Sanjay Gandhi Niradhar Yojana In Marathi 2024
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपल्या सरकारी योजनेच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे. या वेबसाइटवर आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकार अंतर्गत सुरू होणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती जाणून घेत असतो. अशाच एका योजनेची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, ती म्हणजेच Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 (संजय गांधी निराधार योजना 2024) होय. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील निराधार व्यक्तींना आधार देण्यासाठी म्हणजेच त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार त्यांना आर्थिक सहाय्य करणार आहे.
मित्रांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्या राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी तसेच आपल्या राज्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असते. केंद्र आणि राज्य सरकार सतत नवनवीन योजना आपल्या राज्यातील नागरिकांसाठी राबवत असते, जेणेकरून राज्यातील नागरिकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा, राज्यातील तरुण वर्गासाठी विविध प्रकारच्या कर्ज योजना राबवून त्यांना स्वतःचा उद्योग धंदा सुरू करता यावा, तसेच राज्यातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवनवीन शिष्यवृत्ती योजना सरकार राबवत असते, जेणेकरून आपल्या राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नये, तसेच त्यांचे भविष्य उज्वल बनविण्याच्या उद्देशाने सरकार प्रयत्नशील असते.
आपले महाराष्ट्र सरकार राज्यातील नागरिकांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते, त्यातीलच एक योजना जी राज्यातील निराधार व्यक्तींसाठी सरकार ने राबविण्याचा निर्णय घेतला आहे, ती म्हणजेच Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 (संजय गांधी निराधार योजना 2024) होय. मित्रांनो, केंद्र सरकारने ही योजना 1980 साली सुरू केलेली योजना आहे.
संजय गांधी निराधार योजना 2024 च्या माध्यमातून आपल्या राज्यातील निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, घटस्फोटीत महिला, दुर्लक्षित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया, ट्रान्सजेंडर इत्यादींना शासनामार्फत आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. संजय गांधी निराधार योजना 2024 अंतर्गत लाभार्थी असलेल्या प्रत्येक व्यक्तीस दरमहा 1,500/- रुपये मिळणार आहेत.
त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवणारे लाभार्थी 65 वर्षांचे झाल्यानंतर त्यांना ‘श्रावणबाळ निवृत्तीवेतन’ योजना तसेच ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना’ यामध्ये समावून घेतले जाणार आहे. राज्यातील निराधार व्यक्तींसाठी ही अतीशय महत्वाची योजना आहे, या योजनेमुळे त्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास देखील होणार आहे.
चला तर मग मित्रांनो, Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 (संजय गांधी निराधार योजना 2024) नक्की काय आहे? या योजनेच्या माध्यमातून कोण कोण लाभ मिळवू शकतो? या योजनेची वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? काय काय पात्रता आवश्यक आहेत? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील दिलेल्या लेखाद्वारे पाहणार आहोत.
संजय गांधी निराधार योजना 2024:थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 (संजय गांधी निराधार योजना 2024) |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
योजनेची सुरुवात कधी झाली | 1980 |
योजनेचे उद्देश | राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य करणे |
योजनेचे लाभार्थी | राज्यातील निराधार व्यक्ती |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | लाभार्थी असलेल्या व्यक्तीस दरमहा 1,500/- रुपये मिळणार आहेत |
योजनेची अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन/ ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024:नक्की काय आहे ही योजना
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया नक्की काय आहे ही योजना?
- या योजना प्रामुख्याने राज्यातील निराधार व्यक्तींसाठी सुरू करण्यात आलेली एक अतीशय महत्वाची योजना आहे.
- Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 (संजय गांधी निराधार योजना 2024) च्या माध्यमातून राज्यातील निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, घटस्फोटीत महिला, दुर्लक्षित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया, ट्रान्सजेंडर इत्यादींना शासनामार्फत आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
- निराधार व्यक्तींना या योजनेच्या माध्यमातून दरमहा 1,500/- रुपये आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
- त्याचबरोबर एकापेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या कुटुंबासाठी प्रत्येक महिन्याला 1,500/- रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024:योजनेचे उद्देश
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “संजय गांधी निराधार योजना 2024” चे उद्देश काय आहेत?
- आपल्या देशातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य करणे.
- देशभरातील निराधार असलेल्या व्यक्तींचे जीवनमान सुधारण्यासाठी सहाय्य करणे.
- तसेच निराधार व्यक्तींचा आर्थिक आणि सामाजिक विकास या योजनेच्या सहाय्याने घडवून आणणे.
- निराधार व्यक्तींना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- त्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये या मुख्य उद्देशाने केंद्र सरकारने संजय गांधी निराधार योजना 2024 ची सुरुवात केली आहे.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024:योजनेचे वैशिष्ट्ये
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “संजय गांधी निराधार योजना 2024” चे वैशिष्ट्ये काय आहेत?
- Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 (संजय गांधी निराधार योजना 2024) ची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे.
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार असलेल्या व्यक्तीला किती आपत्य आहेत, याची कोणतीही अट नाही.
- ज्या मुला-मुलींना आई वडील नाहीत, त्यांना या योजनेचा अर्ज करता येणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून मिळणारी लाभाची रक्कम लाभार्थी असलेल्या व्यक्तीच्या थेट बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येणार आहे.
- या योजेनच्या सहाय्याने निराधार व्यक्ती आत्मनिर्भर बनणार आहेत.
- त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना 2024 ची अर्ज प्रक्रिया अतीशय सोपी ठेवण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी व्यक्ती ऑनलाइन त्याचबरोबर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
- त्यांना या योजनेचा अर्ज करण्यासाठी कुठल्याही सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024:वयाची अट
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “संजय गांधी निराधार योजना 2024” चा लाभ घेण्यासाठी वयाची अट किती आहे?
- Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 (संजय गांधी निराधार योजना 2024) चा लाभ मिळविण्यासाठी अर्जदार व्यक्तीचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024:वार्षिक उत्पन्न
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “संजय गांधी निराधार योजना 2024” चा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न किती असावे?
- संजय गांधी निराधार योजना 2024 अंतर्गत अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 21,000/- रुपयांपेक्षा जास्त असू नये.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024:आर्थिक सहाय्य
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “संजय गांधी निराधार योजना 2024” च्या माध्यमातून किती आर्थिक सहाय्य मिळणार आहे?
- या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी व्यक्तीस दरमहा 1,500/- रुपये मिळणार आहेत.
- तसेच एक पेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या कुटुंबाला दरमहा 1,500/- रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024:योजनेचे लाभार्थी
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “संजय गांधी निराधार योजना 2024” चे कोण कोण लाभार्थी आहेत?
- ज्याला कोणाचाही सहारा नाही असे निराधार व्यक्ती
- तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या पत्नी
- अंध, अपंग, मुकबधिर, कर्णबधिर, मतिमंद ई. व्यक्ती
- अनाथ मुले
- देवदासी
- घटस्फोटीत महिला
- ज्या महिलांचा घटस्फोट झाला आहे मात्र त्यांना पोटगी मिळालेली नाही, अशा महिला
- मोठ्या आजाराने ग्रस्त असणारे व्यक्ती
- वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला
- दुर्लक्षित महिला
- आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी
- ट्रान्सजेंडर
- मोठे आजार म्हणजेच क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यांमुळे स्वतःचे घर चालवू न शकणारे पुरुष व महिला
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024:पात्रता ,अटी व शर्ती
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “संजय गांधी निराधार योजना 2024” चा लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र आहेत? काय काय अटी व शर्ती असणार आहेत?
- संजय गांधी निराधार योजना 2024 चा लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या नगरिकांनाच या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाईल.
- अर्जदार व्यक्तीचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीमध्ये असणे आवश्यक आहे.
- ज्या व्यक्तींकडे मिळकतीचे कोणत्याही प्रकारचे साधन नाही, त्याच व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- अर्जदार हा किमान 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- जर अर्जदार व्यक्ती राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही योजनेच्या माध्यमातून पेन्शन मिळवत असले तर त्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- त्याचबरोबर अनाथ मुलांच्या बाबतीत, ते सज्ञान होईपर्यंत त्यांच्या संबंधित पालकांना लाभाची रक्कम देण्यात येईल.
- अनाथ मुलींचे वय 25 वर्षांचे होईल किंवा अविवाहित असतील तरच त्यांचा लाभ कायम राहील.
- मुलाला नोकरी मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन, त्यांची पात्रता ठरविली जाईल.
- लाभार्थी व्यक्ती मृत पावल्यास त्यास मिळणारे आर्थिक सहाय्य बंद केले जाईल.
- अर्जदार व्यक्तीच्या नावे जमीन असता कामा नये.
- महाराष्ट्र राज्याच्या व्यतिरिक्त इतर दुसऱ्या राज्यातील नागरिकांना या योजनेचा अर्ज करता येणार नाही, त्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार नाही.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “संजय गांधी निराधार योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- अर्जदार व्यक्तीचे फोटो
- निमशासकीय ओळखपत्र
- दुर्धर आजाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक
- शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांचा दाखला
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा दाखला
- ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या जन्म नोंदवहीतील प्रत
- वयाचा पुरावा
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “संजय गांधी निराधार योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
● ऑफलाइन अर्ज पद्धत :-
- Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 (संजय गांधी निराधार योजना 2024) चा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदार व्यक्तीस आपल्या जवळच्या जिल्हा कार्यालयात, तहसील कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक अचूकपणे भरावी.
- त्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
- आणि नंतर संपूर्ण अर्ज एकदा तपासून घ्यायचा आहे.
- त्यानंतर अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे.
- अशा प्रकारे मित्रांनो, तुमची ‘संजय गांधी निराधार योजना 2024’ ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
● ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :-
- अर्जदारास सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- तुमच्यासमोर होमपेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला नवीन यूजर नोंदणी करावी लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला ‘नोंदणी करा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे यूजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगइन करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर ‘संजय गांधी निराधार योजना 2024’ चा फॉर्म उघडेल.
- त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे.
- तसेच आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- आता मित्रांनो, तुम्ही पुन्हा एकदा संपूर्ण अर्ज तपासून घ्यायचा आहे, त्यामध्ये भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
- संपूर्ण माहीती अचूक असल्यास तुम्ही ‘सबमिट’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे मित्रांनो, तुमची ‘संजय गांधी निराधार योजना 2024’ ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “संजय गांधी निराधार योजना 2024“ ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024:FAQ’s
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 (संजय गांधी निराधार योजना 2024) चे उद्देश काय आहे?
उत्तर – राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य करणे
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 (संजय गांधी निराधार योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?
उत्तर – लाभार्थी असलेल्या व्यक्तीस दरमहा 1,500/- रुपये मिळणार आहेत
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 (संजय गांधी निराधार योजना 2024) चीसुरवात कधी झाली?
सदर योजनेची सुरुवात 1980 साली झाली आहे.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 (संजय गांधी निराधार योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?
सदर योजनेचा अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने करायचा आहे.