Maharashtra Post Matric Scholarship Yojana In Marathi 2024
Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024 (महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
आपल्याला माहितीच आहे की राज्य सरकार आपल्या राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी सातत्याने नवनवीन योजना राबवत असते. त्याचबरोबर राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी देखील महाराष्ट्र राज्य सरकार सतत प्रयत्नशील असते. अशातच राज्य सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एक योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024 (महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024) होय.
Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024 (महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024) ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे ही योजना? काय आहेत या योजनेचे मुख्य उद्देश्य? या योजनेची वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेचे फायदे काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास कोण कोण पात्र आहे? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.
महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024 थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024 (महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | महाराष्ट्र राज्य सरकार |
योजनेची सुरुवात कधी करण्यात आली | 1959-60 |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य |
योजनेचे मुख्य उद्देश | राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे |
योजनेचे लाभार्थी | अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थी |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, देखभाल भत्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024:योजनेचे उद्देश
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?
- राज्यातील उच्चशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
- विद्यार्थ्यांमध्ये उच्चशिक्षणासाठी आवड निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आत्मनिर्भर बनविणे.
- महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतरांकडे पैसे मागण्याची वेळ येऊ नये, हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- विद्यार्थ्यांना सशक्त व स्वावलंबी बनविणे.
Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?
- महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे उच्चशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
- या योजनेची सुरुवात केंद्र आणि राज्य सरकार यांच्या एकत्रिकरणाने करण्यात आली आहे.
- त्याचबरोबर या योजनेअंतर्गत 60 टक्के केंद्र सरकार व 40 टक्के राज्य सरकारचा हिस्सा आहे.
- या योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येणार आहे.
- महत्वाचं म्हणजे या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीची असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या अर्ज करता येणार आहेत.
Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024:लाभ
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहेत?
या योजनेच्या माध्यमातून खालील प्रमाणे भत्त्याचे वाटप केले जाते, संपूर्ण भत्त्याचा कालावधी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यापासून ते परीक्षा संपेपर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत असणार आहे.
अभ्यासक्रम | होस्टर विद्यार्थी | नॉन होस्टर विद्यार्थी म्हणजेच डे स्कॉलर्स विद्यार्थ्यांसाठी |
---|---|---|
गट अ | 425 रुपये दरमहा | 190 रुपये दरमहा |
गट ब गट क | 290 रुपये दरमहा | 190 रुपये दरमहा |
गट ड | 230 रुपये दरमहा | 120 रुपये दरमहा |
गट इ | 150 रुपये दरमहा | 190 रुपये दरमहा |
आणि महत्वाचं म्हणजे सरकारी वसतिगृहात प्रवेश मिळालेले विद्यार्थी एक तृतीयांश रक्कम घेण्यासाठी पात्र आहेत. त्याचबरोबर व्यवसाय किंवा बिगर व्यवसाय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण घेतलेल्या विना सहकारी किंवा खाजगी संस्थेमधील असलेले शिक्षण शुल्क, देखभाल भत्ता, परीक्षा शुल्क हे सरकारद्वारे दिले जाते.
Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहेत? कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत?
- Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024 (महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीच लाभ घेण्यासाठी पात्र आहेत, महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा अर्ज करता येणार नाही व त्यांना या योजनेच्या माध्यमातून कोणताही लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थी हा अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असणे आवश्यक आहे.
- या योजनेच्या माध्यमातून मुलं-मुली या दोघांनाही लाभ घेता येणार आहे.
- त्याचबरोबर अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता दिला जाईल.
- अर्जदार विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- जर विद्यार्थी नापास झाला तर त्याला परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता दिला जाईल. एकाच वर्गात दुसऱ्यावेळी देखील विद्यार्थी नापास झाला तर त्याला कोणताही भत्ता मिळणार नाही. तसेच दोन्ही प्रयत्नानंतर तिसऱ्यावेळी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास पुढील वर्गात गेला तर त्याला लाभ आनुज्ञेय आहे.
- आणि महत्वाचं म्हणजे अर्जदार विद्यार्थ्यांनी या पूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या सुरू असलेल्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे?
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- गतवर्षाचे परीक्षेची गुणपत्रिका
- दहावी किंवा बारावी ची गुणपत्रिका
- शिक्षणात खंड पडला असेल तर गॅप सर्टिफिकेट
- वडिलांचा मृत्यू झाला असल्यास मृत्यू प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
- Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024 (महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदार विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
- त्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
- अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर तुमच्यासमोर नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे.
- आता तुम्हाला रजिस्टर या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात.
- आता तुम्हाला तुमचे यूजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगइन करावे लागणार आहे.
- लॉगइन केल्यानंतर तुमच्यासमोर एक होमपेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती यावर क्लिक करावे लागणार आहे.
- त्यानंतर Social Justice and Special Assistance Department यावर क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Apply for This Scheme या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024 चा अर्ज उघडेल.
- त्यामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
- तसेच तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
- आणि त्यानंतर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
- अशा प्रकारे मित्रांनो, तुमची Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024 (महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024:FAQ’s
Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024 (महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?
महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024 ची सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकारने केली आहे.
Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024 (महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?
राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024 (महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?
अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.
Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024 (महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?
महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024 च्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, देखभाल भत्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे.
Maharashtra Post Matric Scholarship Yojana 2024 (महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?
महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024 चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.