PM Surya Ghar Yojana 2024:या योजनेच्या माध्यमातून 1 कोटी कुटुंबांना मिळणार मोफत वीज!

Table of Contents

PM Surya Ghar Yojana In Marathi 2024

PM Surya Ghar Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात PM Surya Ghar Yojana 2024 (प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशभरातील तब्बल 1 कोटी कुटुंबांना अगदी मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे.

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया PM Surya Ghar Yojana 2024 (प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024) नक्की काय आहे? या योजनेची सुरुवात कोणी आणि कधी केली? या योजनेचे उद्देश आणि वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून कोण कोण लाभ घेऊ शकणार आहेत? काय काय पात्रता आवश्यक आहे? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

PM Surya Ghar Yojana 2024 (प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024) केंद्र सरकारने सुरू केलेली एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. आपल्या भारत देशातील घरांना मोफत वीज पुरवठा करणे या उद्देशाने 15 फेब्रुवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कुटुंबांना आपल्या घराच्या छतावर सौर पॅनल बसविण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. सौर पॅनल बसविण्यासाठी लागलेल्या खर्चावर 40 टक्के पर्यंत सबसिडी दिली जाईल.

महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून देशातील एक कोटी कुटुंबीयांना लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच या योजनेमुळे आपल्या सरकारची देखील मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या या योजनेसाठी दरवर्षी 75 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.

PM Surya Ghar Yojana 2024

प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावPM Surya Ghar Yojana 2024
(प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीकेंद्र सरकार
योजनेची सुरुवात कधी झाली15 फेब्रुवारी 2024
योजनेचे मुख्य उद्देशदेशातील एक कोटी कुटुंबियांच्या घरावर सौर पॅनल बसविणे, त्यांना मोफत वीज पुरवठा करणे
योजनेचे लाभार्थीआर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबे
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ30,000/- ते 78,000/- सबसिडी
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन अर्ज पद्धत
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

PM Surya Ghar Yojana 2024 नक्की काय आहे?

आपल्या देशातील कोट्यावधी नागरिक जे विजेच्या बिलाने हैराण झाले आहेत, अशा नागरिकांच्या हितासाठी केंद्र सरकारने 15 फेब्रुवारी 2024 रोजी एक योजना सुरू केली आहे. ती म्हणजेच PM Surya Ghar Yojana 2024 (प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024) होय. या योजनेच्या माध्यमातून नागरिक आपली वीज बचत करू शकणार आहेत.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून 75 हजार कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सौर पॅनल बसविण्यात येणार आहेत.

तसेच या योजनेची अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पोस्टमास्टर यांच्या अंतर्गत गावातील पक्क्या घराचे सर्वे करून घरांवर सौर पॅनल बसविण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून नक्कीच विजेची बचत होईल त्याचबरोबर देशातील नागरिकांना देखील याचा मोठ्याप्रमाणात फायदा होईल.

PM Surya Ghar Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • PM Surya Ghar Yojana 2024 (प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024) च्या माध्यमातून घरगुती विजबिलामध्ये मोठी बचत होणार आहे.
  • तसेच या योजनेअंतर्गत 1 ते 3 किलोवॅट पर्यंत 40 टक्के अनुदान मिळणार आहे.
  • त्याचबरोबर 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट पर्यंत 20 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
  • महत्वाचं म्हणजे सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट पर्यंत आणि प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट पर्यंत मर्यादा आहे.
  • आणि यामध्ये जी शिल्लक राहिलेली वीज आहे ती महावितरण कंपनी प्रति युनिट प्रमाणे विकत घेणार आहे.

PM Surya Ghar Yojana 2024:योजनेचे फायदे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024” चे फायदे काय काय आहेत?

  • या योजनेच्या माध्यमातून एक कोटी नागरिकांना मोफत वीज मिळणार आहे.
  • तसेच या योजनेमुळे सरकारच्या वीज खर्चात 50 लाख रुपयांची बचत होणार आहे.
  • प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024 च्या माध्यमातून सौर ऊर्जेचा जास्त प्रमाणात वापर होईल, त्यामुळे नैसर्गिक साधनांची बचत होईल.
  • या योजनेमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून 40 टक्के पर्यंत अनुदान मिळणार आहे.

PM Surya Ghar Yojana 2024:योजनेच्या माध्यमातून मिळणारी सबसिडी

सरासरी मासिक बिलउपयुक्त पॅनल क्षमतासबसिडी
0-1501-2 किलोवॅट30,000/- ते 60,000/-
150-3002-3 किलोवॅट60,000/- ते 78,000/-
3003 किलोवॅट पेक्षा अधिक78,000/-
PM Surya Ghar Yojana 2024

PM Surya Ghar Yojana 2024:पात्रता

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहे?

  • PM Surya Ghar Yojana 2024 (प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार हा भारत देशाचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • सौर पॅनल बसविण्यासाठी कुटुंबाकडे छत असलेले घर असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर अर्जदार कुटुंबाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
  • कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावा.
  • अर्जदार कुटुंबाने यापूर्वी सौर पॅनलसाठी अन्य सबसिडी असलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर अर्जदाराचे आधार कार्ड बँकेशी लिंक असणे आवश्यक आहे.

PM Surya Ghar Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • छत असलेल्या घराचे प्रमाणपत्र
  • वीज बिल
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

PM Surya Ghar Yojana 2024: अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • PM Surya Ghar Yojana 2024 (प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी अर्जदाराने सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.
  • रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला लॉगइन पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि संकेतांक टाकावा लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटणावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन होमपेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला ‘अप्लाय फॉर रूफटॉप सोलार इंस्टॉलेशन’ हा फॉर्म दिसेल, तो तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे.
  • त्यामध्ये तुम्हाला एप्लीकेशन डिटेल्स म्हणजेच तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
  • त्यानंतर तुम्हाला भरलेला अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यावा लागेल. अर्जात संपूर्ण माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे.
  • संपूर्ण माहिती अचूक असल्यास तुम्ही ‘सबमीट’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची PM Surya Ghar Yojana 2024 (प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४लेक लाडकी योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024
विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024
महामेष योजना 2024मध केंद्र योजना 2024
महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024
गोदाम अनुदान योजना 2024छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना 2024
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024आयुष्मान भारत विमा योजना 2024
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024
PM Surya Ghar Yojana 2024:FAQ’s
PM Surya Ghar Yojana 2024 (प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024) ची सुरुवात कोणी आणि कधी केली?

प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024 ची सुरुवात केंद्र सरकारने 15 फेब्रुवारी 2024 रोजी केली.

PM Surya Ghar Yojana 2024 (प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

देशातील एक कोटी कुटुंबियांच्या घरावर सौर पॅनल बसविणे, त्यांना मोफत वीज पुरवठा करणे, हे प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024 चे मुख्य उद्देश आहे.

PM Surya Ghar Yojana 2024 (प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

सदर योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिक लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

PM Surya Ghar Yojana 2024 (प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024 च्या माध्यमातून 30,000/- ते 78,000/- सबसिडी मिळणार आहे.

PM Surya Ghar Yojana 2024 (प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024) चा अर्ज कसा कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.