Maharashtra Swadhar Yojana In Marathi 2024
Maharashtra Swadhar Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Maharashtra Swadhar Yojana 2024 (महाराष्ट्र स्वाधार योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जसे की काय आहे ही योजना? कोण कोण महाराष्ट्र स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे? या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? या योजनेचे मुख्य उद्देश काय आहे? काय काय अटी व शर्ती आहेत? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? तसेच या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देणार आहोत.
Maharashtra Swadhar Yojana 2024 (महाराष्ट्र स्वाधार योजना 2024) अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता 11 वी, 12 वी त्याचबरोबर व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी मित्रांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधांसाठी शासनामार्फत आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंबे हे आपले जीवन दारिद्र्य रेषेखाली जगत आहेत. अशा कुटुंबांची आर्थिकस्थिती कमजोर असल्यामुळे त्यांच्या मुलांना इच्छा असून देखील शिक्षण पूर्ण करता येत नाही. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या गरीब असल्यामुळे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना बाहेर शिक्षणासाठी देखील जाता येत नाही. त्यांना इतर ठिकाणी स्वतःच्या राहण्याची सोय करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात, एवढा खर्च त्यांना परवडणारा नसतो. त्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
मित्रांनो, महाराष्ट्र स्वाधार योजनेचे पूर्ण नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून मिळणारे आर्थिक सहाय्य हे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे Maharashtra Swadhar Yojana 2024 (महाराष्ट्र स्वाधार योजना 2024) साठी विद्यार्थ्यांना 10 वी, 12 वी, पदवी त्याचबरोबर पदवीका परीक्षेमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षांमध्ये 60 टक्के पेक्षा अधिक गुण असतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
आपल्या राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत Maharashtra Swadhar Yojana 2024 (महाराष्ट्र स्वाधार योजना 2024) राबविण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील 11 वी, 12 वी तसेच व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 65,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
महाराष्ट्र स्वाधार योजना 2024:थोडक्यात माहिती पाहूया
योजनेचे नाव | Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana 2024 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | महाराष्ट्र सरकार |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
विभाग | समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य |
योजनेचे मुख्य उद्देश | राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे |
योजनेचे लाभार्थी | आपल्या राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
महाराष्ट्र स्वाधार योजना 2024 अर्ज | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Maharashtra Swadhar Yojana 2024:योजनेचे उद्देश
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2024” चे उद्देश काय आहे?
- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता 11 वी व 12 वी त्याचप्रमाणे व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana 2024 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2024) च्या माध्यमातून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
- आपल्या महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब घटकांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
- तसेच राज्यातील जे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आपल्या घरापासून लाभ दुसऱ्या शहरात राहत आहेत, अशा विद्यार्थी मित्रांना आर्थिक सहाय्य करून अन्य शैक्षणिक सुविधा पुरवणे.
- राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रयत्नशील राहणे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्याचा विकास घडवून आणणे.
Maharashtra Swadhar Yojana 2024: योजनेची वैशिष्ट्ये
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र स्वाधार योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?
- Maharashtra Swadhar Yojana 2024 (महाराष्ट्र स्वाधार योजना 2024) ही महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेली एक अतीशय महत्वाची योजना आहे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असे विद्यार्थी जे उच्चशिक्षण घेण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु त्यांच्याकडे उच्चशिक्षणासाठी आवश्यक असणारा पैसा जवळ नसल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
- आणि महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून मिळणारे आर्थिक सहाय्य हे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येणार आहे.
- आपल्या राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Maharashtra Swadhar Yojana 2024 (महाराष्ट्र स्वाधार योजना 2024) ही अतीशय फायद्याची योजना ठरणार आहे.
Maharashtra Swadhar Yojana 2024:किती अनुदान मिळणार
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र स्वाधार योजना 2024” च्या माध्यमातून कोणाला किती अनुदान मिळणार?
➡️ | पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी | महसूल विभागीय शहर व वर्ग मनपा शहरातील विद्यार्थ्यांसाठी | उर्वरित शहरांसाठी |
---|---|---|---|
जेवणासाठी (वार्षिक) | 32 हजार रुपये | 28 हजार रुपये | 25 हजार रुपये |
राहण्यासाठी (वार्षिक) | 20 हजार रुपये | 15 हजार रुपये | 12 हजार रुपये |
उदरनिर्वाहासाठी (वार्षिक) | 8 हजार रुपये | 8 हजार रुपये | 6 हजार रुपये |
एकूण (वार्षिक) | 60 हजार रुपये | 51 हजार रुपये | 43 हजार रुपये |
- या व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी 5 हजार रुपये दिले जातील.
- त्याचप्रमाणे अन्य शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 2 हजार रुपये शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी अतिरिक्त स्वरूपात दिली जाणार आहे.
Maharashtra Swadhar Yojana 2024: योजनेचे लाभार्थी
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र स्वाधार योजना 2024” साठी लाभार्थी कोण कोण आहेत?
- Maharashtra Swadhar Yojana 2024 (महाराष्ट्र स्वाधार योजना 2024) चा लाभ घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील 11 वी/12 वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणारे विद्यार्थी पात्र आहेत.
Maharashtra Swadhar Yojana 2024: योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र स्वाधार योजना 2024” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?
- सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जेवणासाठी, राहण्यासाठी तसेच उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्वाधार योजना 2024 च्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे त्यांचे स्वतःचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून भविष्यात चांगली नोकरी मिळवू शकतील.
- या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होईल.
- महत्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी 5 हजार रुपये पर्यंत अतिरिक्त रक्कम मिळणार आहे.
Maharashtra Swadhar Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2024” साठी कोण कोण पात्र आहे? काय काय अटी व शर्ती आहेत?
- सदर योजनेचा अर्ज करू इच्छिणारा अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अर्जदार विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
- इयत्ता 11 वी आणि 12 वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी मध्ये किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- तसेच 12 वी नंतर पदवी किंवा पदवीका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2024 मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल.
- तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा 50 टक्के इतकी असणार आहे.
- सदर योजनेसाठी अर्जदार विद्यार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार विद्यार्थ्याने राज्य शासन, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र तंत्रशिक्षण परिषद वा तत्सम सक्षम प्राधिकारी यांच्या मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
- त्याचबरोबर विद्यार्थी हा दुसऱ्या शहरात स्वतःचे शिक्षण पूर्ण करत असावा.
- जर अर्जदार विद्यार्थी हा आपल्या घराजवळ तसेच आपल्या शहरात शिक्षण घेत असले तर त्यास सदर योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या पूर्वीच्या काळात जर विद्यार्थ्याने केंद्र आणि राज्य शासनाच्या एखाद्या योजनेअंतर्गत निर्वाह योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यास या योजनेचा अर्ज करता येणार नाही, अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
Maharashtra Swadhar Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “महाराष्ट्र स्वाधार योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- सदर योजनेचा नुमणा अर्ज
- इयत्ता 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- बोनाफाईड प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- अर्जदार अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खात्याचा तपशील
- रहिवासी दाखला
- प्रतिज्ञापत्र
- अर्जदार विद्यार्थी शासकीय वस्तीगृहात राहत नसल्याचे प्रतिज्ञापत्र
- विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक किंवा प्राध्यापकाचे शिफारस प्रमाणपत्र
- अर्जदार विद्यार्थ्याचा फोटो
Maharashtra Swadhar Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया सदर योजनेचा अर्ज कसा करायचा आहे?
● ऑनलाइन अर्ज पद्धत :-
- अर्जदार विद्यार्थ्यास सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- तुमच्यासमोर होमपेज उघडल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुमचे यूजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगइन करावे लागेल.
- लॉगइन केल्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा अर्ज उघडेल, त्यामध्ये मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमीट करावा लागेल.
- अशा प्रकारे मित्रांनो, महाराष्ट्र स्वाधार योजना 2024 ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
● ऑफलाइन अर्ज पद्धत :-
- सदर योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास अर्जदार विद्यार्थ्यास आपल्या जवळील समाज कल्याण विभाग कार्यालयात जावे लागेल.
- कार्यालयातून तुम्हाला सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्ज घेतल्यानंतर त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे.
- नंतर त्यासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
- त्यानंतर अर्ज संबंधित कार्यालयात जमा करायचा आहे.
- अशा प्रकारे मित्रांनो, तुमची सदर योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “महाराष्ट्र स्वाधार योजना 2024“ ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Maharashtra Swadhar Yojana 2024:FAQ’s
Maharashtra Swadhar Yojana 2024 (महाराष्ट्र स्वाधार योजना 2024) ची सुरुवात कोणी केली आहे?
सदर योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य शासनाने केली आहे.
Maharashtra Swadhar Yojana 2024 (महाराष्ट्र स्वाधार योजना 2024) चे उद्देश काय आहे?
राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे.
Maharashtra Swadhar Yojana 2024 (महाराष्ट्र स्वाधार योजना 2024) चे लाभार्थी कोण कोण आहे?
या योजनेचा लाभ हा राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी घेऊ शकणार आहेत.
सदर योजनेचा अर्ज कसा करायचा आहे?
या योजनेचा अर्ज ऑनलाइन /ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.