Atal Bhujal Yojana In Marathi 2024
Atal Bhujal Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील विविध राज्यांमध्ये पाणी पातळी वाढविण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे ही योजना? ही योजना कोणी आणि कधी सुरू केली? या योजनेचे मुख्य उद्देश तसेच मुख्य वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेमध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश असणार आहे? या योजनेचे व्यवस्थापन कसे असणार आहे? त्याचबरोबर या योजनेसाठी किती निधी मंजूर झाला आहे? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचे महत्व काय आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.
मित्रांनो, आपण पाहतच आहोत की मानवी हस्तक्षेपामुळे आपल्या निसर्गाचा दिवसेंदिवस ऱ्हास होत चालला आहे. यामुळे निसर्ग ऋतुचक्र पूर्णपणे बदलले गेले आहे. आपण पाहतच आहोत की, या निसर्गाच्या बदलामुळे आजच्या या घडीला अवकाळी पाऊस, अतीवृष्टी, ओला दुष्काळ, दुष्काळ अशा भयानक परिस्थितीचा सामना आपल्या देशातील नागरिकांना करावा लागत आहे. अशा भयावह परिस्थितीमुळे देशातील भूजल पातळी खोल जाताना दिसत आहे.
देशातील भुजल पातळीचे संरक्षण करण्यासाठी तसेच या परिस्थितीवर कायमचा उपाय म्हणून आणि आपल्या देशातील जमिनीचा पाणीसाठा वाढावा यासाठी केंद्र सरकारने Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) सुरू करण्याचा अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतला आहे. आपल्या देशातील पाणीसाठा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने आता पुढाकार घेतला आहे.
Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) साठी एकूण 6 हजार कोटी रुपये लागणार आहेत. यामध्ये 3 हजार कोटी रुपये जागतिक बँकेकडून कर्ज म्हणून तसेच उर्वरित 3 हजार कोटी रुपये हे केंद्र सरकार देणार आहे. या योजनेच्या माध्यमातून निधी जागतिक बँकेकडून भारत सरकारकडे हस्तांतरित केला जाणार आहे. त्यानंतर संबंधित राज्यांमध्ये हा निधी वितरित केला जाणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही योजना आपल्या देशातील एकूण 7 राज्यांमध्ये अतीदुष्काळी भागात भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध उपाय योजनांवर काम करणार आहे.
अटल भूजल योजना 2024 थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | या योजनेची सुरुवात आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे |
योजनेची सुरुवात कधी करण्यात आली | 30 डिसेंबर 2019 |
राज्य | महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश |
योजनेचे मुख्य उद्देश | देशातील भूजल पातळी वाढविणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Atal Bhujal Yojana 2024 नक्की काय आहे?
देशाची भूजल पातळी वाढविण्यासाठी केंद्र सरकारने 30 डिसेंबर 2019 रोजी Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) ची सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून देशातील भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जाणार आहेत. ही योजना समुदाय आधारित शाश्वत भूजल व्यवस्थापनसाठीची एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी एकूण 6 हजार कोटी रुपये लागणार असून त्यापैकी 3 हजार कोटी जागतिक बँकेकडून कर्ज म्हणून आणि 3 हजार कोटी रुपये केंद्र सरकारचे योगदान असणार आहे.
Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) ही देशातील एकूण 7 राज्यांमध्ये राबविली जाणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. यामधील 8,213 पाण्याचा ताण असलेल्या ग्रामपंचायत मध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक संरचना मजबूत करणे, तसेच शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी समुदाय स्तरावर वर्तनात्मक आवश्यक असणारे बदल घडवून आणणे अशा मुख्य उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्षमता वाढविणे त्याचबरोबर योजनेचे एकत्रीकरण आणि उत्तम कृषी पद्धती अशा विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या योजनेच्या माध्यमातून राज्यांना अनुदान स्वरूपात निधी दिला जाणार आहे. या योजनेला जागतिक बँकेकडून 2018 साली आर्थिक मान्यता मिळाली आहे. Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) च्या माध्यमातून जलजीवन मिशन हा एक अतीशय महत्वाचा घटक आहे.
देशातील पाण्याच्या समस्येला तोंड देणे व देशातील नागरिकांना स्वच्छ शाश्वत जलस्रोतांपर्यंत पोहोचविणे तसेच निवड केलेल्या गावांमध्ये या योजनेच्या माध्यमातून भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करणे हा Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) चा मुख्य उद्देश आहे.
Atal Bhujal Yojana 2024 तपशील
राज्य | जिल्हे | अवरोध | GPs |
---|---|---|---|
महाराष्ट्र | 13 | 43 | 1333 |
गुजरात | 06 | 36 | 1873 |
राजस्थान | 17 | 38 | 1139 |
हरियाणा | 14 | 36 | 1656 |
कर्नाटक | 14 | 41 | 1199 |
मध्यप्रदेश | 06 | 09 | 670 |
उत्तर प्रदेश | 10 | 26 | 550 |
एकूण | 80 | 229 | 8220 |
Atal Bhujal Yojana 2024:योजनेचे उद्देश
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “अटल भूजल योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?
- अटल भूजल योजना 2024 च्या माध्यमातून देशातील नागरिकांमध्ये भूजल पातळीबद्दल जनजागृती करणे.
- समुदायांना भूजल पातळी व्यवस्थापनाबद्दल योग्य ती माहिती देणे व त्यांना भूजल पातळी वडविण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- भूजल पातळी शाश्वत पद्धतीने वाढविण्यासाठी समुद्रामधील वर्तमानातील बदलांना प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) च्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान सुधारणे, हे देखील या योजनेचे उद्देश आहे.
- देशातील नागरिकांना पाण्याविषयी कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये म्हणून विविध उपाययोजना करणे.
Atal Bhujal Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “अटल भूजल योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?
- केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.
- सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड ने दिलेल्या आकडेवारीनुसार देशभरातील भूगर्भातील पाणी वेगाने कमी होत आहे. यामुळे सरकारने याकडे लक्ष देत तातडीने Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) योजना राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
- ही योजना आपल्या देशातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश अशा एकूण 7 राज्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे
- अटल भूजल योजना 2024 साठी एकूण 6 हजार कोटी रुपये इतका खर्च होणार आहे.
- यापैकी 50 टक्के रक्कम जागतिक बँकेकडून घेतली जाणार आहे, तसेच उर्वरित 50 टक्के रक्कम ही केंद्र सरकार देणार आहे.
- महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून सरकारने 50 टक्के रक्कम ग्रामपंचायत आणि भूजल व्यवस्थापनात उत्तम काम करणाऱ्या राज्यांना बक्षीस मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
- भूजल पातळी वाढविण्याचा दृष्टीने ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
Atal Bhujal Yojana 2024:निधी
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “अटल भूजल योजना 2024” साठी किती निधी लागणार आहे?
- अटल भूजल योजना 2024 साठी एकूण 6 हजार कोटी रुपये लागणार आहेत.
- यापैकी 50 टक्के म्हणजेच 3 हजार कोटी रुपये हे जागतिक बँकेकडून कर्ज म्हणून घेतले जाणार आहे, तसेच उर्वरित 50 टक्के रक्कम ही केंद्र सरकार देणार आहे.
- हरियाणा सरकारने मार्च 2020 मध्ये जल स्वतःचे संरक्षण आणि बळकटीकरण करण्यासाठी लागू केली, यासाठी राज्याला 2020-21 ते 24-25 या कालावधीसाठी जागतिक बँकेकडून 50 टक्के आर्थिक सहाय्य म्हणून 723 कोटी रुपये मिळाले आहेत.
Atal Bhujal Yojana 2024:योजनेचे महत्व
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “अटल भूजल योजना 2024” चे महत्व काय काय आहे?
Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) च्या माध्यमातून देशभरातील कमी झालेली भूजल पातळी वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. कमी झालेल्या भूजल पातळीमुळे देशभरातील शेतकरी बांधवांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठ्या अडचणी आणि पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या साठी केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) ही प्रभावीपणे पुढाकार घेत आहे.
अटल भूजल योजना 2024 च्या माध्यमातून पाणी व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा उपयोग करूण जमिनीत पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे नागरिक पाण्याचे व्यवस्थापन आणि संवर्धन करतील, जेणेकरून जमिनीतील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “अटल भूजल योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Atal Bhujal Yojana 2024:FAQ’s
Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?
अटल भूजल योजना 2024 ची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे.
Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) ची सुरुवात कधी करण्यात आली?
सदर योजनेची सुरुवात 30 डिसेंबर 2019 रोजी करण्यात आली.
Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?
देशातील भूजल पातळी वाढविणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे
Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) ही योजना कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये सुरू आहे?
अटल भूजल योजना 2024 ही महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सुरू आहे.
Atal Bhujal Yojana 2024 (अटल भूजल योजना 2024) साठी किती निधी लागणार आहे?
सदर योजनेसाठी एकूण 6 हजार कोटी रुपये लागणार आहेत.