Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024:आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024|

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana In Marathi 2024

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 (आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून देसभरातील युवकांना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळणार आहेत. आपल्या भारत देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.

देशातील बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी त्याचबरोबर देशातील युवकांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारत सरकारद्वारे डिसेंबर 2020 मध्ये सुरू करण्यात आलेली Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 (आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024) ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.

चला तर मग जाणून घेऊया ही योजना नक्की काय आहे? काय आहेत या योजनेचे मुख्य उद्देश? या योजनेची वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून कोण कोण लाभ मिळवू शकणार आहेत? त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे? तसेच या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पाहणार आहोत.

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 नक्की काय आहे?

केंद्र सरकारद्वारे 2020 साली सुरू करण्यात आलेली Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 (आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024) ही एक अत्यंत महत्वाची योजना आहे. या योजनेने 7.51 मिलियन नोकरीच्या संधी निर्माण केल्या आहेत. ज्या 5.85 मिलियन या सुरुवातीच्या लक्षात 25 टक्के पेक्षा अधिक आहेत.

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 (आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024) च्या माध्यमातून 2024 पर्यंत 22,810 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून जवळपास 7.1 मिलियन कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये केंद्र सरकारने या योजनेसाठी 1000 कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले होते. त्यातील 504 कोटी खर्च करण्यात आले आहेत. तसेच 2021-22 च्या बेजटमध्ये 3130 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. केंद्र सरकारने या योजनेवर 2022-23 पर्यंत एकूण 6400 कोटी रुपये खर्च केले आहेत.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024 ही ऑक्टोबर 2020 ते मार्च 2022 दरम्यान 1000 कर्मचाऱ्यांना रोजगारासाठी लागू होते. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाचा 24% हिस्सा दिला जातो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली ही योजना केवळ 15,000/- रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावAtmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024
(आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीकेंद्र सरकार
योजनेची सुरुवात कधी झाली11 नोव्हेंबर 2020
योजनेची घोषणा कोणी केलीनिर्मला सितारमण
योजनेचे मुख्य उद्देशदेशात रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करणे
योजनेचे लाभार्थीनवीन कर्मचारी
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभरोजगाराच्या संधी मिळणार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 (आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024) ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे.
  • या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे देशात रोजगार निर्मितीला चालना देणे, हे आहे.
  • त्याचबरोबर देशभरातील कामगारांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे.
  • कर्मचाऱ्यांना नव नियोक्ता प्रोत्साहनपर सबसिडी मिळवून त्यांना लाभ मिळवून देणे, हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024:योजनेचे लाभार्थी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • जर एखादा कर्मचारी 1 मार्च ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधी दरम्यान आपली नोकरी गमावून बसला असेल आणि 1 ऑक्टोबर नंतर नोकरी मिळवत असेल आणि तो कर्मचारी भविष्य निधी कोशद्वारे देखील नोंदणीकृत आहे तर या योजनेच्या माध्यमातून त्या नवीन कर्मचाऱ्याला लाभ दिला जाणार आहे.
  • त्याचबरोबर जर एखादा कर्मचारी भविष्य निधी नोंदणी मध्ये नाही आणि आता तो कुठल्याही संघटनमध्ये EPFO अंतर्गत नोंदणीकृत आहे आणि त्याचे वेतन 15,000/- रुपयांपेक्षा कमी आहे, त्याला देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024:पात्रता

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024” साठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे?

  • कर्मचारी
    • ज्या व्यक्ती 1 ऑक्टोबर 2020 ते 30 जून 2021 दरम्यान नवीन कर्मचारी म्हणून रोजगार प्राप्त करतात, त्यांना आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024 च्या माध्यमातून लाभ मिळू शकतो.
    • कर्मचाऱ्यांचे वेतन 15,000/- रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • नियोक्ता
    • ज्या कंपनी किंवा संस्थांमध्ये 50 पेक्षा जास्त कर्मचारी नाहीत आणि जे नियमितरित्या कर्मचारी घेतात. अशा नियोक्त्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातो.

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत?

  • UAN नंबर
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खात्याचा तपशील

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 (आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारास ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
  • त्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
  • अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर तुम्हाला तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करावे लागणार आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला आत्मनिर्भर भारत अभियान यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सदर योजनेचा अर्ज उघडेल.
  • आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव, वय, आधार कार्ड नंबर, बँक खात्याचा तपशील ई संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.
  • त्याचबरोबर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
  • त्यानंतर तुम्हाला ‘सबमीट’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 (आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४लेक लाडकी योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024
विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024
महामेष योजना 2024मध केंद्र योजना 2024
महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024
गोदाम अनुदान योजना 2024छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना 2024
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024आयुष्मान भारत विमा योजना 2024
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024
थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024मुख्यमंत्री राजश्री योजना 2024
Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024:FAQ’s
Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 (आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024) ची सुरुवात कोणी आणि कधी केली?

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024 ची सुरुवात केंद्र सरकारने 11 नोव्हेंबर 2020 रोजी केली.

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 (आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

देशात रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 (आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

नवीन कर्मचारी ज्यांना 15,000/- रुपयांपेक्षा कमी वेतन आहे, असे कर्मचारी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 (आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024 चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.