Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2026: एकात्मिक बाल विकास योजना, लाभ व पात्रता

Ekatmik Bal Vikas Seva Yojana In Marathi

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2026: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2026(एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील 6 वर्षांखालील बालकांच्या विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026 अपडेट

एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026 मध्येही सुरू असून ही योजना Mission Saksham Anganwadi आणि Poshan 2.0 अंतर्गत राबवली जात आहे. या योजनेद्वारे बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना पूरक पोषण आहार, आरोग्य सेवा तसेच पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यासोबतच Poshan Tracker आणि सक्षम अंगणवाडी उपक्रमांवरही भर देण्यात आला आहे.

चला तर मग जाणून घेऊया “एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026” ची सविस्तर माहिती जसे की, नक्की काय आहे ही योजना? या योजनेची सुरुवात कोणी केली? काय आहेत या योजनेचे मुख्य उद्देश? महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या सेवा पुरविल्या जातात? ई संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Integrated Child Development Services (ICDS) Scheme 2026 with Anganwadi worker, mother and child in Maharashtra

एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026थोडक्यात माहिती

योजनेचे नावEkatmik Bal Vikas Seva Yojana 2026
(एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026)
योजनेची सुरुवात कोणी केलीकेंद्र सरकार
योजनेचे मुख्य उद्देश कायराज्यातील सहा वर्षांखालील लहान मुलांचे पोषण आहाराचा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेचे लाभार्थीराज्यातील 6 वर्षांखालील बाळ व त्यांच्या माता
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभपोषण आहार व आरोग्य सेवा
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2026नक्की काय आहे?

राज्यातील 6 वर्षांखालील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2026(एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026) ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून बालक आणि माता यांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात.

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2026(एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026) च्या माध्यमातून भोजन, प्राथमिक आरोग्य सेवा, पोषण आहार, लसीकरण, आरोग्य व पोषण शिक्षण ई सेवा पुरविल्या जातात. जेणेकरून आपल्या राज्यातील 6 वर्षांखालील बालके व त्यांच्या माता सदृढ राहतील.

या सर्व सेवा आयसीडीएस केंद्राच्या मार्फत पुरविल्या जातात. मित्रांनो, आयसीडीएस ला ‘अंगणवाडी’ असे म्हंटले जाते. स्थानिक पातळीवरील अंगणवाडी केंद्र हा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा प्रमुख आधारभूत उपक्रम आहे. महत्वाचं म्हणजे आयसीडीएस हा आपल्या केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांपैकी एक आहे. त्याचबरोबर आपल्या राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येतो.

आपल्या राज्यात आयसीडीएस उपक्रमाचे एकूण 553 प्रकल्प कार्यरत आहेत. यामध्ये 364 ग्रामीण, 85 आदिवासी तसेच 104 शहरी झोपडपट्टींमध्ये आहेत.

लहान बालकांच्या आरोग्य व पोषण आहाराच्या समस्या त्यांच्या मातेचा विचार न करता सोडविणे शक्य नाही म्हणूनच हा उपक्रम किशोरवयीन मुली, गरोदर महिला, स्तनपान करणाऱ्या माता यांच्या पर्यंत विस्तारीत करण्यात आला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026 च्या माध्यमातून आपल्या राज्यातील लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य सेवा, निगा आणि शाळा पूर्व शिक्षण ह्या सेवा पुरविण्यात येतात.

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2026:योजनेचे उद्देश

चला तर मग जाणून घेऊया “एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • आपल्या राज्यातील सहा वर्षांखालील लहान मुलांचे पोषण आहाराचा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारणे, हा Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2026(एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026) चा मुख्य उद्देश आहे.
  • त्याचबरोबर त्यांचा मानसिक, शारीरिक तसेच सामाजिक विकासाचा पाया मजबूत करणे.
  • आपल्या राज्यातील लहान मुलांच्या आकस्मित मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करणे.
  • त्याचबरोबर कुपोषण आणि शाळाबाह्यतेला प्रतिबंध करणे.
  • महत्वाचं म्हणजे राज्यभरातील लहान मुलांच्या मातांना आरोग्य आणि पोषण मूल्यांची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षित करणे, हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे. जेणेकरून माता आपल्या मुलांचे संगोपन व्यवस्थित करू शकतील.
  • राज्यातील लहान बाळाबरोबरच गर्भवती महिलांना देखील पौष्टिक आहार पुरविणे.
  • योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे आरोग्य पोषणयुक्त राहील याबाबतच्या आवश्यकतेची काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम बनविणे.

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2026:योजनेद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सुविधा

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2026 Anganwadi worker providing early childhood education and nutrition services to children in Maharashtra

चला तर मग जाणून घेऊया “एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026” च्या माध्यमातून कोणत्या कोणत्या सुविधा पुरविल्या जातात?

  • राज्यातील बालकांना आणि महिलांना पूरक पोषण आहार देणे.
  • लहान बाळांचे लसीकरण योग्य वेळी करणे.
  • त्यांची आरोग्य तपासणी करणे.
  • आरोग्य संबंधित सर्व सेवा पुरविण्याचे काम करणे.
  • अनौपचारिक शाळा पूर्व शिक्षण देणे.
  • त्याचबरोबर पोषण आणि आरोग्य शिक्षण देणे.
  • इत्यादी सेवा Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2026(एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026) च्या माध्यमातून पुरविल्या जातात.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना
मोदी आवास घरकुल योजना राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना
मोफत उच्चशिक्षण योजना आंतरजातीय विवाह योजना
शबरी घरकुल योजना पीक कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना
गाय गोठा अनुदान योजना डिझेल पंप सबसिडी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना जिव्हाळा कर्ज योजना
ताडपत्री अनुदान योजना प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना
कुक्कुट पालन कर्ज योजना अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
कृषी उन्नती योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना
महाडीबीटी शेतकरी योजना प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना
सुभद्रा योजना महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना
थेट कर्ज योजना महाराष्ट्र मुख्यमंत्री राजश्री योजना

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2026:FAQ’s

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2026(एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026) ची सुरुवात कोणी केली?

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2026(एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026) ची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे.

Ekatmik Bal Vikas Seva Yojana (एकात्मिक बाल विकास सेवा योजना) चे मुख्य उद्देश काय आहे?

राज्यातील सहा वर्षांखालील लहान मुलांचे पोषण आहाराचा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Ekatmik Bal Vikas Seva Yojana (एकात्मिक बाल विकास सेवा योजना) चे लाभार्थी कोण आहेत?

राज्यातील 6 वर्षांखालील बाळ व त्यांच्या माता त्याचबरोबर गर्भवती महिला या Ekatmik Bal Vikas Seva Yojana (एकात्मिक बाल विकास सेवा योजना) च्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026 मध्ये सुरू आहे का?

एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2026 मध्येही सुरू असून ही योजना Mission Saksham Anganwadi आणि Poshan 2.0 अंतर्गत राबवली जात आहे.