Vikramaditya Scholarship Yojana 2024 In Marathi :12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 2500/- रुपये आर्थिक सहाय्य! असा करा अर्ज|

Table of Contents

Vikramaditya Scholarship Yojana 2024

Vikramaditya Scholarship Yojana 2024 In Marathi : नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Vikramaditya Scholarship Yojana 2024 (विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जसे की ही योजना नक्की काय आहे, या योजनेची सुरुवात कोणी आणि कधी केली, काय आहेत या योजनेचे मुख्य उद्देश आणि वैशिष्ट्ये, या योजनेच्या माध्यमातून कोण कोण लाभ घेऊ शकतो, या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत, त्याचबरोबर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पहाणार आहोत.

मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार आपल्या देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी सातत्याने नवनवीन योजना राबवत असते. देशातील वृद्ध नागरिकांच्या हितासाठी पेन्शन योजना, महिलांसाठी विविध योजना, त्याचबरोबर शेतकरी बांधवांच्या विकासासाठी विविध योजना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देशभरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना सरकार राबवत असते.

अशातच मध्यप्रदेश राज्य सरकारने राज्यातील 12 वी पास झालेले विद्यार्थी जे उच्चशिक्षण घेण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु त्यांच्याकडे पुढील शिक्षणासाठी पैसे नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी एक योजना सुरू केली आहे. ती म्हणजेच Vikramaditya Scholarship Yojana 2024 (विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024) होय.

मित्रांनो, तुम्हालाही या योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यायचा असेल तर खालील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा. तसेच हा लेखा तुमच्या जवळील मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करण्यास विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येईल.

Vikramaditya Scholarship Yojana 2024 In Marathi

विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावVikramaditya Scholarship Yojana 2024
(विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीमध्यप्रदेश सरकार
राज्यमध्यप्रदेश
विभागउच्च शिक्षा विभाग
योजनेचे मुख्य उद्देशविद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
योजनेचे लाभार्थीराज्यातील 12 वी पास झालेले विद्यार्थी
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभविद्यार्थ्यांना 2,500/- रुपये प्रतिवर्ष मिळणार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन अर्ज पद्धत
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Vikramaditya Scholarship Yojana 2024: योजनेचे मुख्य उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहे?

  • राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने ‘विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024’ सुरू करण्यात आली आहे.
  • आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • त्याचबरोबर राज्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे.
  • विद्यार्थ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
  • त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

Vikramaditya Scholarship Yojana 2024: योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • Vikramaditya Scholarship Yojana 2024 (विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024) ही विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून 12 वी नंतरचे शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2500 रुपये आर्थिक सहाय्य शासनामार्फत केले जाणार आहे.
  • त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
  • तसेच या योजनेची अर्ज करण्याची अत्यंत सोपी असल्यामुळे अर्ज करतेवेळी अर्जदार विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
  • विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024 च्या माध्यमातून नक्कीच आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लागणार आहे.
Vikramaditya Scholarship Yojana 2024 In Marathi

Vikramaditya Scholarship Yojana 2024:पात्रता

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024” साठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे?

  • Vikramaditya Scholarship Yojana 2024 (विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार हा मध्यप्रदेश राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर अर्जदार हा सामान्य वर्गातील असणे आवश्यक आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी मध्ये 60% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त झाले आहेत, त्याच विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे.
  • अर्जदार विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 54,000/- रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • तसेच अर्जदार विद्यार्थी हे महाविद्यालयात शिकत असणे आवश्यक आहे.

Vikramaditya Scholarship Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत?

  • अर्जदार विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • 10 वी 12 वी मार्कशीट
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

Vikramaditya Scholarship Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • Vikramaditya Scholarship Yojana 2024 (विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारास ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
  • त्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला होमपेज वरील “रजिस्ट्रेशन” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई-केवायसीद्वारे आधार क्रमांक टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा अर्ज उघडेल.
  • त्यामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक व अचूकपद्धतीने भरावी लागेल.
  • त्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत.
  • आता तुम्हाला भरलेला अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यावा लागेल, अर्जात भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • संपूर्ण माहिती अचूक असल्यास तुम्ही “सबमीट” या पर्यायावर क्लिक करून तुमचा अर्ज सबमीट करू शकताय.
  • अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुमची “विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024” ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
गाय गोठा अनुदान योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024
कृषी उन्नती योजना 2024राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024
महाडीबीटी शेतकरी योजना 2024प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024
महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना 2024थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024
Vikramaditya Scholarship Yojana 2024 In Marathi : FAQ’s
Vikramaditya Scholarship Yojana 2024 (विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?

विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024 ची सुरुवात मध्यप्रदेश सरकारने केली आहे.

Vikramaditya Scholarship Yojana 2024 (विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Vikramaditya Scholarship Yojana 2024 (विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थी ज्यांचे इयत्ता 12 वी चे शिक्षण पूर्ण झाले आहे, असे विद्यार्थी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.

Vikramaditya Scholarship Yojana 2024 (विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024) च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?

विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024 च्या माध्यमातून उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2500 रुपये आर्थिक सहाय केले जाणार आहे.

Vikramaditya Scholarship Yojana 2024 (विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

विक्रमादित्य स्कॉलरशिप योजना 2024 चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.