SBI Asha Scholarship Yojana 2024: 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 7.5 लाखांपर्यंत शिष्यवृत्ती

SBI Asha Scholarship Yojana In Marathi 2024

SBI Asha Scholarship Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. भारतातील प्रमुख शिष्यवृत्ती कार्यक्रमांपैकी “एसबीआय आशा स्कॉलरशिप योजना” एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. ही योजना एसबीआय फाऊंडेशनच्या शिक्षण शाखा, इंटीग्रेटेड लर्निंग मिशन (ILM) अंतर्गत चालवली जाते.

SBI Asha Scholarship Yojana 2024 अंतर्गत इयत्ता 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसह NIRF क्रमवारीत उच्च दर्जाची म्हणजेच टॉप 100 विद्यापीठे, महाविद्यालये, आयआयटी आणि आयआयएम मधील पदवी, पदव्युत्तर त्याचबरोबर एमबीए (MBA), PGDM मध्ये शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. या योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी 7.5 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते.

चला तर मग SBI Asha Scholarship Yojana 2024 (एसबीआय आशा स्कॉलरशिप योजना) नक्की काय आहे? या योजनेचे मुख्य उद्देश काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून कोण कोण लाभ घेऊ शकणार आहेत? या योजनेसाठी कोण कोण पात्र ठरणार आहे? काय आहे पात्रता? कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत? या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवायचा असल्यास अर्ज कसा करायचा? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पहाणार आहोत.

मित्रांनो, संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा. त्याचबरोबर ही माहिती आपल्या जवळील नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करण्यास विसरू नका, जेणेकरून त्यांनाही SBI Asha Scholarship Yojana 2024 च्या माध्यमातून लाभ घेता येईल. महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर, या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायला विसरू नका.

SBI Asha Scholarship Yojana 2024

एसबीआय आशा स्कॉलरशिप योजना

योजनेचे नावSBI Asha Scholarship Yojana 2024
(एसबीआय आशा स्कॉलरशिप योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीएसबीआय फाऊंडेशन
योजनेचे मुख्य उद्देशआर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे
योजनेचे लाभार्थीइयत्ता 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसह, आयआयटी आणि आयआयएम मधील पदवी, पदव्युत्तर त्याचबरोबर एमबीए (MBA), PGDM मध्ये शिकणारे विद्यार्थी
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ15,000/- रुपये ते 7.50,000/- रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार
पात्रतामागील वर्गात किमान 75% गुण
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन अर्ज पद्धत
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

SBI Asha Scholarship Yojana 2024 एसबीआय फाऊंडेशनची थोडक्यात माहिती

मित्रांनो, एसबीआय फाऊंडेशन हा भारतीय स्टेट बँकेचा सामाजिक कल्याण विभाग आहे, जो देशातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ग्रामीण विकास, आरोग्य सेवा, शिक्षण, उदरनिर्वाह, उद्योजकता त्याचबरोबर युवा सशक्तीकरण आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे काम करतो.

त्याचबरोबर आता आशा स्कॉलरशिप 2024 साठी अधिकृत अधिसूचना जाहीर झाली आहे. या स्कॉलरशिप अंतर्गत देशभरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी जे इयत्ता 6 वी ते 12 वी, महाविद्यालयीन त्याचबरोबर आयआयटी, आयआयएम मधील विद्यार्थ्यांना 15 हजार ते 7.5 लाखांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.

SBI Asha Scholarship Yojana 2024 उद्देश

SBI Asha Scholarship Yojana 2024 एसबीआय आशा स्कॉलरशिप योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे देशातील आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणात कोणत्याही आर्थिक समस्या येऊ नये यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य करणे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणानुसार 15 हजार रुपये ते 7.5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य करणे. या योजनेच्या माध्यमातून मिळणारी ही लाभाची रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते.

SBI Asha Scholarship Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “एसबीआय आशा स्कॉलरशिप योजना 2024” साठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहेत? कोणत्या अटी शर्ती असणार आहेत?

  • SBI Asha Scholarship Yojana 2024 च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार विद्यार्थी हा भारतीय असणे आवश्यक आहे.
  • एसबीआय आशा स्कॉलरशिप योजना ही फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठी आहे.
  • अर्जदार विद्यार्थी इयत्ता 60 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेत असावा.
  • त्याचबरोबर पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी ज्यांचे महाविद्यालय NIRF टॉप 100 मध्ये आहे ते पात्र आहेत, तसेच आयआयटी, आयआयएम आणि एमबीए /PGDM अभ्यासक्रमासाठीचे विद्यार्थी देखील पात्र आहेत.
  • अर्जदार विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक वर्षात किमान 75% गुण असणे आवश्यक आहेत.
  • शाळेतील विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

SBI Asha Scholarship Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “एसबीआय आशा स्कॉलरशिप योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • मागील वर्षाचे मार्कशीट
  • चालू शिक्षणाचा पुरावा (प्रवेशपत्र/ओळखपत्र/फिस पावती)
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

SBI Asha Scholarship Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • SBI Asha Scholarship Yojana 2024 (एसबीआय आशा स्कॉलरशिप योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदार विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला “स्कॉलरशिप अप्लाय” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड ईमेल आयडीने लॉगइन करावे लागेल.
  • त्यानंतर “स्टार्ट अॅप्लिकेशन” या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल.
  • आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.
  • त्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • आणि शेवटी तुम्हाला “सबमीट” या बटणावर क्लिक करून तुम्ही भरलेला अर्ज सबमीट करावा लागेल.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची “एसबीआय आशा स्कॉलरशिप योजना 2024” ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “एसबीआय आशा स्कॉलरशिप योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
गाय गोठा अनुदान योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024
कृषी उन्नती योजना 2024राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024
महाडीबीटी शेतकरी योजना 2024प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024
महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना 2024थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024