Majhi Ladki Bahin Yojana 2024 Update In Marathi
Majhi Ladki Bahin Yojana 2024 Update: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या “माझी लाडकी बहिण योजना 2024” बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. राज्य सरकारने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेली ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना ठरली आहे. या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून झाली आहे.
मित्रांनो, आपल्या माहितीच आहे की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने जुलै ते नोव्हेंबर पर्यंत एकूण 5 हप्ते आत्तापर्यंत महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. प्रत्येक महिन्याला 1,500/- रुपये असे एकूण आत्तापर्यंत 7,500/- रुपये महिलांच्या खात्यात जमा केले गेले आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती की, जर तुम्ही आम्हाला जास्त बहुमताने निवडून दिले दर आम्ही माझी लाडकी बहीण योजनेचा 1,500/- रुपयांचा हप्ता हा 2,100/- रुपये करू आणि 2,100/- रुपयांचा हप्ता 3,000/- रुपये करू. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी जितकी ताकद आम्हाला देतील, तितका जास्त हप्ता आम्ही वाढवू असं वचन त्यांनी दिलेलं होतं.
त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की 288 पैकी 234 जागा निवडून आल्यामुळे आता माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 3,000/- रुपयांचा असेल, तसेच शिंदेंनी सातारा या ठिकाणी जी सभा होती त्याठिकाणी वचन दिले होते की आम्ही या योजनेचा हप्ता 3,000/- रुपये करू, मात्र सर्वच अपेक्षा आता फेल ठरल्या आहेत.
Majhi Ladki Bahin Yojana 2024 Update या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 3,000/- रुपये नाही तर 2,100/- रुपयांचा हप्ता मिळणार आहे. अशातच महाराष्ट्र राज्य सरकारने एक नवीन अपडेट जाहीर केलं आहे आणि अतीशय महत्वाची सूचना महिलांना देण्यात आली आहे की ज्या महिलांकडे ही दोन कागदपत्रे असतील त्याच महिलांना या योजनेचा पुढील हप्ता दिला जाईल.
Majhi Ladki Bahin Yojana 2024 Update: माझी लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे
माझी लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते मिळविण्यासाठी लाभार्थी महिलांकडे ही दोन कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावे)
- लाभार्थी महिलांनी इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ न घेतल्याचे हमीपत्र असणे आवश्यक आहे.
Majhi Ladki Bahin Yojana 2024 Update आत्तापर्यंत महिलांच्या खात्यात जुलै 2024 ते नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 5 हप्ते जमा करण्यात आले आहेत. त्या पाच हप्त्याची रक्कम 7,500/- रुपये होते. त्याचबरोबर डिसेंबर 2024 चा हप्ता हा 2,100/- रुपयांचा असणार आहे, जो या पूर्वीच्या 1500 रुपयांच्या तुलनेत वाढवलेला आहे. लाभार्थी महिलांकडे वरील दिलेली दोन्ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
📢Majhi Ladki Bahin Yojana 2024 Update माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाच्या या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकताय.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “माझी लाडकी बहीण योजना 2024“ ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. ज्या महिलांकडे वरील दिलेली दोन कागदपत्रे असतील त्याच महिलांना या योजनेच्या माध्यमातून 2,100/- रुपये मिळणार आहेत. तुम्ही ही माहिती आपल्या जवळील नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करण्यास विसरू नका. त्याचबरोबर अशाच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या द महारोजगार डॉट कॉम या वेबसाइटला वेळोवेळी भेट देत रहा.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️