Kishori Shakti Yojana In Marathi 2024
Kishori Shakti Yojana 2024: नमस्कार वाचक मित्रांनो, आपण या लेखात किशोरी शक्ती योजना 2024 ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या राज्यातील 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींच्या विकासासाठी किशोरी शक्ती योजना सुरू केली आहे. या लेखात आपण नक्की काय आहे ही योजना? या योजनेची सुरुवात कोणी आणि कधी केली? योजनेचे उद्देश काय आहेत? या योजनेची वैशिष्ट्ये काय काय आहेत? कोण कोण पात्र आहे? या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकणार आहे? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? या योजनेचा अर्ज काशाप्रकारे करायचा आहे? ई संपूर्ण माहिती खालील माहितीमध्ये पाहणार आहोत.
मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपल्या राज्यातील नागरिकांसाठी, राज्यातील शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, राज्यातील वृद्ध व्यक्तींसाठी तसेच राज्यातील तरुणांसाठी नवनवीन योजना राबविल्या जातात. जेणेकरून आपल्या राज्यातील नागरिकांचा आर्थिक विकास व्हावा, त्यांचा एकूणच सर्वांगीण विकास व्हावा. त्यातीलच एक योजना महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास व बालिका मंडळ विभागामार्फत राबविण्यात आली आहे, ती म्हणजे Kishori Shakti Yojana 2024 (किशोरी शक्ती योजना 2024) होय.
Kishori Shakti Yojana 2024 (किशोरी शक्ती योजना 2024) ची सुरुवात एकात्मिक बाल विकास व बलिकामंडळ यांच्या विभागामार्फत 15 मे 2004 रोजी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने आपली राज्यातील मुलींचे भविष्य उज्वल होण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आपली अरजयंतील किशोरवयीन मुलींना IFA टॅब्लेट तसेच deworming टॅब्लेट दिल्या जातात. या टॅब्लेट किशोरवयीन मुलींना 6 महिन्यातून एकदा देण्यात याव्यात असा राज्यशासनाने GR काढला आहे. किशोरी शक्ती योजनेअंतर्गत राज्यातील किशोरवयीन मुलींना महाराष्ट्र शासनामार्फत अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
त्याचबरोबर या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांकडून किशोरवयीन मुलींना पौष्टिक आहार देण्यात येतो. या पौष्टिक आहारामध्ये कडधान्य, भात, डाळी, सुकडी ई चा समावेश असणार आहे. मित्रांनो, महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील किशोरवयीन मुलींना या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आपल्या राज्यातील आदिवासी कुटुंबातील तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील किशोरवयीन मुलींना या योजनेच्या माध्यमातून नक्कीच लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील किशोरवयीन मुलींना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू करण्याचा अतीशय योग्य असा निर्णय घेतला आहे. किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील मुली सशक्त व आत्मनिर्भर बनणार आहेत. त्याचबरोबर किशोरवयीन मुलींना आपल्या स्वतःच्या पायावर कसे उभे राहता येईल, स्वतःची काळजी कशी घेता येईल,11 ते 18 वर्षे वयोगटात त्यांच्यातील होणाऱ्या शारीरिक बदलांना कसे सामोरे जाता येईल ई. संपूर्ण गोष्टींची माहिती तसेच सर्व प्रशिक्षण किशोरी शक्ती योजनेअंतर्गत दिले जाते.
राज्यातील 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी देखील प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दिले जाते. मित्रांनो, तुम्ही जर या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी इच्छुक असाल तर खालील संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचा, तसेच हा लेख आपल्या जवळील नातेवाईकांना आणि आपल्या मित्र – मैत्रिणींना शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळेल.
किशोरी शक्ती योजना 2024:थोडक्यात माहिती पाहूया
योजनेचे नाव | Kishori Shakti Yojana 2024 (किशोरी शक्ती योजना 2024) |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
विभाग | महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य |
योजनेची सुरुवात कोणी केली | महाराष्ट्र शासन |
योजनेची सुरुवात कधी झाली | 15 मे 2004 |
योजनेचे मुख्य उद्देश | राज्यातील किशोरवयीन मुलींना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी मोफत प्रशिक्षण देणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुली |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | मुलींना मोफत प्रशिक्षण |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Kishori Shakti Yojana 2024:योजनेचे उद्देश
चला तर मित्रांनो, पाहूया “किशोरी शक्ती योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?
- महाराष्ट्र राज्यातील 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना शाळा त्याचबरोबर महाविद्यालयात शिकत असणाऱ्या मुलींना आरोग्य, उत्तम आहार, घराचे व्यवस्थापन कसे करायचे ई गोष्टींचे मोफत प्रशिक्षण देणे. हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
- महत्वाचं म्हणजे मासिक पाळीच्या काळामध्ये वैयक्तिक स्वच्छतेची काळजी कशी घ्यायची याविषयी संपूर्ण माहिती देऊन किशोरवयीन मुलींना जागरूक करणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील किशोरवयीन मुलींना औपचारिक व अनौपचारिक रित्या शिक्षण पुरवले जाणार आहे.
- त्याचबरोबर आपल्या राज्यातील किशोरवयीन मुलींना नोकरी आणि व्यवसाय कसा करावा यासाठी देखील मोफत प्रशिक्षण या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
- Kishori Shakti Yojana 2024 (किशोरी शक्ती योजना 2024) च्या माध्यमातून राज्यातील मुलींचा शारीरिक आणि मानसिक विकास करणे.
- राज्यातील किशोरवयीन मुलींना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- किशोरवयीन मुलींना कोणताही चुकीचा निर्णय घेण्यापासून आळा बसेल त्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मुलींची निर्णय क्षमता वाढविणे हा देखील या योजनेचा उद्देश आहे.
- राज्यातील मुलींना त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना सामोरे कसे जाता येईल याचे प्रशिक्षण देणे.
Kishori Shakti Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये
चला तर मित्रांनो, पाहूया “किशोरी शक्ती योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?
- Kishori Shakti Yojana 2024 (किशोरी शक्ती योजना 2024) ही महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यातील किशोरवयीन मुलींच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेली अत्यंत महत्वाची योजना आहे.
- किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील तसहक दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींना आरोग्य, शिक्षणिक, स्वच्छता, रोजच्या जीवनात येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जाता येईल यांचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- किशोरी शक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या राज्यातील किशोरवयीन मुलींना महाराष्ट्र शासनाद्वारे दरवर्षी 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील किशोरवयीन मुलींचा शारीरिक आणि मानसिक विकास होण्यासाठी पौष्टिक आहार दिला जाणार आहे.
- आणि महत्वाचं म्हणजे 16 ते 18 वर्षे वयोगटातील शिक्षण सोडलेल्या मुलींना नोकरी आणि व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील किशोरवयीन मुलींचे भविष्य उज्वल होणार आहे.
Kishori Shakti Yojana 2024:लाभार्थी
चला तर मित्रांनो, पाहूया “किशोरी शक्ती योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील किशोरवयीन मुली या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
Kishori Shakti Yojana 2024:लाभ
चला तर मित्रांनो, पाहूया “किशोरी शक्ती योजना 2024” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?
- किशोरी शक्ती योजना 2024 च्या माध्यमातून राज्यातील किशोरवयीन मुलींना त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून पौष्टिक आहार दिला जातो.
- तसेच मुलींची वेळोवेळी रक्त तपासणी केली जाते.
- राज्यातील 11 ते 18 वर्षे वयोगतील किशोरवयीन मुलींना अंगणवाडी मार्फत 6 महिन्यातून एकदा जंतनाशक गोळ्या दिल्या जातात.
- त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून मुलींना आठवड्यातून एकदा लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात.
- महत्वाचं म्हणजे राज्यातील किशोरवयीन मुलींना आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंत खर्च राज्य सरकारमार्फत केला जातो.
- या योजनेच्या माध्यमातून मुलींना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यात येते.
- त्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरी व व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
Kishori Shakti Yojana 2024:पात्रता
चला तर मित्रांनो, पाहूया “किशोरी शक्ती योजना 2024” चा लाभ मिळविण्यासाठी काय काय पात्रता आवश्यक आहे?
- किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी इच्छुक असणारी अर्जदार मुलगी ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील मुलींना या योजनेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा लाभ दिला जाणार नाही.
- सदर योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील किशोरवयीन मुलींनाच मिळणार आहे.
- किशोरी शक्ती योजना 2024 अंतर्गत प्रशिक्षण घेण्यासाठी राज्यातील 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदार मुलीच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा सरकारी कर्मचारी नसावा.
- सदर योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच दिला जाईल.
Kishori Shakti Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे
चला तर मित्रांनो, पाहूया “किशोरी शक्ती योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- अर्जदार मुलीचे आधार कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- शाळेचे गुणपत्रक
- जातीचा दाखला
- शाळेचा दाखला
- लाइट बिल
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
Kishori Shakti Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मित्रांनो, पाहूया “किशोरी शक्ती योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठेही जावे लागणार नाही, कारण या योजनेसाठी पात्र असलेल्या मुलींचे अर्ज फक्त अंगणवाडी मधील सेविका करतील. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- यासाठी महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी केंद्रातील कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील.
- त्यामध्ये निवड झालेल्या मुलींची यादी ही महिला व बालविकास विभागाकडे देण्यात येईल.
- त्यानंतर विभागाद्वारे निवड झालेल्या किशोरवयीन मुलींची तपासणी केली जाईल. त्यामध्ये पात्र झाल्यास त्या मुलींची किशोरी शक्ती योजनेअंतर्गत नोंदणी केली जाईल.
- नोंदणी केल्यानंतर किशोरवयीन मुलींना किशोरी कार्ड देण्यात येईल.
- या कार्डचा वापर करून किशोरवयीन मुलींना सदर योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “किशोरी शक्ती योजना 2024“ ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Kishori Shakti Yojana 2024:FAQ’s
Kishori Shakti Yojana 2024 (किशोरी शक्ती योजना 2024) ची सुरूवात कोणी केली?
किशोरी शक्ती योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाने केली आहे.
Kishori Shakti Yojana 2024 (किशोरी शक्ती योजना 2024) ची सुरुवात कधी करण्यात आली?
सदर योजनेची सुरुवात 15 मे 2004 रोजी करण्यात आली आहे.
Kishori Shakti Yojana 2024 (किशोरी शक्ती योजना 2024) चे लाभार्थी कोण आहे?
किशोरी शक्ती योजना 2024 साठी महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील किशोरवयीन मुली अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
Kishori Shakti Yojana 2024 (किशोरी शक्ती योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे ?
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील किशोरवयीन मुलींना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.