Gobar Dhan Yojana 2024:गोबर धन योजना;केंद्र सरकारचा अतीशय महत्वाचा उपक्रम!

Table of Contents

Gobar Dhan Yojana In Marathi 2024

Gobar Dhan Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या या लेखात भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या अतीशय महत्वाच्या योजनेची सविस्तर माहीत जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून प्रामुख्याने भारत देशातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्याप्रमाणात फायदा होणार आहे. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया काय आहे ही योजना? योजना कोणी आणि कधी सुरू केली आहे? या योजनेचे उद्देश काय काय आहेत? या योजनेचे फायदे काय काय आहेत? कोण कोण या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवू शकतो? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

केंद्र सरकार आपल्या देशातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच आपल्या देशातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते, जेणेकरून आपल्या देशातील नागरिकांचा आर्थिक विकास व्हावा, त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारावे त्याचबरोबर देशातील नागरिकांचे भविष्य उज्वल व्हावे, त्यातीलच एक योजना म्हणजे GOBAR-Dhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources) Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) होय.

Gobar Dhan Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) ही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपल्या भारत देशाच्या जनशक्ती विभागामार्फत राबवण्यात आलेली एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे. ही योजना प्रामुख्याने देशातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विशेष म्हणजे महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. ग्रामीण भागातील जनावरांच्या शेणापासून तसेच इतर कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक हे शेती हा व्यवसाय करतात, त्यासोबतच अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय देखील करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या परिसरात जनवरांचे शेण, तसेच इतर कचरा मोठ्याप्रमाणात असतो, त्यामुळे तेथील आजूबाजूच्या परिसरात अस्वच्छता दिसून येते. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने ग्रामीण भागात स्वच्छता ठेवणे ,त्याचबरोबर जनावरांच्या शेणापासून सेंद्रिय खत तयार करणे, गुरांपासून तयार होणाऱ्या कचऱ्याचा उपयोग करून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी Gobar Dhan Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) सुरू केली आहे.

या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास हातभार लागणार आहे. त्याचबरोबर सदर योजनेच्या माध्यमातून शेतातील घनकचरा गोळा करणे, जनावरांचे शेण साठवून ठेवणे या गोष्टींना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शेतातील घनकचरा आणि जनावरांच्या साठवलेल्या शेणापासून बायोगॅस तयार करण्यासाठी मदत होईल. तयार झालेला बायोगॅस हा ग्रामीण भागातील घराघरात पोहोचेल आणि महत्वाचं म्हणजे यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाक करण्यास या बायोगॅसचा उपयोग होईल.

Gobar Dhan Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिक आपल्या शेतातील घनकचरा तसेच जनावारांचे शेण ई साठवून ठेवतील आणि त्याच्यामार्फत बायोगॅस निर्मिती करतील, त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल आणि त्यांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल. तसेच या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात स्वच्छता दिसून येईल, परिणामी आपल्या देशातील ग्रामीण भागाचा विकास होणार आहे.

Gobar Dhan Yojana 2024

गोबर धन योजना 2024:थोडक्यात माहिती पाहूया

योजनेचे नावGOBAR-Dhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources) Yojana 2024
(गोबर धन योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
योजनेची सुरुवात कधी झाली1 फेब्रुवारी 2018
योजनेचे लाभार्थीभारत देशातील नागरिक
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभग्रामीण भागात स्वच्छता निर्माण होणार आहे
योजनेचे मुख्य उद्देशग्रामीण भागात बायोगॅस निर्मिती करणे
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Gobar Dhan Yojana 2024:योजनेचे मुख्य उद्देश

जाणून घेऊया, GOBAR-Dhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources) Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • गोबर धन योजना 2024 अंतर्गत एकूण 500 नवीन प्लांट्स उभारण्यात येणार आहेत.
  • या 500 प्लांट्स मधील 200 बायोगॅस प्लांट्स असणार आहेत. त्याचबरोबर शहरी भागात 75 प्लांट्स नव्याने उभारण्यात येणार आहेत.
  • त्याचप्रमाणे 300 क्लस्टर किंवा सामुदायिक आधारित प्लांट्स उभारण्यात येणार आहेत.
  • महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील शेतातील घनकचऱ्याचे तसेच इतर कचऱ्याचे व्यवस्थापन करून योग्यरित्या विल्हेवाट लावणे.
  • ग्रामीण भागातील परिसर स्वच्छ ठेवणे, पर्यावरणातील स्वच्छतेला प्राधान्य देणे.
  • ग्रामीण भागात वेस्टरजन्य रोगराईला आळा घालणे.
  • ग्रामीण भागातील नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • त्याचबरोबर त्यांचा आर्थिक विकास घडवून आणणे.
  • GOBAR-Dhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources) Yojana 2024 साठी सरकारमार्फत 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

Gobar Dhan Yojana 2024:योजनेअंतर्गत मॉडेल

  • वैयक्तिक कुटुंब :-
    • ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाकडे तीन किंवा त्यापेक्षा जास्त जनावरे आहेत अशी कुटुंबे ‘वैयक्तिक मॉडेल स्वीकारू शकतात. यामार्फत शेणापासून गोबरगॅस तयार करून घरगुती स्वयंपाकासाठी वापरू शकतो, तसेच उर्वरित शेणाचे खत म्हणून वापर होतो.
  • समूह :-
    • यामध्ये किमान कुटुंब संख्या ही 5 ते 10 असणार आहे. या मॉडेलमध्ये कुटुंबासाठी बायोगॅस यंत्र तयार करता येते. यामध्ये तयार होणारा गॅस हा स्वयंपाकासाठी तसेच इतर हॉटेल्समध्ये आणि विविध संस्थांमध्ये पुरवला जाऊ शकतो. आणि उरलेले शेण हे सेंद्रिय खत म्हणून शेतात वापरता येईल तसेच विकता देखील येणार आहे.
  • क्लस्टर :-
    • एका गावात किंवा गावातील एखाद्या गटात वैयक्तिक बायोगॅस यंत्रे आणि कुटुंबात मिळून बसवली जाऊ शकतात. यामध्ये तयार होणारा बायोगॅस हा घरगुती वापरासाठी वापरला जाऊ शकतो. तसेच त्यातून उरलेल्या शेणाचा शेतात वापर करू शकतो.
  • CBG (कमर्शियल कॉम्प्रेस बायोगॅस) :-
    • या मॉडेलमध्ये उद्योजक सहकारी संस्था गोशाळा मार्फत CBG (कमर्शियल कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट्स उभारले जाऊ शकतात. यामध्ये बायोगॅस संकुचित केला जातो आणि वाहन इंधन म्हणून वापरला जाऊ शकतो.

Gobar Dhan Yojana 2024:योजनेचे फायदे

जाणून घेऊया, GOBAR-Dhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources) Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) चे फायदे काय काय आहेत?

  • गोबर धन योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात बायोगॅस इंधन निर्माण करून स्वयंपाकाचा गॅस म्हणून त्याचा वापर करता येणार आहे.
  • ग्रामीण भागातील नागरिकांना शेती सोबतच बायोगॅस निर्मितीतून उत्पन्नाची नवी संधी मिळणार आहे.
  • तयार होणाऱ्या खताची विक्री करून शेतकरी पैसे कमवू शकतात. त्यासाठी शेतकऱ्यांना कुठलीही गुंतवणूक करावी लागणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून तयार होणाऱ्या खताचा वापर शेतीसाठी केल्यामुळे शेतातील उत्पादनात वाढ होणार आहे, परिणामी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
  • तसेच Gobar Dhan Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) च्या माध्यमातून बायोगॅस निर्मिती करून संपूर्ण गावाला इंधन पुरवठा केला जाऊ शकतो. त्याचबरोबर जास्तप्रमाणात ब्योगास निर्मिती झाल्यामुळे त्याचा वापर वीज निर्मिती करण्यासाठी केला जाऊ शकतो.
Gobar Dhan Yojana 2024

Gobar Dhan Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

जाणून घेऊया, GOBAR-Dhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources) Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) साठी काय काय पात्रता आवश्यक आहे? काय काय अटी व शर्ती आहेत?

  • GOBAR-Dhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources) Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) चा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा आपल्या भारत देशाचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेचा अर्ज करू इच्छिणारा अर्जदार हा भारत देशातील ग्रामीण भागातील असावा.
  • Gobar Dhan Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) साठी फक्त शेतकरीच अर्ज करू शकतात, इतर नागरिकांना या योजनेचा अर्ज करता येणार नाही.
  • या योजनेचा लाभ हा फक्त शेतकऱ्यांनाच दिला जाणार आहे.

Gobar Dhan Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

जाणून घेऊया, GOBAR-Dhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources) Yojana 2024 चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

Gobar Dhan Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग जाणून घेऊया Gobar Dhan Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • GOBAR-Dhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources) Yojana 2024 – गोबर धन योजना 2024 चा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर होमपेज ओपन होईल.
  • त्यामध्ये तुम्हाला ‘रजिस्ट्रेशन’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल, त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरा. जसे की, तुमची वैयक्तिक माहिती, तुमचं पत्ता, मोबाईल नंबर ई.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर ‘सबमीट’ या बटणावर क्लिक करा.
  • अशा पद्धतीने तुमची गोबर धन योजना 2024 ची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल तो क्रमांक तुम्हाला जपून ठेवणे आवश्यक आहे.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालाGOBAR-Dhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources) Yojana 2024 – गोबर धन योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 मोफत शिलाई मशीन योजना 2024
मोदी आवास घरकुल योजना 2024बीज भांडवल योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024गाय गोठा अनुदान योजना 2024
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४डिझेल पंप सबसिडी योजना 2024
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना 2024श्रावण बाळ योजना 2024
जिव्हाळा कर्ज योजना 2024ताडपत्री अनुदान योजना 2024
सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024नवीन स्वर्णिमा योजना 2024
नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024मल्चिंग पेपर योजना 2024
Gobar Dhan Yojana 2024:FAQ’s
GOBAR-Dhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources) Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) ची सुरुवात कोणी आणि कधी केली?

सदर योजना ही केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेची सुरुवात 1 फेब्रुवारी 2018 रोजी करण्यात आली आहे.

GOBAR-Dhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources) Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) चे उद्देश काय आहे?

ग्रामीण भागातील शेतातील घनकचरा आणि जनावरांच्या शेणापासून बायोगॅस निर्मिती करणे.

GOBAR-Dhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources) Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

सदर योजनेसाठी फक्त भारत देशातील ग्रामीण भागातील शेतीकरीच पात्र असणार आहे.

GOBAR-Dhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources) Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) च्या माध्यमातून काय फायदा होणार आहे?

GOBAR-Dhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources) Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) च्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन, त्यांचा आर्थिक विकास या योजनेच्या माध्यमातून होणार आहे.

GOBAR-Dhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources) Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

GOBAR-Dhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources) Yojana 2024 (गोबर धन योजना 2024) चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे