Bal Sangopan Yojana In Marathi 2024
Bal Sangopan Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Bal Sangopan Yojana 2024 (बाल संगोपन योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकार आपल्या राज्यातील मुलांसाठी सातत्याने नवनवीन योजना राबवत असते, त्यातीलच ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
Bal Sangopan Yojana 2024 (बाल संगोपन योजना 2024) अंतर्गत ज्या मुलांना आई-वडील नाहीत म्हणजेच जी मुले अनाथ आहेत, अशा मुलांना शासनामार्फत मदत केली जाते. मदतीचे स्वरूप म्हणजेच दरमहा अनाथ मुलांना 1100/- रुपये आर्थिक सहाय्य केले जाते. ही लाभाची रक्कम लाभार्थी असलेल्या मुलांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. प्रतिमहा 1100/- रुपये म्हणजेच वर्षाला 13200/- रुपये अर्जदाराला मिळतात.
बाल संगोपन योजना 2024 ही एक क्रांतिकारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना थेट पर्यायी कुटुंबात संगोपनासाठी ठेवण्यात येते. यामध्ये निराधार, अनाथ, बेघर, निराश्रीत, दुर्धर, आजारी पालकांची मुले यांचा समावेश होतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे प्रत्यक्ष जिल्हा व बालविकास अधिकारी किंवा स्वयंसेवी संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते संपूर्ण चौकशी करून संबंधित बाल कल्याण समितीस अहवाल सादर करतात. सदर अहवालाच्या आधारे बाल कल्याण समितीकडून दाखल आदेश घेऊन लाभार्थ्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत या योजनेचा लाभ दिला जातो.
चला तर मित्रांनो, जाणून घेऊया ही योजना नक्की काय आहे? या योजनेची सुरुवात कोणी आणि कधी केली? या योजनेचे मुख्य उद्देश आणि वैशिष्ट्ये काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून कोण कोण लाभ मिळवू शकतो? त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यास काय काय लाभ मिळणार आहे? या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

बाल संगोपन योजना 2024 थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Bal Sangopan Yojana 2024 (बाल संगोपन योजना 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | महाराष्ट्र राज्य सरकार |
योजनेची सुरुवात कधी झाली | 2005 |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
विभाग | महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य |
योजनेचे मुख्य उद्देश | राज्यातील अनाथ मुलांना आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्रातील अनाथ मुले-मुली |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | दरमहा 1100/- रुपयांचे आर्थिक सहाय्य |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Bal Sangopan Yojana 2024:योजनेचे मुख्य उद्देश
चला तर मित्रांनो, जाणून घेऊया “बाल संगोपन योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?
- महाराष्ट्र राज्यातील निराधार, अनाथ, बेघर, निराश्रीत, दुर्धर, आजारी पालकांची मुले यांना आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील अनाथ मुलांना बाल संगोपन योजना 2024 चा लाभ देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे, हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- अशा बालकांना त्यांच्या संगोपनासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- त्याचबरोबर राज्यातील निराधार व बेघर मुलांना स्वतःच्या पायावर उभे करणे.
- आपल्या राज्यातील निराधार, अनाथ, बेघर, निराश्रीत, दुर्धर मुलांना थोड्या कालावधीसाठी किंवा दीर्घ कालावधीसाठी कुटुंब उपलब्ध करून देणे.
- आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनाथ बालकांना या योजनेअंतर्गत 18 वर्षांपर्यंत पालन, पोषण, शिक्षण प्रदान करणे.
Bal Sangopan Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये
चला तर मित्रांनो, जाणून घेऊया “बाल संगोपन योजना 2024″ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?
- Bal Sangopan Yojana 2024 (बाल संगोपन योजना 2024) ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेली एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
- या योजनेची सुरुवात 2005 साली झाली असून देखील आज सुद्धा ही योजना निरंतर सुरू आहे.
- बाल संगोपन योजना 2024 अंतर्गत अनाथ बालकांना शासनामार्फत आर्थिक सहाय्य केले जाते.
- या योजनेच्या माध्यमातून बालकांना दरमहा 1100/- रुपये दिले जातात.
- म्हणजेच वर्षाला 13200/- रुपये लाभार्थी असलेल्या मुलांना मिळतात.
- ही लाभाची रक्कम लाभार्थी मुलांच्या थेट बँक खत्यात जमा करण्यात येते.
Bal Sangopan Yojana 2024:योजनेचे लाभार्थी
चला तर मित्रांनो, जाणून घेऊया “बाल संगोपन योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?
- निराधार, अनाथ, बेघर, निराश्रीत, दुर्धर, आजारी पालकांची मुले
- अपंग पालकांची मुले
- मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे ई कारणांमुळे विघटित झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके
- ज्या बालकांना कुष्ठरोग आजार आहे
- एचआयव्ही ग्रस्त बालक
- कॅन्सर ग्रस्त बालक
- तीव्र मतिमंद बालक
- शाळेत न जाणारे बालकामगार
- ई. बालके या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.
Bal Sangopan Yojana 2024:लाभ
चला तर मित्रांनो, जाणून घेऊया “बाल संगोपन योजना 2024” च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?
- Bal Sangopan Yojana 2024 (बाल संगोपन योजना 2024) च्या माध्यमातून राज्यातील अनाथ मुलांना दरमहा 1100/- रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
- तसेच कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना 5 लाख रुपयांची ठेव बँकेत जमा करण्यात येणार आहे.
- ही लाभाची रक्कम त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Bal Sangopan Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती
चला तर मित्रांनो, जाणून घेऊया “बाल संगोपन योजना 2024” साठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे? कोणत्या कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत?
- Bal Sangopan Yojana 2024 (बाल संगोपन योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्र राज्यातील बालकांनाच लाभ घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बालकांना या योजनेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा लाभ घेता येणार नाही.
- त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी बालकांचे वय 18 वर्षे व त्या खालील असणे आवश्यक आहे.
- शासनाने मान्यता दिलेल्या स्वयंसेवी संस्थांना गरजू मुलांची निवड करून, बालकल्याण समितीपुढे मुलांना हजर करणे आवश्यक राहील.
- बालकल्याण समितीच्या मान्यतेशिवाय त्या मुलांना Bal Sangopan Yojana 2024 (बाल संगोपन योजना 2024) अंतर्गत अनुदान दिले जाणार नाही.
Bal Sangopan Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे
चला तर मित्रांनो, जाणून घेऊया “बाल संगोपन योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत?
- विद्यार्थ्यांच्या शाळेतील बोनाफाईड प्रमाणपत्र
- आई-वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- लाभार्थी पालकांचे आधार कार्ड
- सांभाळ करणाऱ्या पालकांचे फिटनेस प्रमाणपत्र
- पालकांचा संगोपन हमीपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- बालकाचा जन्माचा दाखला
- बँक खात्याचा तपशील
- बालकाचा पासपोर्ट साईज आकाराचा फोटो
Bal Sangopan Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मित्रांनो, जाणून घेऊया “बाल संगोपन योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
● ऑफलाइन अर्ज पद्धत :-
- अर्जदारास सर्वप्रथम जिल्ह्याच्या किंवा तालुक्याचा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जाऊन बाल संगोपन योजना 2024 चा अर्ज घ्यावा लागेल.
- त्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक अचूकपद्धतीने भरावी लागेल.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील.
- त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज व्यवस्थित तपासून घ्यायचा आहे, अर्जात भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे.
- संपूर्ण माहिती अचूक असल्यास तुम्ही तुमचा अर्ज संबंधित कार्यालयात जमा करू शकताय.
● ऑनलाइन अर्ज पद्धत :-
- Bal Sangopan Yojana 2024 (बाल संगोपन योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या अर्जदारास ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
- अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज दिसेल.
- त्यामध्ये तुम्हाला ‘बाल संगोपन योजनेसाठी अर्ज करा’ हा पर्याय निवडावा लागणार आहे.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सदर योजनेचा अर्ज उघडेल.
- आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.
- सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक असणारी स्वर कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करावी लागतील.
- आणि त्यानंतर तुम्हाला ‘सबमीट’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे मित्रांनो, तुमची Bal Sangopan Yojana 2024 (बाल संगोपन योजना 2024) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “बाल संगोपन योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Bal Sangopan Yojana 2024:FAQ’s
Bal Sangopan Yojana 2024 (बाल संगोपन योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?
बाल संगोपन योजना 2024 ची सुरुवात महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने केली आहे.
Bal Sangopan Yojana 2024 (बाल संगोपन योजना 2024) ची सुरुवात कधी करण्यात आली?
बाल संगोपन योजना 2024 ची सुरुवात 2005 साली करण्यात आली.
Bal Sangopan Yojana 2024 (बाल संगोपन योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?
राज्यातील अनाथ मुलांना आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
Bal Sangopan Yojana 2024 (बाल संगोपन योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?
महाराष्ट्रातील अनाथ मुले-मुली या योजनेच्या माध्यमातून घेण्यास पात्र आहेत.
Bal Sangopan Yojana 2024 (बाल संगोपन योजना 2024) च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?
या योजनेच्या माध्यमातून अनाथ मुलांना दरमहा 1100/- रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
Bal Sangopan Yojana 2024 (बाल संगोपन योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?
बाल संगोपन योजना 2024 चा अर्ज ऑनलाइन /ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.