Apang Pension Yojana 2024:अपंग व्यक्तींना मिळणार दरमहा पेन्शन!!

Apang Pension Yojana In Marathi 2024

Apang Pension Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Apang Pension Yojana 2024 (अपंग पेन्शन योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या राज्यातील अपंग व्यक्तींसाठी ही योजना सुरू केली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही योजना? योजनेची सुरुवात कोणी केली? योजनेचे मुख्य उद्देश काय काय आहेत? योजनेचे वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून कोण कोण लाभ मिळवू शकणार आहे? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

आपल्या महाराष्ट्र राज्यातील अपंग /दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राज्य सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते. जेणेकरून राज्यातील अपंग व्यक्तींना देखील ताठ मानेने जगता यावे, त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असते. त्याचबरोबर आपल्या राज्यातील अपंग व्यक्तींच्या एकूणच सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार विविध योजनांच्या सहाय्याने त्यांना मदत करत असते. त्यातीलच एक योजना आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत सुरू केली आहे, ती म्हणजेच Apang Pension Yojana 2024 (अपंग पेन्शन योजना 2024) होय.

मित्रांनो, आपण पाहतच आहोत की अपंग व्यक्तींना रोजगाराच्या संधी सहजासहजी मिळत नाहीत, त्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. अपंग व्यक्तींना आपल्या गरजा किंवा स्वतःची कामे देखील सहजरीत्या करणे शक्य होत नाही. अपंग व्यक्ती देखील आपल्याच समाजाचा भाग आहे, त्यांनाही आपल्या समाजात आदराने तसेच ताठ मानेने जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यांनाही सर्वसामान्य माणसाप्रमाणे भावना आहेत, त्यांचीही काहीतरी स्वप्ने आहेत. मात्र आपल्याच समाजातील नागरिक त्यांना समाजातील घटक समजत नाहीत.

मित्रांनो, एखादा व्यक्ती जन्मताच अपंग असतो तर काही व्यक्ती अपघातात किंवा इतर अडचणींमुळे अपंग होतात. आता हे सर्व काही त्यांच्या स्वतःच्या हातात नसते अशा अपंग नागरिकांना आपल्या समाजाचा घटक न समजणे हे कितीपत योग्य आहे, हे योग्य नाही. म्हणूनच आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने Apang Pension Yojana 2024 (अपंग पेन्शन योजना 2024) सुरू करण्याचा अतीशय योग्य असा निर्णय घेतला आहे.

Apang Pension Yojana 2024

अपंग पेन्शन योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावApang Pension Yojana 2024
(अपंग पेन्शन योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य
योजनेचे मुख्य उद्देशराज्यातील अपंग/दिव्यांग व्यक्तींचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे
योजनेचे लाभार्थीराज्यातील अपंग/दिव्यांग व्यक्ती
योजनेच्या माध्यमातून दिला जाणारा लाभदरमहा 600/- रुपये ते 1,000/- रुपये पेन्शन
अर्ज अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन /ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️
अपंग पेन्शन योजना 2024 अर्ज➡️येथे क्लिक करा⬅️

Apang Pension Yojana 2024 नक्की काय आहे?

आपल्या महाराष्ट्र राज्यातील अपंग/दिव्यांग व्यक्तींना समाजात ताठ मानेने जगता यावे, त्याचबरोबर अपंग व्यक्तींचा आर्थिक आणि सामाजिक विकास घडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सुरू करण्यात आलेली Apang Pension Yojana 2024 (अपंग पेन्शन योजना 2024) ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.

या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील अपंग/दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी बनतील. तसेच त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास देखील होणार आहे. त्यांना आता आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. महत्वाचं म्हणजे Apang Pension Yojana 2024 (अपंग पेन्शन योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळाल्यानंतर अपंग व्यक्ती सशक्त व आत्मनिर्भर बनतील.

Apang Pension Yojana 2024 (अपंग पेन्शन योजना 2024) च्या माध्यमातून आपल्या राज्यातील अपंग/दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा 600/- ते 1000/- रुपये पेन्शन दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत सुरू झालेल्या या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अपंग व्यक्तींना आर्थिक आणि मानसिक जीवनमान सुधारण्यास नक्कीच हातभार लागणार आहे. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून अपंग व्यक्तींच्या जीवनातील अंधकार दूर होण्यास मदत होईल, आणि ते पुन्हा समाजात आनंदाने तसेच ताठ मानेने जगण्याचा नक्कीच प्रयत्न करतील.

Apang Pension Yojana 2024:योजनेचे मुख्य उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “अपंग पेन्शन योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील अपंग व्यक्तींचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे.
  • राज्यातील अपंगांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • त्याचबरोबर त्यांना स्वावलंबी बनविणे.
  • अपंग पेन्शन योजना 2024 च्या माध्यमातून दरमहा आर्थिक सहाय्य करणे.
  • सदर योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील अपंग मुलांना मोफत शिक्षण देणे.
  • अपंग व्यक्तींना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये म्हणून दरमहा पेन्शन स्वरूपात आर्थिक मदत करणे.

Apang Pension Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “अपंग पेन्शन योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात आलेली Apang Pension Yojana 2024 (अपंग पेन्शन योजना 2024) ही अतीशय महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अपंग व्यक्तींचा आर्थिक आणि सामाजिक विकास होणार आहे.
  • त्याचबरोबर त्यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी दरमहा 600/- ते 1000/- रुपये पेन्शन दिली जाणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून त्यांना आपल्या समाजात ताठ मानेने जगता येईल.
  • राज्यातील अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
  • या योजनेच्या सहाय्याने अपंग व्यक्ती आपले जीवन गुण्यागोविंदाने जगतील.
  • महत्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत राज्यातील अपंग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध होतील, त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील.
  • सदर योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभाची रक्कम ही लाभार्थी व्यक्तीच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Apang Pension Yojana 2024:लाभार्थी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “अपंग पेन्शन योजना 2024” चे लाभार्थी कोण आहे?

  • सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील अपंग/दिव्यांग व्यक्तींनाच लाभ दिला जाणार आहे.
Apang Pension Yojana 2024

Apang Pension Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “अपंग पेन्शन योजना 2024” साठी काय काय पात्रता? कोणत्या कोणत्या अटी व शर्ती आहेत?

  • Apang Pension Yojana 2024 (अपंग पेन्शन योजना 2024) चा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणारा अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती जर महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील असेल तर त्यास सदर योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार नाही.
  • त्याचबरोबर अर्जदार व्यक्ती हा कुठल्याही सरकारी कार्यालयात कार्यरत नसावा.
  • अर्जदार व्यक्ती हा अपंग असणे आवश्यक आहे.
  • तसेच अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 56 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अपंग व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 35 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • तसेच सदर योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवायचा असल्यास अर्जदार व्यक्तीला अर्ज सादर करताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी व्यक्ती 80 टक्के पेक्षा जास्त अपंग आहे, अशाच व्यक्तींना Apang Pension Yojana 2024 (अपंग पेन्शन योजना 2024) चा लाभ घेता येईल.

Apang Pension Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “अपंग पेन्शन योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
Apang Pension Yojana 2024

Apang Pension Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “अपंग पेन्शन योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑफलाइन अर्ज पद्धत

  • Apang Pension Yojana 2024 (अपंग पेन्शन योजना 2024) चा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम आपल्या जवळील जिल्हाधिकारी कार्यालयात /तहसील कार्यालयात किंवा तलाठी कार्यालयात जावे लागणार आहे.
  • तिथे गेल्यानंतर अपंग पेन्शन योजना 2024 चा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्ज घेतल्यानंतर त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  • अर्जात संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर त्यासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावी लागतील.
  • आता तुम्हाला भरलेला अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायचा आहे, त्यामध्ये भरलेली माहिती अचूक आहे की नाही एकदा खात्री करणे आवश्यक आहे.
  • अर्जात भरलेली संपूर्ण माहिती अचूक असल्यास सदर अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावा लागेल.
  • तुम्ही अर्ज जमा केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल.
  • तुम्ही पात्र ठरल्यास सदर योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ दिला जाईल.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची अपंग पेन्शन योजना 2024 ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “अपंग पेन्शन योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
मोफत शौचालय योजना 2024ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024
विहीर अनुदान योजना २०२४ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
शेळी पालन योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
कन्या वन समृद्धी योजना 2024अटल बांबू समृद्धी योजना 2024
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024पंचायत समिती योजना 2024
अपंग बस सवलत योजना 2024बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024
आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024बाल संगोपन योजना 2024
Apang Pension Yojana 2024:FAQ’s
Apang Pension Yojana 2024 (अपंग पेन्शन योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने Apang Pension Yojana 2024 (अपंग पेन्शन योजना 2024) ची सुरुवात केली आहे.

Apang Pension Yojana 2024 (अपंग पेन्शन योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

राज्यातील अपंग/दिव्यांग व्यक्तींचा आर्थिक आणि समाजिक विकास करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Apang Pension Yojana 2024 (अपंग पेन्शन योजना 2024) चे लाभार्थी कोण आहे?

सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींनाच दिला जाणार आहे.

Apang Pension Yojana 2024 (अपंग पेन्शन योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील अपंग व्यक्तींना दरमहा 600/- ते 1000/- रुपये पेन्शन दिली जाणार आहे.

Apang Pension Yojana 2024 (अपंग पेन्शन योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

Apang Pension Yojana 2024 (अपंग पेन्शन योजना 2024) चा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.