे नक्कीच शैक्षणिक समानतेस हातभार लागेल. मित्रांनो, आता महाराष्ट्रातील कोणत्याही महिलेला वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा इतर ८०० अभ्यासक्रमांसाठी एक टक्का देखील द्यावा लागणार नाही!!

चला तर मग मित्रांनो, आपण या लेखात जाणून घेऊया की कशी आहे ही योजना? या योजनेसाठी अर्ज प्रकिया कशाप्रकारे आहे? आणि महत्वाच म्हणजेच कोण कोण या योजनेसाठी पात्र आहे? कोण कोण या योजेनचा लाभ घेऊ शकतो? या योजनेच्या माध्यमातून काय काय फायदा होणार आहे? ई सर्व माहिती खाली दिलेली आहे. कृपया संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

maharashtra free educational scheme

Maharashtra Free Education Scheme 2024:सविस्तर माहिती

● चला तर मित्रांनो, मोफत उच्चशिक्षण योजना नक्की काय आहे? जाणून घेऊया

महाराष्ट्र राज्याचे उच्चशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांनी राज्यातल्या आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या मुलींसाठी मोफत शिक्षणाची घोषणा केली आहे. मोफत उच्चशिक्षण योजनेची घोषणा करत असताना ते म्हणाले की महाराष्ट्र राज्यात SC आणि ST प्रवर्गातील विद्यार्थिनींना उच्चशिक्षणासाठी पूर्ण फी माफ केली जाते. उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना केंद्र सरकारकडून ६० % आणि राज्य सरकारकडून ४० % शैक्षणिक फी मध्ये सवलत दिली जाते.

त्याचप्रमाणे OBC आणि रुपये ८ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या अतिमागासवर्गीय मुलींसाठी ६४२ अभ्यासक्रमासाठी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना फी निम्मी निम्मी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी शैक्षणिक फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे परभणी जिल्ह्यातील एका मुलीने तीच आयुष्य संपवलं होत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुपये ८ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मुलींची १००% फी माफ करण्याची घोषणा केली आहे.

या आधी फक्त SC आणि ST प्रवर्गातील विद्यार्थिनींना १००% फी माफ होती. त्याचबरोबर OBC, EBS तसेच EWS या वर्गातील विद्यार्थिनींना ५०% फी माफ होती. परंतु आता महाराष्ट्र राज्याचे उच्चशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयातून सर्वच प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या मुलींना मोफत उच्चशिक्षण दिले जाणार आहे.

Maharashtra Free Education Scheme 2024:योजनेचे फायदे

● मोफत उच्चशिक्षण योजनेचे फायदे

  • महाराष्ट्र राज्याचे उच्चशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना याचा फायदा होणार आहे.
  • त्याचबरोबर या योजनेमुळे उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुणींची संख्या वाढणार आहे.
  • २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात २० लाखाहून जास्त मुलींनी पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता, मात्र त्यानंतर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात ही संख्या १९ हजारांनी कमी झालेली दिसून आली.
  • मोफत उच्चशिक्षण योजनेमुळे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात हे प्रवेश वाढताना दिसून येईल.
  • आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे त्याचबरोबर मुलींनी उच्चशिक्षित व्हावे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्चशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे.
  • मित्रांनो, मंत्रिमंडळात निर्णय झाल्यानंतर ही योजना राज्यात लागू करण्यात येईल.
Maharashtra Free Education Scheme 2024

Maharashtra Free Education Scheme 2024:अभ्यासक्रम

● मोफत उच्चशिक्षण योजनेत कोणत्या कोणत्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे?

  • मोफत उच्चशिक्षण योजनेत प्रामुख्याने ८०० अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे.
  • महाराष्ट्र राज्याचे उच्चशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयात सर्व प्रकारचे डिप्लोमा, पदवी शिक्षण, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे.
  • या निर्णयामध्ये पदवीच्या बीए, बीएससी त्याचबरोबर बीकॉम या कोर्सेसचा देखील समावेश आहे.
  • त्याचप्रमाणे या निर्णयात एमबीबीएस, इंजिनिअरिंग, लॉ, बी एड, फार्मसी, अग्रिकल्चर, व्यवस्थापकीय कोर्स आणि इतर प्रायव्हेट प्रोफेशनल कोर्स यांचा समावेश आहे.
  • यामुळे राज्यात चालू असलेल्या ६४२ आणि नवीन चालू होणाऱ्या २०० अभ्यासक्रमांचा या मोफत उच्चशिक्षण योजनेत समावेश असणार आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील ५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थिनींना मोफत उच्चशिक्षण या योजनेमुळे घेता येणार आहे.

Maharashtra Free Education Scheme 2024:Important Documents

● मोफत उच्चशिक्षण योजना २०२४ साठी कोणती कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. जाणून घेऊया

  • आधार कार्ड
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न रुपये ८ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
  • रहिवासी दाखला
  • मागील शैक्षणिक वर्षाचे गुणपत्रक
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

Maharashtra Free Education Scheme 2024:Process

● मोफत उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रक्रिया खालीलप्रमाणे

  1. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच येणाऱ्या जून २०२४ पासून सरकारकडून मोफत उच्चशिक्षण योजना २०२४ लागू केली जाणार आहे.
  2. त्यामुळे जून २०२४ पासून महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया चालू झाल्यानंतर मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  3. मित्रांनो, ज्या विद्यार्थिनींच वार्षिक उत्पन्न रुपये ८ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनाच मोफत उच्चशिक्षण योजना २०२४ चा लाभ दिला जाणार आहे.
  4. शासन निर्णय जारी झाल्यानंतर ही फी माफ केली जाईल. त्याचप्रमाणे लवकरच मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाईल.

मोफत उच्चशिक्षण योजना २०२४

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला मोफत उच्चशिक्षण योजना २०२४ ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 मोफत शौचालय योजना 2024
मोदी आवास घरकुल योजना 2024मोफत शिलाई मशीन योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४लेक लाडकी योजना 2024
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
जिव्हाळा कर्ज योजना 2024रमाई आवास योजना २०२४
बीज भांडवल योजना 2024राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
आम आदमी विमा योजना 2024स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024
देवदासी कल्याण योजना 2024निपुण भारत योजना 2024
राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024
पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024महाडीबीटी शेतकरी योजना 2024
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना 2024प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024
अटल भूजल योजना 2024महामेष योजना 2024
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024गोदाम अनुदान योजना 2024
युवा प्रशिक्षण योजना 2024प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024

कृपया ही सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी योजनांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

Maharashtra Free Education Scheme 2024:FAQ’s
Maharashtra Free Education Scheme 2024 चे फायदे काय आहे?

आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे त्याचबरोबर मुलींनी उच्चशिक्षित व्हावे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्चशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?

आधार कार्ड
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न रुपये ८ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
रहिवासी दाखला
मागील शैक्षणिक वर्षाचे गुणपत्रक
पासपोर्ट आकाराचे फोटो

मोफत उच्चशिक्षण योजना २०२४ चा लाभ कोणाला मिळणार?

महाराष्ट्रातील कोणत्याही महिलेला वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा इतर ८०० अभ्यासक्रमांसाठी एक टक्का देखील द्यावा लागणार नाही!!

मोफत उच्चशिक्षण योजना २०२४ चे फायदे काय काय आहेत?

महाराष्ट्र राज्याचे उच्चशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना याचा फायदा होणार आहे.त्याचबरोबर या योजनेमुळे उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुणींची संख्या वाढणार आहे.मोफत उच्चशिक्षण योजनेमुळे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात हे प्रवेश वाढताना दिसून येईल.
आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे त्याचबरोबर मुलींनी उच्चशिक्षित व्हावे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्चशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे.