NABARD Yojana Maharashtra 2024: दुग्धव्यवसाय करण्यासाठी मिळणार 50 टक्के अनुदान!!

Table of Contents

NABARD Yojana Maharashtra In Marathi 2024

NABARD Yojana Maharashtra 2024: नमस्कार मित्रांनो, आपल्या देशातील नागरिकांना स्वयंरोजगार मिळावा तसेच देशातील दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नाबार्ड योजना सुरू केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेची सविस्तर माहिती जसे की, काय आहे ही योजना? कोण कोण या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवू शकतो? या योजनेचे उद्देश काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून किती लाभ मिळणार आहे? या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे? या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यातील बहुतांश नागरिक शेती हा व्यवसाय करतात. त्याचबरोबर काही नागरिक शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा देखील व्यवसाय करतात. शेतीबरोबरच पशुपालन व्यवसाय हा शेतकऱ्यासाठी उपयुक्त ठरत आहे, या पशुपालनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत आहे. या शेतकऱ्यांना केंद्र शासनामार्फत राबविण्यात आलेल्या नाबार्ड योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केले जाते. नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रूलर डेव्हलपमेंट होय.

आपल्या भारत देशातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी नाबार्ड योजनेची घोषणा केली आहे. त्यांनी घोषणा करतेवेळी सांगितले की, या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशातील दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 30 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. जे की नाबार्ड योजनेच्या 90 हजार कोटी रुपयांच्या व्यतिरिक्त दिले जाणार आहेत.

NABARD Yojana Maharashtra 2024 (नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024) च्या माध्यमातून दिली जाणारी लाभाची रक्कम ही सहकारी बँकेमार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. देशातील जवळपास 3 कोटी शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध होऊन, त्यांना आर्थिक आणि सामाजिक विकास होणार आहे.

NABARD Yojana Maharashtra 2024

नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024:थोडक्यात माहिती

योजनेचे नावNABARD Yojana Maharashtra 2024
(नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024)
ही योजना कोणी सुरू केली आहेसदर योजना केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे
राज्यमहाराष्ट्र
या योजनेचे मुख्य उद्देश काय आहेआपल्या देशातील तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे
योजनेचे लाभार्थीशेतकरी, बिगर सरकारी संस्था, उद्योजक, कंपन्या
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभशेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे
योजनेची अर्ज प्रक्रियाऑनलाइन / ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

NABARD Yojana Maharashtra 2024:नक्की काय आहे?

नाबार्ड योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक असणारे डेअरी फार्म सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. NABARD Yojana Maharashtra 2024 (नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024) अंतर्गत मोठ्याप्रमाणात दूध उत्पादन करणे, आपल्या पशूंची म्हणजेच गायी व म्हशींची काळजी घेणे, दुधापासून अनेक पदार्थ बनविणे, ई सर्व गोष्टी मशीनवर आधारित असतात.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 12 लाख रुपयांचे कर्ज डेअरी फार्म सुरू करण्यासाठी त्याचबरोबर दूध देणारी जनावरे खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. जेणेकरून राज्यातील इतर नागरिक देखील या पशुसंवर्धनात सहभागी होतील आणि नाबार्ड योजनेचा लाभ मिळवतील.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जनावरे खरेदी करण्यासाठी 50 हजार ते 12 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय करण्यासाठी 10 ते 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे

नक्कीच या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पशुसंवर्धनाला चालना मिळणार आहे, त्याचबरोबर पशुपालन आणि दुग्धव्यवसायाला देखील गती मिळणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहात तर तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, याची सर्व माहिती आम्ही खाली दिली आहे. कृपया खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

NABARD Yojana Maharashtra 2024:उद्देश

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024” चे मुख्य उद्देश काय आहे?

  • राज्यातील दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे.
  • इतर शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना दुग्धव्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • पारंपारिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांना तंत्रज्ञान वापरण्यास मार्गदर्शन करणे हे देखील या योजनेची उद्देश आहे.
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • देशातील दूध उत्पादनाला चालना देणे.
  • नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024 च्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे.

NABARD Yojana Maharashtra 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024” ची वैशिष्ट्ये उद्देश काय आहे?

  • NABARD Yojana Maharashtra 2024 (नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024) ही केंद्र सरकारने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली अत्यंत महत्वाची योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी 12 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते.
  • तसेच या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

NABARD Yojana Maharashtra 2024:योजनेचे फायदे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024” चे फायदे काय काय आहेत?

  • या योजनेच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाला चालना मिळणार आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदराने कर्ज दिले जाते.
  • सदर योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाची परतफेड कालावधी 10 वर्षे ठेवण्यात आली आहे.
  • नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024 चा लाभ घेऊन लाभार्थी शेतकरी दुधाच्या उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी विवध प्रकारची उपकरणे खरेदी करू शकणार आहेत.
  • मशीन खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्यावर 25 टक्के भांडवलीसाठी सबसिडी मिळणार आहे.

NABARD Yojana Maharashtra 2024:लाभार्थी

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • शेतकरी
  • कंपन्या
  • उद्योजक
  • बिगर सरकारी संस्था
NABARD Yojana Maharashtra 2024

NABARD Yojana Maharashtra 2024:पात्रता

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024” चा लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता आवश्यक आहे?

  • सदर योजनेचा लाभ हा एका व्यक्तीला फक्त एकदाच मिळणार आहे.
  • नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024 साठी शेतकरी, बिगर सरकारी संस्था, उद्योजक, कंपन्या ई पात्र आहेत.
  • महत्वाचं म्हणजे नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत एका कुटुंबातील एक किंवा जास्त लोकांना लाभ मिळू शकतो, मात्र त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र युनिट उभारण्यासाठी मदत केली जाते. त्यामधील अंतर हे जवळपास 500 मीटर इतके असणे आवश्यक आहे.

NABARD Yojana Maharashtra 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • नाबार्ड योजनेचा अर्ज
  • रहिवासी दाखला
  • वार्षिक उत्पन्न दाखला
  • पशुपालन व्यवसाय नियोजनाची माहिती
  • अहवाल अर्ज नाबार्ड प्रायोजित बँकेकडून शेतकरी घेऊ शकतो
  • संबंधित अर्ज भरून झाल्यानंतर बँकेत जमा करणे आवश्यक आहे

NABARD Yojana Maharashtra 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024 चा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल.
  • त्यामध्ये तुम्हाला ‘Information Centre’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • त्यामध्ये तुम्हाला या योजनेअंतर्गत पीडीएफ डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज डाउनलोड करायचा आहे.
  • त्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • आणि सोबतच आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • आणि शेवटी ‘सबमीट’ या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024 ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

● ऑफलाइन अर्ज पद्धत :-

  • सर्वप्रथम अर्जदारास कोणत्या प्रकारचे डेअरी फार्म ओपन करायचे आहे, ते ठरवावे लागेल.
  • जर अर्जदारास नाबार्ड योजनेच्या माध्यमातून डेअरी फार्म सुरू करायचे असल्यास, त्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातील नाबार्ड कार्यालयात जावे लागेल.
  • त्याचबरोबर अर्जदारास जर लहान डेअरी फार्म सुरू करायचे असल्यास, त्यासाठी अर्जदारास आपल्या जवळील बँकेत जाऊन संबंधित माहिती घ्यावी लागेल.
  • बँकेमध्ये गेल्यानंतर अर्जदारास संबंधित योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरून त्यासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत.
  • आणि नंतर भरलेला अर्ज तुम्हाला बँकेत जमा करायचा आहे.
  • जर कर्जाची रक्कम जास्त असेल तर तुम्हाला तुमच्या प्रकल्पाचा अहवाल नाबार्ड कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024 ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालानाबार्ड योजना महाराष्ट्र 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४मोफत शिलाई मशीन योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४बीज भांडवल योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024आंतरजातीय विवाह योजना 2024
पीक कर्ज योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
चंदन कन्या योजना 2024इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना 2024श्रावण बाळ योजना 2024
महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024मोफत पिठाची गिरणी योजना 2024
खरीप पीक विमा योजना 2024पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024बांधकाम कामगार योजना 2024
NABARD Yojana Maharashtra 2024:FAQ’s
NABARD Yojana Maharashtra 2024 (नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024) कोणी सुरू केली आहे?

सदर योजना ही केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे.

NABARD Yojana Maharashtra 2024 (नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024 चे मुख्य उद्देश म्हणजे आपल्या देशातील तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.

NABARD Yojana Maharashtra 2024 (नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024) चे लाभार्थी कोण कोण आहे?

शेतकरी, बिगर सरकारी संस्था, उद्योजक, कंपन्या ई. या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवू शकतात.

NABARD Yojana Maharashtra 2024 (नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024 चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.