Ladki Bahin Yojana 2026 April Update
Ladki Bahin Yojana 2026 April Update: महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजना अंतर्गत मार्च व एप्रिल 2026 महिन्याच्या हप्त्याबाबत सर्वात मोठी अपडेट जाहीर झाली असून, नेमके पैसे कधी येणार आणि कोणाला मिळणार याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.
राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना आता प्रश्न पडला आहे की मार्च व एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र येणार आहे का? मार्च महिना संपून गेला आहे आणि एप्रिल चा दूसरा आठवडा सुरू आहे तरी देखील लाडक्या बहीणींच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहीणींच्या मनात असे अनेक प्रश्न सध्या निर्माण होत आहेत.

Ladki Bahin Yojana 2026 April Update मार्च-एप्रिल महिन्याचे नवीन अपडेट
लाडकी बहीण योजना 2026 अंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते, जी रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट डीबीटी मार्फत जमा करण्यात येते. महत्त्वाचं म्हणजे मार्च आणि एप्रिल 2026 महिन्याच्या हफ्त्याचे एकूण 3000 रुपये एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा राज्यभर सुरू आहे. तसेच ही रक्कम चालू असलेल्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस म्हणजेच शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अजून देखील कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. शासनामार्फत लवकरच याबाबत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana 2026 April Update ई-केवायसी संदर्भातील नवीन अपडेट
लाडक्या बहीणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजेच, ई-केवायसीसाठी शासनाने 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना शासनाकडून दिलासा मिळणार आहे. तसेच 30 एप्रिल पर्यंत ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना या योजनेच्या माध्यमातून कोणताही लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला भगिनी निकषात बसत नाही त्यांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करत असताना ज्या बहीणींकडून चुका झाल्या आहेत त्यांनी या संधीचे सोनं करण आवश्यक आहे, अन्यथा 30 एप्रिल च्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही, तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार नाहीत कृपया याची नोंद घ्या.
Ladki Bahin Yojana 2026 April Update: लाभ
- लाडक्या बहीणींच्या खात्यात दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत
- महिलांना आर्थिक मदत मिळते
- महिला आर्थिक स्वावलंबी बनतात
- कुटुंबाच्या खर्चाला देखील मदत मिळते
Ladki Bahin Yojana 2026 April Update: पात्रता
- महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक
- वयोमर्यादा – 21 ते 65 दरम्यान असावे
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे
- राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला
- लाभार्थी महिलेचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक
Ladki Bahin Yojana 2026 April Update:महत्त्वाचे अपडेट
लाडक्या बहिणींनो आपल्याला माहितीच आहे की, गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे महिन्याच्या अगदी शेवटच्या आठवड्यात दिले जात आहेत, त्यामुळे या महिन्यातदेखील मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे शेवटच्या आठवड्यात एकत्र येण्याची शक्यता आहे.
📢Ladki Bahin Yojana 2026 April Update माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाच्या या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकताय.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला Ladki Bahin Yojana 2026 April Update “माझी लाडकी बहीण योजना“ ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तुम्ही ही माहिती आपल्या जवळील नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करण्यास विसरू नका. त्याचबरोबर अशाच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या द महारोजगार डॉट कॉम या वेबसाइटला वेळोवेळी भेट देत रहा.
धन्यवाद !!
Ladki Bahin Yojana 2026 April Update:FAQs
Ladki Bahin Yojana चे पैसे कधी येतात?
लाडकी बहीण योजनेचे पैसे दरमहा टप्प्याटप्प्याने जमा केले जातात.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून किती पैसे मिळतात?
दरमहा 1500 रुपये मिळतात.
एप्रिल 2026 चे पैसे आले नाहीत तर काय करावे?
काही दिवस वाट पहावी किंवा सबंधित कार्यालयात संपर्क साधावा.
Ladki Bahin Yojana च्या माध्यमातून मिळणारे पैसे जमा झाले की नाही कसे चेक करायचे?
मोबाईलवर आलेला एसएमएस तसेच बँकेत जाऊन देखील तपासू शकता.
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
