CBSE Udaan Scholarship 2024:मुलींना इंजिनीयर बनविण्यासाठी आवश्यक ती मदत मिळणार!!

CBSE Udaan Scholarship In Marathi 2024

CBSE Udaan Scholarship 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात CBSE Udaan Scholarship 2024 (CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना देशभरातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.

चला तर मग जाणून घेऊया ही योजना नक्की काय आहे? या योजनेची सुरूवात कोणी आणि कधी केली आहे? या योजनेचे मुख्य उद्देश काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून कोण लाभ मिळवू शकणार आहे? या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

आपल्याला माहितीच आहे की, केंद्र आणि राज्य सरकार आपल्या देशभरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सातत्याने नवनवीन योजना राबवत असते. त्यातीलच एक योजना म्हणजे CBSE Udaan Scholarship 2024 (CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024) होय. CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024 ही मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.

CBSE म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने भारत सरकारच्या मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयाच्या सहाय्याने ही योजना सुरू करण्यात आली आहे. आपल्या देशातील इंजिनिअरिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने 14 नोव्हेंबर 2014 रोजी CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024 सुरू करण्यात आली.

आपल्या देशातील मुलींना सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांना इंजिनिअरिंग संस्थांमध्ये प्रवेश देण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाणार आहे. शालेय स्तरावर विज्ञान व गणिताचे शिक्षण आणि शिकवणी समृद्ध करण्याचा प्रयत्न या योजनेअंतर्गत सीबीएसई चा आहे. या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना वर्चुअल विकेंड संपर्क वर्ग, विनामूल्य ऑनलाइन स्टडी मटेरियल उपलब्ध करून देणे हा आहे.

CBSE Udaan Scholarship 2024

CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावCBSE Udaan Scholarship 2024
(CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीकेंद्र सरकारद्वारे या योजनेची सुरूवात करण्यात आली आहे
योजनेची सुरुवात कधी करण्यात आली14 नोव्हेंबर 2014
योजनेचे मुख्य उद्देशदेशभरातील विद्यार्थी मुलींचा इंजिनियरिंग आणि टेक्निकल इन्स्टिट्यूशन मध्ये सहभाग वाढविणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
योजनेचे लाभार्थीइयत्ता 11 वी चे विद्यार्थी
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

CBSE Udaan Scholarship 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “CBSE Udaan Scholarship 2024 (CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024)” चे मुख्य उद्देश काय आहे?

  • देशभरातील मुलींना इंजिनियरिंग करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • मुलींचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे.
  • मुलींना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • इंजिनियरिंग आणि टेक्निकल इन्स्टिट्यूशन मधील मुलींमध्ये मुलींचा सहभाग वाढविणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

CBSE Udaan Scholarship 2024:योजनेचे फायदे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “CBSE Udaan Scholarship 2024 (CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024)” चे फायदे काय काय आहेत?

  • या योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थिनींसाठी विडियो टिटोरीयल आणि स्टडी मटेरियल ऑनलाइन आणि ऑफलाइन अभ्यासाचे साहित्य दिले जाणार आहे.
  • महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन सुविधा असणार आहे.
  • निवड झालेल्या विद्यार्थ्यांची वेळेवर प्रगतीचे निरीक्षण आणि फीडबॅक दिले जाणार आहेत.
  • 60 आरक्षित शहरांमध्ये केंद्रावर वर्चूअल संपर्क वर्ग राबविण्यात येणार आहेत.

CBSE Udaan Scholarship 2024:योजनेचे लाभार्थी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “CBSE Udaan Scholarship 2024 (CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024)” चे लाभार्थी कोण आहेत?

  • या योजनेच्या माध्यमातून इयत्ता 11 वी च्या विद्यार्थिनी लाभ घेण्यास पात्र आहेत.

CBSE Udaan Scholarship 2024:आरक्षण

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “CBSE Udaan Scholarship 2024 (CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024)” च्या माध्यमातून कोणाला आणि किती आरक्षण मिळणार आहे?

  • अनुसूचित जाती :- 15 टक्के आरक्षण
  • अनुसूचित जमाती :- 7.5 टक्के आरक्षण
  • इतर प्रवर्गातील ओबीसीसाठी :- 27 टक्के आरक्षण
  • सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी साठी :- 3 टक्के आरक्षण
CBSE Udaan Scholarship 2024

CBSE Udaan Scholarship 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “CBSE Udaan Scholarship 2024 (CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024)” साठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे? कोणत्या कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत?

  • सदर योजनेचा लाभ हा केवळ मुलींनाच घेता येणार आहे.
  • महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थिनी ही 11 वी मध्ये असणे आवश्यक आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून मुलांना लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार विद्यार्थिनीने इयत्ता 11 वी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विज्ञान शाखेतील विषयांची निवड केलेली असावी.
  • त्याचबरोबर अर्जदार विद्यार्थिनीचे इयत्ता 11 वी चे शिक्षण हे खाजगी शाळेमध्ये झालेले असावे.
  • अर्जदार विद्यार्थिनीला इयत्ता 10 वी मध्ये कमीत कमी 70 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • आणि अर्जदार विद्यार्थिनीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

CBSE Udaan Scholarship 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “CBSE Udaan Scholarship 2024 (CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024)” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • आरक्षण प्रमाणपत्र लागू असल्यास इयत्ता दहावीची मार्कशीट हमीपत्र

CBSE Udaan Scholarship 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “CBSE Udaan Scholarship 2024 (CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024)” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024 च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
  • त्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल.
  • रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सदर योजनेचा अर्ज दिसेल.
  • त्यामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक आणि अचूकपद्धतीने भरावी लागणार आहे.
  • त्याचबरोबर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायचा आहे. अर्जात भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती अचूक असल्यास तुम्हाला सबमीट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024 ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “CBSE Udaan Scholarship 2024 (CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024)” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४लेक लाडकी योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024
विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024
महामेष योजना 2024मध केंद्र योजना 2024
महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024
गोदाम अनुदान योजना 2024छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना 2024
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024आयुष्मान भारत विमा योजना 2024
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024
CBSE Udaan Scholarship 2024:FAQ’s
CBSE Udaan Scholarship 2024 (CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024) ची सुरुवात कोणी आणि कधी केली?

CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024 ची सुरुवात केंद्र सरकारने 14 नोव्हेंबर 2014 रोजी केली.

CBSE Udaan Scholarship 2024 (CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

देशभरातील विद्यार्थी मुलींचा इंजिनियरिंग आणि टेक्निकल इन्स्टिट्यूशन मध्ये सहभाग वाढविणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

CBSE Udaan Scholarship 2024 (CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

इयत्ता 11 वी चे विद्यार्थी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.

CBSE Udaan Scholarship 2024 (CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

CBSE उडान स्कॉलरशिप योजना 2024 चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.