PM Aasha Yojana 2024:प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान योजना| तब्बल 35 हजार कोटींचे बजेट मंजूर!!

PM Aasha Yojana In Marathi 2024

PM Aasha Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात PM Aasha Yojana 2024 (प्रधानमंत्री आशा योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या या योजनेला प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान योजना असे देखील म्हंटले जाते.

मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार देशभरातील नागरिकांच्या हितासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. त्याचबरोबर देशभरातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देखील केंद्र सरकार सतत प्रयत्नशील असते. जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने सातत्याने नवनवीन योजना केंद्र आणि राज्य सरकार राबवत असते. त्यातीलच एका योजनेची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत, ती म्हणजेच PM Aasha Yojana 2024 (प्रधानमंत्री आशा योजना 2024) होय.

केंद्रीय मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक पार पडली. त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 2025-26 च्या वर्षासाठी PM Aasha Yojana 2024 (प्रधानमंत्री आशा योजना 2024) अंतर्गत 35 हजार कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. भारत सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना मोठ्याप्रमाणात फायदा होणार आहे.

PM Aasha Yojana 2024

प्रधानमंत्री आशा योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावPM Aasha Yojana 2024 (प्रधानमंत्री आशा योजना 2024)
प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान
योजनेची सुरुवात कोणी केलीकेंद्र सरकारद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
योजनेची सुरुवात कधी करण्यात आलीसप्टेंबर 2018
विभागकृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
योजनेचे मुख्य उद्देशदेशभरातील शेतकऱ्यांना योग्य दरात आर्थिक सहाय्य करून त्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे
योजनेचे लाभार्थीदेशातील शेतकरी
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभया योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकास होणार आहे
बजेट35 हजार कोटी रुपये
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

PM Aasha Yojana 2024 नक्की काय आहे?

PM Aasha Yojana 2024 (प्रधानमंत्री आशा योजना 2024) ही देशभरातील शेतकरी बांधव व ग्राहकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने सप्टेंबर 2018 मध्ये सुरू केलेली एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना चांगले दर मिळावे व ग्राहकांना महागाईमुळे कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू नये या उद्देशाने प्रधानमंत्री आशा योजना 2024 ची सुरुवात करण्यात आली आहे.

शेतकरी व ग्राहक मित्रांनो, 2025-26 या वर्षांमध्ये केंद्र सरकार प्रधानमंत्री आशा योजना 2024 च्या माध्यमातून तेलबियांच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या 25 टक्के उत्पादन हमीभावानुसार खरेदी करणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना योग्य हमीभाव व अधिक प्रमाणातील बियाणे खरेदी करण्यात येणार आहे. तसेच या योजनेच्यामार्फत केंद्र सरकार कडधान्य पिकांमधील मसूर, उडीद आणि तुर 100 टक्के प्रमाणात खरेदी करणार आहेत.

नक्कीच या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशातील शेतकरी बांधवांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास हातभार लागणार आहे. PM Aasha Yojana 2024 (प्रधानमंत्री आशा योजना 2024) चा पूर्ण अर्थ प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान असा होतो.

PM Aasha Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री आशा योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • देशातील शेतकऱ्यांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वाढावा तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री आशा योजना 2024 सुरू केली आहे.
  • प्रधानमंत्री आशा योजना 2024 च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना बाजारामध्ये पीक विक्रीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
  • आणि महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नाचा दाम हा दुप्पट करून देणे, असे या योजनेचे उद्देश आहे.
  • आपल्या देशातील शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
  • शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

PM Aasha Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “PM Aasha Yojana 2024 (प्रधानमंत्री आशा योजना 2024)ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सप्टेंबर 2018 मध्ये सुरू करण्यात आलेली PM Aasha Yojana 2024 (प्रधानमंत्री आशा योजना 2024) ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत फिजिकल पद्धतीने शेतकऱ्यांकडून तेलबिया त्यासारख्या पिकांची खरेदी करण्यात आली येईल.
  • शेतकऱ्यांकडून पिके खरेदी करण्यासाठी सिस्टीम योजनेमधून सुरू करण्यात आली आहे.
  • आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना बाजारामध्ये जर अपयश आल्यास प्रधानमंत्री आशा योजना 2024 च्या माध्यमातून शासनामार्फत आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा मोठ्याप्रमाणात फायदा होणार आहे.
PM Aasha Yojana 2024

PM Aasha Yojana 2024:योजनेचे फायदे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “PM Aasha Yojana 2024 (प्रधानमंत्री आशा योजना 2024) च्या माध्यमातून काय काय फायदे होणार आहेत?

  • PM Aasha Yojana 2024 (प्रधानमंत्री आशा योजना 2024) च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.
  • शेतकरी बांधवांना जर बाजारामध्ये कमी हमीभाव असेल तर केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून सहाय्य करणार आहे.
  • महत्वाचं म्हणजे सदर योजनेच्या कालावधी हा 2025-26 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
  • सदर योजनेसाठी केंद्र सरकारने 35 हजार कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे.
  • खाजगी कंपन्यांना शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार खाजगी कंपन्यांना प्रोत्साहित करत आहेत.
  • देशभरातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

PM Aasha Yojana 2024:योजनेचे घटक

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “PM Aasha Yojana 2024 (प्रधानमंत्री आशा योजना 2024) अंतर्गत किती व कोणते घटक समाविष्ट आहेत?

या योजनेअंतर्गत तीन घटक समाविष्ट आहेत.

  • प्राईज सपोर्ट स्कीम :-
    • शेतकऱ्यांकडून फिजिकल मार्गातून डाळी, तेलबिया, खोबरे विकत घेता येतील.
    • त्यामध्ये NAFED व FCI चॅनेल अंतर्गत शेतकऱ्यांकडून माल विकत घेता येईल.
    • यादरम्यान होणारे नुकसान केंद्र सरकार भरणार आहे.
  • प्राईज डेफिशियन्सी पेमेंट स्कीम :-
    • यामध्ये शेतकऱ्यांना बाजारामध्ये पिकांची विक्री करत असताना जेवढा तोटा झाला आहे, त्याची भरपाई MSP व मॉडल प्राइज प्रमाणे केंद्र सरकार भरेल.
  • पायलट ऑफ प्रायवेट प्रॉक्यूरमेंट अँड स्टॉकिस्ट स्कीम :-
    • याअंतर्गत केंद्र सरकार भारतातील मोठ्या खाजगी कंपन्यांना शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करेल.
    • त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “प्रधानमंत्री आशा योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४लेक लाडकी योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024
विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024
महामेष योजना 2024मध केंद्र योजना 2024
महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024
गोदाम अनुदान योजना 2024छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना 2024
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024आयुष्मान भारत विमा योजना 2024
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024
PM Aasha Yojana 2024:FAQ’s
PM Aasha Yojana 2024 (प्रधानमंत्री आशा योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?

प्रधानमंत्री आशा योजना 2024 ची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे.

PM Aasha Yojana 2024 (प्रधानमंत्री आशा योजना 2024) ची सुरुवात कधी करण्यात आली?

प्रधानमंत्री आशा योजना 2024 ची सुरुवात सप्टेंबर 2018 मध्ये करण्यात आली.

PM Aasha Yojana 2024 (प्रधानमंत्री आशा योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

देशभरातील शेतकऱ्यांना योग्य दरात आर्थिक सहाय्य करून त्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

PM Aasha Yojana 2024 (प्रधानमंत्री आशा योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

सदर योजनेचा लाभ हा देशातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे.