PM Awas Yojana 2.0 Apply In Marathi
PM Awas Yojana 2.0 Apply Online: नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेचा दूसरा टप्पा म्हणजेच ‘प्रधानमंत्री आवास योजना 2.0’ ची नुकीतच सुरुवात झाली आहे. आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब त्याचबरोबर मध्यमवर्गीयांसाठी प्रधानमंत्री आवास योजना 2.0 (PMAY 2.0 Scheme) सुरू केली आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षात तब्बल एक कोटी कुटुंबांना फायदा देण्यात येणार आहे.
मित्रांनो, केंद्र सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात केली होती. आपल्या देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळवून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही अशा नागरिकांना घर घेण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आत्तापर्यंत देशभरातील जवळपास 2 कोटी घर बांधण्यात आले आहेत.
PM Awas Yojana 2.0 Apply Online आपल्या देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरिकांना घर घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, या मुख्य उद्देशाने आता सरकारने पीएम आवास योजना 2.0 पुन्हा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शहरी भागातील मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरिकांना किफायती दरात घर देण्यात येणार आहे.
PM Awas Yojana 2.0 Apply Online: लाभार्थी
चला तर मग मित्रांनो, पीएम आवास योजना 2.0 च्या माध्यमातून कोणाला मिळणार लाभ?
केंद्र सरकारने सुरू केलेल्या “प्रधानमंत्री आवास योजना 2.0” च्या माध्यमातून झोपडीमध्ये राहणारे नागरिक ज्यांच्याकडे राहण्यासाठी चांगले घर नाही, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक, विधवा, अपंग व्यक्ती तसेच समाजातील अन्य वंचित वर्गातील नागरिकांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सफाई कर्मचारी, कारागीर, अंगणवाडी कार्यकर्ता यांना सुद्धा या योजनेच्या माध्यमातून शासनामार्फत आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
PM Awas Yojana 2.0 Apply Online:चार श्रेणीत मिळणार लाभ
प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत 2.30 लाख कोटी वाटप करण्यात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1.18 कोटी घरांना मंजूरी देण्यात आली होती. तसेच 85.5 लाखांहून जास्त घरं अगोदरच पात्र असलेल्या लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात चार उत्पन्न घटकातील पात्र लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.
पीएम आवास योजना 2.0 आवश्यक कागदपत्रे
PM Awas Yojana 2.0 Apply Online प्रधानमंत्री आवास योजना 2.0 साठी कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत?
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराच्या कुटुंबाचे आधार कार्ड
- जातीचा दाखला
- जमिनीची कागदपत्रे
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खात्याचा तपशील
PM Awas Yojana 2.0 Apply Online In Marathi: अर्ज कसा करायचा?
● ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- प्रधानमंत्री आवास योजना 2.0 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- त्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम पीएम आवास योजना 2.0 च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- आणि त्यानंतर Apply For PMAY 2.0 यावर क्लिक करावे लागेल.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल.
- आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी लागणार आहे.
- जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमचा आधार नंबर व तुमचे नाव तिथे टाकावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल.
- त्यानंतर तुम्ही पुढील अर्जाची प्रोसेस करू शकताय.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “PM Awas Yojana 2.0” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️