PM Poshan Shakti Nirman Yojana In Marathi 2024
PM Poshan Shakti Nirman Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात PM Poshan Shakti Nirman Yojana 2024 (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशभरातील मुलांना पौष्टिक आहार मिळणार आहे.
चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे ही योजना? काय आहेत या योजनेचे मुख्य उद्देश? या योजनेची वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास कोण कोण पात्र आहे? या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? त्याचबरोबर या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
आपल्या देशातील नागरिकांच्या विकासासाठी तसेच त्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार विविध प्रकारच्या योजना आपल्या देशभरात राबवत असते. त्याचबरोबर आपल्या देशातील मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने केंद्र सरकार सातत्याने नवनवीन योजना राबवत असते. अशातच केंद्र सरकारने आपल्या देशातील मुलांना पोषक आणि सकस आहार मिळावा यासाठी पुढाकार घेतला आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024 थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | PM Poshan Shakti Nirman Yojana 2024 (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे |
योजनेचे उद्घाटन कोणी केले | केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर |
योजनेचे मुख्य उद्देश | आपल्या देशातील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे |
योजनेचे लाभार्थी | देशभरातील सर्व विद्यार्थी |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | या योजनेच्या माध्यमातून मुलांना पोषक आहार दिला जाणार आहे |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
PM Poshan Shakti Nirman Yojana 2024 नक्की काय आहे?
आपल्या देशातील मुलांना पोषक आहार मिळावा तसेच त्यांचे आरोग्य सुधारावे यासाठी केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच PM Poshan Shakti Nirman Yojana 2024 (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024) होय. यापूर्वी ही योजना मध्यान भोजन योजना म्हणून ओळखली जात होती. या योजनेच्या माध्यमातून 2021 ते 2026 पर्यंत देशभरातील शाळांमध्ये मुलांना गरम जेवण पुरविले जात आहे.
केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या PM Poshan Shakti Nirman Yojana 2024 (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024) च्या माध्यमातून सरकारी आणि अनुदानित शाळेतील 11 कोटीपेक्षा जास्त मुलांना लाभ मिळणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी 1,30,794 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
PM Poshan Shakti Nirman Yojana 2024:योजनेचे उद्देश
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024” चे उद्देश काय काय आहेत?
- आपल्या देशातील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे हे या PM Poshan Shakti Nirman Yojana 2024 (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024) चे मुख्य उद्देश आहे.
- त्याचबरोबर देशभरातील विद्यार्थ्यांना पोषक आणि सकस आहार पुरविणे.
- विद्यार्थ्यांचा सामाजिक आणि मानसिक विकास करणे.
- या योजनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे हे या देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
- या योजनेसाठी 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी म्हणजेच पाच वर्षासाठी 1.31 ट्रिलियन रुपयांचा आर्थिक निधी राखीव ठेवण्यात आल आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे पोषण होण्यास नक्कीच हातभार लागणार आहे.
- अलीकडील काळात केंद्र सरकारने अन्न मंत्रालयाद्वारे अनुदानित अन्नधान्याच्या तरतुदीसाठी 45 हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त खर्चाचे वाटप केले आहे.
- 2020-21 मध्ये सरकारने या उपक्रमात 24 हजार 400 कोटी रुपये आर्थिक गुंतवणूक केली होती. यामध्ये 11 हजार 500 कोटी रुपयांची विशेषतः अन्नासाठी तरतूद करण्यात आली आहे.
PM Poshan Shakti Nirman Yojana 2024:योजनेचे फायदे
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024” चे फायदे काय काय आहेत?
- प्रति मूल प्रति दिन पोषण आहार
- प्राथमिक :- कॅलरी 450, प्रोटीन 12 ग्रॅम
- उच्च प्राथमिक :- कॅलरी 700, प्रोटीन 20 ग्रॅम
- प्रति मूल प्रति दिन भोजन
- प्राथमिक :- अन्नधान्य 100 ग्रॅम, डाळ 20 ग्रॅम, भाजी 50 ग्रॅम, तेल 5 ग्रॅम
- उच्च प्राथमिक :- अन्नधान्य 150 ग्रॅम, डाळी 30 ग्रॅम, तेल 7.5 ग्रॅम भाजीपाला, मीठ, आणि मसाले आवश्यकतेनुसार.
PM Poshan Shakti Nirman Yojana 2024:पाककृती
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024” माध्यमातून एकूण 15 प्रकारच्या पाककृती स्वरूपात पोषण आहार देण्यास मान्यता दिली आहे.
- व्हेजिटेबल पुलाव
- मसालेभात
- मटार पुलाव
- दाल खिचडी
- चवळी खिचडी
- चना पुलाव
- सोयाबीन पुलाव
- मसूरी पुलाव
- अंडा पुलाव
- मोड आलेल्या मटकीची उसळ
- गोड खिचडी
- मूग, शेवगा वरण भात
- तांदळाची खीर
- नाचणीचे सत्व
- मोड आलेले कडधान्य
PM Poshan Shakti Nirman Yojana 2024:आवश्यक पात्रता
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024” साठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे?
- PM Poshan Shakti Nirman Yojana 2024 (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार विद्यार्थी हा भारत देशाचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महत्वाचं म्हणजे अर्जदार हा सरकारी किंवा सरकारी मान्यता प्राप्त शाळेमध्ये प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक पहिली ते आठवी मध्ये शिकत असणे आवश्यक आहे.
PM Poshan Shakti Nirman Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे?
- आधार कार्ड
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- वयाचे प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
PM Poshan Shakti Nirman Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
मित्रांनो, PM Poshan Shakti Nirman Yojana 2024 (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024) साठी कुठलीही अर्ज प्रक्रिया नाही. ही योजना सरकारी आणि निमसरकारी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलांसाठी लागू आहे. अशा शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
PM Poshan Shakti Nirman Yojana 2024:FAQ’s
PM Poshan Shakti Nirman Yojana 2024 (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024 ची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे.
PM Poshan Shakti Nirman Yojana 2024 (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024) चे उद्घाटन कोणी केले?
सदर योजनेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे.
PM Poshan Shakti Nirman Yojana 2024 (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?
आपल्या देशातील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
PM Poshan Shakti Nirman Yojana 2024 (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?
देशभरातील सर्व विद्यार्थी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024 च्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.