PM Internship Scheme 2024:खुशखबर! एक कोटी तरुणांना मिळणार नोकरी|

Table of Contents

PM Internship Scheme In Marathi 2024

PM Internship Scheme 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. केंद्र सरकारने देशभरातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरू केलेली ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.

चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे ही योजना? या योजनेची घोषणा कोणी केली? या योजनेच्या माध्यमातून कोण लाभ घेऊ शकणार आहे? महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहेत? तसेच या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता आवश्यक आहे? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करत असताना PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) सुरू करत असल्याची घोषणा केली होती. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात एक कोटी तरुणांना देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाणार आहे.

PM Internship Scheme 2024

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावPM Internship Scheme 2024
(प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीकेंद्र सरकार
राज्यमहाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, उत्तराखंड
योजनेचे मुख्य उद्देशदेशभरातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे
योजनेचे लाभार्थीराज्यातील तरुण
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभएक कोटी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

PM Internship Scheme 2024 नक्की काय आहे?

PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) ची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करताना केली. या योजनेच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात एक कोटी तरुणांना देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे.

त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून तरुण विविध व्यावसायिक क्षेत्रात 12 महीने काम करण्याची संधी मिळवू शकणार आहे, त्यामुळे आपल्या देशातील बरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे.

PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) ची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. परंतु संध्या ती प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळणार आहेत. केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेची अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. यामध्ये निवडलेल्या तरुणांना दरमहा 5,000/- रुपये मिळणार आहेत. तसेच सहभागी झाल्यानंतर त्यांना एक रक्कमी 6,000/- रुपये देखील देण्यात येणार आहेत.

महत्वाचं म्हणजे 10 ऑक्टोबरपर्यंत कंपन्या त्यांचा गरजा आणि इंटर्नशिप पदाची माहिती https://pminternship.mca.gov.in/ या पोर्टलवर देतील आणि त्यानंतर 12 ऑक्टोबर पासून हे पोर्टल उमेदवारांसाठी खुले होईल.

PM Internship Scheme 2024:कंपन्यांचा समावेश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024” मध्ये कोणत्या कोणत्या कंपन्यांचा समावेश आहे?

मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून 3 ऑक्टोबरला 111 हून अधिक कंपन्यांनी पायलेट अंतर्गत 1077 हून अधिक ऑफर ठेवले आहेत. या कंपन्यांमध्ये महिंद्रा, अलेंबिक फार्मा, मॅक्स लाइफ इन्शुरन्स ई कंपन्यांचा समावेश आहे.

तसेच केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली ही योजना महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि उत्तराखंड मधील तरुणांसाठी सुरू करण्यात आली आहे.

या राज्यातील उमेदवारांनी कॉल सेंटर नंबर 18000161090 वर फोन करून प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024 मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

PM Internship Scheme 2024:योजनेचे फायदे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024” चे फायदे काय काय आहेत?

  • PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) च्या माध्यमातून तरुणांना देशभरातील टॉप 500 कंपन्यांमध्ये 12 महिन्यांचा वास्तविक जीवनाचा अनुभव घेता येणार आहे.
  • त्याचबरोबर केंद्र सरकारकडून दरमहा 4,500/- रुपये आणि उद्योगाकडून 500/- रुपये मिळणार आहेत.
  • आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारत सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेनंतर्गत प्रत्येक इंटर्नसाठी विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

PM Internship Scheme 2024:लाभार्थी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) च्या माध्यमातून महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि उत्तराखंड राज्यातील तरुण लाभ घेऊ शकणार आहेत.

PM Internship Scheme 2024:पात्रता

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहे?

  • PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार तरुण हा भारतीय असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 21 ते 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे.
  • त्याचबरोबर अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावा.
  • अर्जदार हा बेरोजगार असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा 10 वी पास असणे आवश्यक आहे.
PM Internship Scheme 2024

PM Internship Scheme 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

PM Internship Scheme 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारास ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
  • त्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
  • आता तुम्हाला तुमचे नवीन यूजर अकाऊंट तयार करावे लागेल, त्यासाठी तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड द्यावा लागेल.
  • तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल.
  • त्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
  • आता तुम्हाला तुम्ही भरलेला अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायचा आहे. अर्जात भरलेली संपूर्ण माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • संपूर्ण माहिती अचूक असल्यास तुम्ही तुमचा अर्ज सबमीट या पर्यायावर क्लिक करून सबमीट करू शकताय.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) ” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४लेक लाडकी योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024
विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024
महामेष योजना 2024मध केंद्र योजना 2024
महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024
गोदाम अनुदान योजना 2024छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना 2024
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024आयुष्मान भारत विमा योजना 2024
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024
PM Internship Scheme 2024:FAQ’s
PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) ची सुरुवात कोणी?

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024 ची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे.

PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

देशभरातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024 च्या माध्यमातून राज्यातील तरुण लाभग घेण्यासाठी पात्र आहेत.

PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

सदर योजनेच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळणार आहेत.

PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.