Majhi Ladki Bahin Yojana 6th Installment In Marathi
Majhi Ladki Bahin Yojana 6th Installment: नमस्कार मित्रांनो, राज्याच्या विधनसभा निवडणुकीत “माझी लाडकी बहीण योजना” गेम चेंजर ठरली आहे. आपल्या राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2024 मध्ये विधनसभेच्या पावसाळी अधिवेशनात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंमलात आणली. या योजनेचे आत्तापर्यंत 5 हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर 2024 महिन्याच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली, नवीन सरकार निवडून आले, मंत्र्यांचा शपथविधी देखील पार पडला. मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची रक्कम मात्र अजून मिळालेली नाही. त्यामुळे आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात याची घोषणा होणार का? याकडे राज्यातील 2 कोटी 50 लाख महिलांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी नागपूर अधिवेशन सुरू होण्यापूर्वी हमी दिली की, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. काही खर्च हे आपल्याला करावेच लागतात, ते टाळता येणे शक्य नाही. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, “लाडकी बहीण योजना पुढे चालू राहण्यासाठी तिन्ही पक्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करतील”.
Majhi Ladki Bahin Yojana 6th Installment महाराष्ट्र राज्याची विधानसभा 2024 ची निवडणूक पार पडल्यानंतरही निकाल लागल्यानंतर 20 दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सहाव्या हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे राज्यातील 2 कोटी 50 लाख लाभार्थी महिलांचे लक्ष नागपूरच्या अधिवेशनाकडे लागले आहे. लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार का? नागपूरच्या अधिवेशनात लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी रकमेची तरतूद होणार का? असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत. याची उत्तरे आपल्याला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मिळतील, अशी आशा आहे.
Majhi Ladki Bahin Yojana 6th Installment नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहाची मंजुरी आणि वित्त विभागाकडून तरतूद मंजुर झाल्यानंतरच राज्यभरातील लाडक्या बहीणींच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती रक्कम 1500 रुपये असेल की 2100 रुपये असेल हे अजून निश्चित झालेले नाही. यासर्व गोष्टींवर सरकार काय निर्णय घेणार आहे याकडे राज्यातील 2 कोटी 50 लाख महिलांचे लक्ष लागले आहे.
Majhi Ladki Bahin Yojana 6th Installment: सहाव्या हप्त्याचे वितरण
Majhi Ladki Bahin Yojana 6th Installment मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण हे दोन टप्प्यात होणार आहे
- पहिला टप्पा :- दोन कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल.
- दूसरा टप्पा :- उर्वरित महिलांना 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान दुसऱ्या टप्प्यात रक्कम वितरित केली जाईल.
Majhi Ladki Bahin Yojana 6th Installment “या” महिलांना मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता
- चारचाकी वाहन :-
- ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र ट्रॅक्टर असलेल्या महिलांना यापासून सूट देण्यात आली आहे.
- वार्षिक उत्पन्न :-
- ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- आयकर भरणारे कुटुंब :-
- आयकर भरणाऱ्या महिलांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार नाही.
- सरकारी कर्मचारी :-
- कुटुंबातील सदस्य जे नियमित, कायम, कंत्राटी किंवा सरकारी विभागामध्ये काम करत आहेत, त्यांनादेखील या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार नाही.
- आर्थिक मदतीचे लाभ :-
- ज्या महिलांनी शासनाच्या इतर आर्थिक योजनांच्या माध्यमातून लाभ घेतला आहे, त्यांनाही “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” च्या माध्यमातून लाभ मिळणार नाही.
- राजकीय किंवा शेतीची मालकी:-
- ज्या कुटुंबात विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार आहेत किंवा जे कुटुंब संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन असणारे आहेत, त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
📢Majhi Ladki Bahin Yojana 6th Installment माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाच्या या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकताय.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “माझी लाडकी बहीण योजना 2024“ ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तुम्ही ही माहिती आपल्या जवळील नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करण्यास विसरू नका. त्याचबरोबर अशाच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या द महारोजगार डॉट कॉम या वेबसाइटला वेळोवेळी भेट देत रहा.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️